Saturday, May 30, 2020

अनलिमिटेड नाईट कॉल.. IDEA

नुकताच नोकियाचा ठोकळा मोबाईल विकत घेतला होता तेव्हा, म्हणजे कॉलेजचे ते दिवस, कुमार वयातले नवके नखरे. असे बरेच काही चालू होते लाईफ मध्ये तेव्हा. नाकाखाली उगवलेली भुर्या रंगाच्या मिश्या, जे काही होते त्यालाच ताव मारत कॉलेजला जायचो. मुलींशी तशी ओळख नवती जास्त पण कधी तरी झालेच लायब्ररी मध्ये बोलायचो एकाद मुलीशी, त्यात पण लाजऱ्या स्वभावाने मागे ठेवले होते. कोलेज आटपून चार्टड अकौंटकडे काही तासांसाठी कामाला जायचो, आपल उगाच थोडे पैसे आणि शिकायला मिळावे म्हणून. चांगले दोन चार महिने उलटले तिथे काम करून, तेव्हा कुठे एका मुलीशी तिथ ओळख झालती, कामा निमित्त बोलणे बाकी जास्त नाही. शनिवारी पूर्ण दिवस जावे लागायचे, मग तिथेच टिफिन खाणे पिने असा काहीतरी दिनक्रम सेट झालता.

       तेव्हाच्या वेळी फोन मध्ये ब्यालंस असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. आणि त्यावेळेस तो आईडीयाने रात्रीचा अनलिमिटेड कॅलिंग प्याक सुरु केलता. म्हणजे रात्री अकरा नंतर आईडीया ते आईडीया कॉलिंग मोफत असायचे. ह्याचा तसा आपल्याला काही उपयोग न्हवता.

ऑफिसमध्ये रोज भेटणारी “ती” लाईफ मध्ये नकळत जवळ येत होती. रोजचे भेटणे, बोलणे, काही कामानिमित्ताने जवळ येणे, हे त्या वेळेला सुखावत होते. आयुष्यात प्रेम वगैरे काय ते फ़क़्त चित्रपटात पाहिले आणि तेव्हाच अनुभवले. मग तिच्या सोबत बोलताना असे काही खास नाही पण जरा वेगळाच अनुभव येऊ लागला. दिवसभर भेटून आमचे बोलणे होयचे पण तिला ह्यात समाधान वाटायचे नाही. तिने स्वताच्या मोबाईल मध्ये तो रात्रीचा रिचार्च प्याक मारला होता. तिने मला कधी हट्ट नवता केलता कधी कॉल करण्याचा. रात्री जेवण आटपले कि अकरा नंतर हि कॉल करायची. रात्रीचे चांगले एक दोन पर्यंत आम्ही बोलत बसायचो. हे बोलणे बराच महिने चालू होते. म्हणजे तिला माझावर प्रेम आहे किवा मी तिच्या बद्दल काही विचार करतोय का असे काहीच नवते म्हणजे फ़क़्त बोलणे नितांत. माझा खिशाला तिने कधी त्रास दिला नाही, तिचीच खटाटोप चालायची, फोन करायचा आणि सगळे. ह्यात तिच्या बहिणींशी पण ओळख झालती, मग काय त्यांचा सोबत पण आपल वेड्यागत बोलत बसायचो. तेव्हा बोलताना वेळेचा भान कधी झाला नाही. आणि तिनेहि कधी प्रेम बीम असल्या गोष्टी मध्ये आणल्या नाही. या सगळ्यात वेळ इतका गेलता कि समजलेच नाही. आम्ही कॉमर्सची डिग्री घेऊन बाहेर पडलो. तरीहि आमचे फोना फोनी चालूच असायचे. तिने एके दिवशी सांगितले लग्न ठरले म्हणून, मामाचा मुलगा आहे आणि पुढच्या महिन्यात लग्न आहे ते, मग काय लग्नाचे निमंत्रण दिले आणि ठेवला फोन.

       काल एक अनओळखी फोन आला होता, नंबर नवीन होता मी उचलला नाही, पण का जणू कोण असेल ह्याची कून कून लागू लागली होती, मग मी लगेच फोन लावला आणि समोरुन आवाज आला.

“ब्यालंस आहे का रे फोन मध्ये, कि करू मी फोन” आणि जोरात हसू लागली ती समोरून..

 

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®



Saturday, May 16, 2020

पुन्हा एकदा नव्याने भेट..! ©®

पुन्हा एकदा नव्याने भेट..! ©®

त्या दिवशी बौध पोर्णिमा होती त्यामुळे पांढऱ्या शुभ्र चंद्राने रात्र मस्त रोमांचक झाली होती. मे महिना तसा उन्ह, वारा आणि ढगाळ वातावरणाचे दिवस घेऊन येतो. त्यामुळे रात्री हवा बेभान वाहत होती. माझ्या खिडकीच्या काचेला सैरावैरा करून सोडले होते वार्याने, खिडकीवर आदळणारे वार आणि त्याचा आवाज, खुर्चीत बसून आत येणारी थंड वाऱ्याची झुळूक अंगाला शहारे देऊन जात होती. अश्या गोंधळात मला झोप हि लागत न्हवती पण कोणास ठाऊक नकळत मला डूलका लागला.

खिडकीतून कोवळ उन्ह चांगल डोळ्यावर हलकासा मारा करत होते. रात्री जागरणाने झोप पूर्ण झाली नाही. पण तरीहि मी स्वताला चुरगाळलेल्या बिछान्यातून स्वताला दूर सारत उठलो. सकाळचा चहा घशा खाली सोडला आणि आपला मोबाईल घेऊन उगाच काही तरी करत बसलो. अचानक अनोळखी नंबरवरून फोन आला, थोडा थांबून मी फोन उचलला आणि समोरून गोड आवाजात “हेलो” म्हणून बोलले कोण तरी..

कानामध्ये जोरात धावणाऱ्या ट्रेनचा आवाज यावा तसा, समोरून माझाशी बोलत होती ती व्यक्ती, मला बोलायची संधीच देत न्हवती..हो “ती” चं... ती धावणारी ट्रेन माझाकडून सुटली होती मागे पाच वर्षापूर्वीच. आता तिचे ऐकता ऐकता सगळ्या गोष्टी माझा डोक्यात घोंगावत होत्या, म्हणजे.. तिच्या बद्दलच्या आठवणी, किस्से, सोबत फिरलेले दिवस, बेहिशोबी घालवलेले दिवस, कित्तेक दिलेले वचने, ठळकपणे छापलेले मनातील चित्रे, डोळ्यांनी डोळ्याला दिलेले सुख, तिच्या मिठीत मिळणारे स्वर्गसुख, बेभान पावसात घालवलेले दिवस आणि तिच्या ओठांवर सुखावणारे माझे ओठ. असे बरेच काही एका क्षणात माझा डोळ्यासमोर येत होते. आजही मी ऐकत होतो आणि ती समोरून फ़क़्त बोलत होती. जादूच अशी तिची कि मी पुरता शून्य होतो, ती बोलत असताना म्हणजे वादळालाहि कोणितर मुठीत पकडावे असे काही. ह्या सगळ्यात तिच्या लग्नात अनुभलेला दिवस आठवला. गळून पडलेलो मी, तिला शेवटचं भेटायला म्हणून आलेलो स्टेजवर, तेव्हा तिच्या कपाळावर आलेला घाम, उडालेली तारांबळ मला तिच्या डोळ्यात दिसत होती. तेव्हा तिच्या डोळ्यात मन भरून पाहता आले नाही. आणि तसाच खाली स्टेज वरून खाली उतरलो. तेव्हा काय ते तिझ्या आणि माझ्या आयुष्याच्या नव्या युगाला सुरवात झालती. फरक मात्र एवढाच कि .. ति उगवती कडे आणि मी मावळतीकडे चालू लागलो होतो.

सगळे तिचे ऐकले शांत राहून. म्हणजे आमचे बरेच काही बोलणे झाले होते तसे. तब्बल पाच वर्षाने तिच्या सोबत बोलणे चालू होते. ती अशीच आहे सगळ चोखपणे माझाकडून काढून घेणार माझाबद्दल. मी काय ते सांगत गेलो, पण मला एक नक्की जाणवले ह्या सगळ्यामध्ये. तिला जाणवून घ्यायचे होते मी नक्की काय करतोय आजकाल, लग्न बिग्न झाले का किवा नवीन प्रेयसी आहे का आयुष्यात. असे सारखे फिरून फिरून उकरून काढत होती. तसे माझाकडे सांगण्यासारखे खास न्हवते म्हणा काहीच. तिचे झाल्यावार तिच्याबद्दल विचारू लागलो. तिने हि बेधडक पने सगळे सांगितले. नवरा आणि तिच्या चिमुकल्या परी बद्दल! बोलता बोलता तिला भेटायचे आहे असे बोलून मी मोकळा झालो. तिने हि हसत हसत भेटू म्हणून होकार दिला. तस भेटणे काही चुकीचे थोडी आहे आमचे, ती तिच्या नवर्याला सांगून येणार असे बोलली, मीही बोललो चालेल, पण मला जास्त वेळ हवाय तुझा असा हट्ट धरला. असे सगळे बोलणे झाल्यावर तिने फोन ठेवला.

फोन ठेऊन मी पुरता शॉक झालतो. पण डोक्यावरहि कामाचा बोज्या होताच. आपल्या दिनक्रम चालू केला, सगळे चालू असताना तिला मेसेज केला येत्या सोमवारी भेटू म्हणून, काही वेळाने तिचा मेसेज आला कि ठीक आहे. इथ माझी  झोप उडाली होती, आता नव्याने भेटायचे, काय..कसे..कुठे.. सगळ्या प्रश्नांनी माझ्या मनाच्या मोकळ्या उनाड रानात वारे घोंगावू लागले होते. मी भेटण्याच्या दिवसाची वाट बघू लागलो.

तिने सुट्टी टाकली होती सोमवारी, म्हणजे ती पूर्ण दिवस देणार हे समजले. तिला पिक-अप करण्यासाठी निघालो. ठरल्याप्रमाणे भेटण्याचा ठिकाणी गेलो. माझा फोन वाजू लागला, तिने गोड आवाजात मागे वळून बघ असे बोलली. मी लगेच मागे वळालो, ती एका मोठ्या झाडा खाली ती थांबली होती. उन्हापासून वाचायला तिने छत्री धरली होती डोक्यावर, गडद चोकलेटी कलरचा मोठासा चष्मा चढावला होता डोळ्यांवर, फुल स्लीवचा टॉप ते पण मोरपंखी रंगाचा. त्या खाली लांब लचक पांढऱ्या कलरचा स्कर्ट पण हलक्या पिवळट रंगाची चित्र फित्रे त्यावर, ओठांशी हलकीशी पिंक रंगाची लिपस्टिक आणि थोडी अंगाने भरली होती त्यामुळे चांगली मादक दिसत होती. हे सगळ निखारून मी तिला पुन्हा एकदा प्रोपोस करावा नव्याने असे मनात येऊ लागले. ह्या सगळ्यात तिच्या गळ्यातल मंगळसूत्र शोधत होतो मी पण काही घावले नाही. इतक्या वर्षांनी मधल्या काळात चांगलीच मोर्डेन झाली होती. इतक्या कडक उन्हात ती चांगलीच झळकत होती. मला बघताच तिने हलकीशी स्माईल दिली आणि हात वर केला. तिच्या जवळ गडबड करत गेलो. म्हणजे मागे माझाकडून सुटलेली हि सुसाट ट्रेन पुन्हा माझा डोळ्यासमोर येऊन थांबली होती. तिने जवळ येऊन हातात हात मिळवले.

आमच्या गप्पा सुरु झाल्या, तिथ थांबल्या थांबल्या आमचे चांगलेच तीस मिनिट्स गेले. बोलताना तिच्या चेहऱ्याचे हावभाव मी ताराकले मग तिला म्हटलं मागे बस पटकन, तिने हि लगेच खांद्याचा आधार घेत एका बाजूला पाय सोडून बसली मागे. ती अजूनही माझावर हक्क गाजवते हे खांद्याच्या पकड वरून जाणवले. मी गाडी थेट वैशाली समोर लावली, तिने माझ्याकडे बघून हलकीशी स्माईल दिली आणि तडकपने आत गेली, आमच्या ठरलेल्या टेबलावर जाऊन बसली. गाडी ठीक पार्क करून आत गेलो. ब्याग बाजूला ठेऊन, ती घाईत मेनूकार्ड बघू लागली नेहमी सारखी. समोर ती त्या मेनूकार्डच्या गर्दीत आणि मी तिच्या काळेभोर, काजळी लावलेल्या डोळ्यात हरवून गेलो होतो. आज मनभरून हिच्या डोळ्यात डूबायचे होते. नशा आहे तिच्या डोळ्यात, बस त्या नशेत गुंग व्हावे असेच वाटते दरवेळेस. तिची नकळत नझर माझाकडे गेली, पण मी तीला दुर्लक्षित करत तिच्या कडे पाहू लागलो होतो. गालावरील खळी किंचीतशी पडू लागली आणि ती हसू लागली गालातल्या गालात. ओठांशी पिंक लिपस्टिक आता मवाळ झालती, तिच्या लालसर गुलाबी ओठांची छटा दिसू लागली होती. तिने ओर्डर देऊनहि टाकली, मी काय खाणार ह्या पेक्षा तिला काय खायचे आहे हे सांगायची तिची जुनी खोड. स्वतासाठी मसाला डोसा आणि माझासाठी उडीदवडा-सांभार. तिचे भुकेने केविलवाणे डोळे मी तिथेच तारले होते म्हणून इथे आणले तिला लगेच. तिची खातानाही बड-बड काही थांबली नाही, ती बोलत होती मी ऐकत होतो बस. हितले आमचे आटपले काही वेळात. तीला कॉफिची तलफ आणि मला चहाची ओढ हि आमची जुनी सवय. तिला घेऊन सदाशिवपेठेतल्या कॅफेत घेऊन गेलो. चांगला एखाद तास आम्ही तिथ ही घालवला.

आमच्याकडे बराच वेळा होता तसा. तिला म्हटलं मस्त मूवी बघू, काही वेळ घालवू तिथ. असे म्हणून आम्ही लक्ष्मिनारायण सिनेमागृहात गेलो. हित येण्याचे माझ कारण जरा वेगळेच होते, तिचा-माझा हा लक्ष्मिनारायण सारखा जोडा असावा असे काहीतरी बालिश होते मनात. मुव्ही पाहून आम्ही तिथून निघालो. खर तर मला पुन्हा त्या अंधार्या खोटडीत जायचे न्हवते पण दुसरे काही आलेच न्हवते डोक्यात त्या वेळेला. पुन्हा बाहेर निघताना प्रश्न पडत होता नक्की जायचे कुठे आता. म्हणजे आता कुठेतरी शांत ठिकाणी, जिथे एकांत मिळेल, निवांत बोलता येईल. थोडं उन्ह कमी झाले होते. आणि सगळी कडे नितांत शांतता पसरली होती. गाडी मी तशीच खडकवासला धरणाकडे फिरवली. म्हटलं आज सोबत हिच्या शांत ठिकाणी बसावे. ढळणार्या सूर्यास्ताकडे बघत वेळ घालवावा. पाण्याचा बाजूला जाऊन आम्ही खडकावर बसलो. जिथे बसलो होतो तिथ गर्दी न्हवती. तिथ फ़क़्त खडकाला आढळणारे पाणी, हिची बडबड आणि पक्षांचा किलबिलाट फक्त ऐकू येत होता. जुन्या गोष्टी उकरून ती बोलू लागली. प्रत्तेक वेळेला हेच विचारत होती, तू लग्न का नाही केलेस, कोण भेटले कि नाही आणि माझी आठवण येते कि नाही. बोलणे तर चालुच होते, बोलता बोलता मी तिचा हात पकडला, मुठ तिचे मोकळी केली आणि त्यावर तिला घेतलेली रिंग ठेवली. तिचासाठी घेतलेली रिंग मी अजून जपून ठेवली होती. हे बघून तिचे डोळे भरून आलते. ती मिश्कील हसू लागली होती, हसू ह्यासाठी कि माझा वेंधळ्या प्रेमावर तिला येत होते. तिने हलकेसे मारले माझ्या डोक्यावर. आणि खांद्यावर डोके टेकवत शांत झाली. मी काही वेळा साठी हरवलो होतो तिथे. तिने खांद्याला टेकावलेले डोके. केसांची गर्दी माझ्या छातीशी पसरली होती. खांद्याला ओल जाणवू लागली मला. पण इथ मी सगळा त्राण हरवून बसलो होतो.

घड्याळाचे काटे सन सन सरकत होते पुढे, समोर डोंगराच्या आड जाणारा सूर्य, आकाशभर तांबूस रंग पसरला होता. पाण्यातून सोनेरी किरणे डोळ्यात मारा करत होती. तिने अजूनही खांदा सोडला न्हवता माझा. मी तिला कसतरी सावरत तयार केले. तिने माझा हातात पुन्हा ती रिंग ठेवली आणि तूच घाल बोटात अशी डोळ्याने विनवणी केली. ती आज पुरती कॉलेजातील कुमारी होऊन आली होती. म्हणजे गळ्यात मंगळसूत्र नाही आणि बोटात साधी रिंग नाही. जशी काय ती आज पासून माझा आयुष्यात कायमची येणार होती . मी रिंग तिच्या बोटात घातली. ति तशीच उठली आणि गाडी पाशी निघाली. तिला बोलायचे तर भरपुर होते, वेळ पण घालवायचा होता पण काय आहे, आता तिची घरी वाट बघणारी तिसरी व्यक्ती होती, ह्याची तिला जाणीव झाली. मी पण काही बोललो नाही आणि तिला पुन्हा तिच्या मूळ ठिकाणी सोडले आणि माझा दुनियेत परतलो.

तसे ती जेव्हा खांद्यावर डोके टेकवून शांत झाली होती. तेव्हा माझा आतमध्ये पुन्हा रोमांच जगू लागला होता. तिला घट्ट मिठीत घेऊ वाटत होते. पुन्हा तिच्या गुलाबी ओठांशी मला गुडूब्त होऊ वाटत होते. भरल्या डोळ्यांना पुसायचे होते, अलगत भरलेल्या कंबरेशी हात बांधायचे होते, गालांवर पसरलेले केस सावरायचे होते.. असे बरेच काही मनाशी उसळले होते, पण आपल पुन्हा मर्यादेच्या सिमे अलीकडे थांबलो.

 

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

 

#पुन्हा_एकदा_नव्याने_भेट..! ©®
#jeet

#blogger

#मराठी_ब्लॉगर

#मराठी_प्रेमकथा

-----------
जितेंद्र वाजे
१६-०५-२०२०



Wednesday, May 8, 2019

हॉटेल लाड. #नुसतं_मटण_चिकन

हॉटेल लाड. #नुसतं_मटण_चिकन, वाकड

..कसय ते मटणाचा बेत ठरवायचं आणि मोक्याच्या ठिकाणी नाही जायचं असे कधी होत का आपलं राव!!

आमचं ठरलं कुठंतरी नवख्या ठिकाणी, नव्या टेस्टला संधी द्यावी, मनाची शांती व्हावी, जिभेचे चोचले पुरवावे, दिवसभर उन्हाची झळ डोक्यात होती आणि पोटात भुकेची आग..

कावेरीच्या रस्स्याचा कट, जय भवानीच्या मटण वाटीचा ठसका, शिवेंद्रच्या मसाल्यात होरपळलेल्या कलेजीचा तुकडा, शिल्पा गावरणच्या ठसकेदार चिकनची चव... असस बरच काही जीभेशी घोळलेल्या मटण-चिकनची चव असताना अजूनही काहीतरी नवीनच हवं होतं..होय..काहीतरी नवीनच.. मग हे "लाड. #नुसतं_मटण_चिकन " माहितीच्या लिस्ट मध्ये होत आणि तिथं ह्या रविवारी जायचं ठरलं आमचं..

माझा सोबतचे खास मित्र, दिसायला जरी शरीराने मध्यम असले तरी माझाही पेक्षा तरबेज आहेत ही..संध्याकाळी आम्ही गुगल बिगल करून पोहचलो, पोटाची आग जेव्हा असते तेव्हाच वेटिंग बिटिंग असले काही प्रकार अडचण म्हणून समोर येतात राव, आणि हो खरच वेटिंग चांगलीच होती पन आम्हीही आज ठरवून आलतो म्हणा, त्यामुळे थांबलो..

आत गेल्या गेल्या आम्ही ठरवल्या प्रमाणे तीन खास मटण थाळी आणि एक अंडा थाळी सांगून मोकळे झालो, ह्यांनी जेवढा वेटिंग वर टांगट ठेवलं होतं पण सर्विस मध्ये ह्यांनी कसलीच कमी पडू दिली नाही, काही मिनिटात सगळं टेबलावर होतं हो..

मोठ्याश्या थाळीत - खिमा वाटी, सुक्क मटण प्लेट, रस्याची मोठी प्लेट, सोलकडी, चपाती, दह्यात भिजवलेल्या कांद्याची वाटी, आळणी वाटी आणि तुपातील इंद्रायणी भाताची प्लेट..आहह.. पाणी आलते राव हो हे सगळे बघून..खिमा चपातीत घेऊन पहिला घास उतरवला खाली एकदाचा, मन प्रसन्न झाले हो इथंच, मसाल्याची चव मला समजलीच नाही राव, म्हणजे कसं काळा, लाल पुढं किंवा गरम मसाला समजून येतो तसा ह्यांचा स्वादामध्ये समजूनच येईना ना, खासियत आहे म्हणा ह्यांची, रस्यात मी एक अख्खी चपाती चुरून खाल्ली, मटणाची नळी ओढली, सोलकडी गरम झालेल्या पोटात सोडली आणि शेवटाला इंद्रायणीच्या भाताला रस्यात घेऊन गच्च भरलेल्या पोटात जरासा भरला एकदाच, मध्ये मध्ये गरम आळणी सूप सोडतच होतो म्हणा...असे काही तरी भन्नाट घरापासुन जवळच असलेले लाड हॉटेलने प्रसन्न करून टाकले राव..

हॉटेलच्या सगळ्याच गोष्टी चांगल्या आहेत असे नाही पण पैसा वसूल आहे ही थाळी बस्स..

स्पेशीएल थाळी : ३५०/-,
पत्ता: भूमकर चौक आधी वाकडगावला जाणाऱ्या रोडला उजव्या बाजूला..

मा. मालकास टीप: आळणी शक्यतो गरम द्या, तुम्ही आत ठेवलेला मधला फॅमिली टेबल जमलं तर दोन रांगेत बनवा कारण तुमच्या कडे येणाऱ्या गर्दीला लगेच जागा मिळेल, बाहेर ताठखळत थांबलेल्या लोकांशी मध्ये अधे येऊन लागनार्या वेळेची माहीती देत जावा म्हणजे बाहेर थांबणाराही हे ग्राहकच आहेत ते तुमच्या साठीच आलेत हो, सर्विसतर खरच भन्नाट आहे तुमची, स्टाफ तुमचा खरच सामंजस्य आहे ते बोलताना आणि सर्विस देताना जाणून आले..धन्यवाद

.................
जितेंद्र वाजे
०७.मे.२०१९
#९८५०५३४१२५


Tuesday, February 27, 2018

ए रिपीट कर रे....!

"ए रिपीट कर रे....!" ©®
काही तरी लिहायला घेतलेले त्याला पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल ह्याची काहीच कल्पना नाही आणि नसते कधीच, असाच प्रवास अनुभव मी घेतला होता लिहण्यास, म्हणजे असा अनुभव जो जवळच्या मित्रांसोबत घालवलेला असा काही तरी, म्हणजे २०१७ च्या पहिल्या दिवशी आम्ही केलेला एकत्र कोकण दौरा आणि त्यात आलेला अनुभव काहीसा आजही लक्षात राहण्यासारखा जो आज कुठेतरी पूर्ण झाला लिहून, जरा वेळ लागला पूर्ण करायला पण असो...आणि तो अनुभव असा....!
..."ए रिपीट कर रे....!"
..अचानक पिन ड्रॉप सायलेंट आमच्यात, एकमेकांचे चेहरे बघत आम्ही जरासं चकितचं झालतो, कोणाला सुचलच नाही काय झाले अचानक आणि का एकदम मन भरून आल्यावानी आम्ही "रिपीट" चा ठेका घेतला.....!
जास्त सुरवात पासून, लांबवत, खेचत बोलण्यापेक्षा थेट ताम्हिणीच्या पुढे, मानगावातून कोकणाच्या झाडी झुडपातून निघणाऱ्या घाटात आल्या नंतरचचं खोदून काढतो आता..
म्हणजे आम्ही आमच्याच मूड मध्ये होतो म्हणजे भारी लईत, गाडीत आम्ही तिघेचं, नवीन वर्षाच्या जशन मधे तुफाणीत होतो इथे आल्यावर, जिपीयस् ला कामी लावून आम्ही सुसाट होतो, गाडीत जुन्या आठवणींचा फड रमलेला,म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प वैगरे टाळून आम्ही जगलेल्या जुन्या आठवणी उकरत कोमेजलेल्या मनाला चांगलसं तासतं होतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस, कोकण दर्शन, उनाडगिरी, भटकंती, रोजच्या गणित भागाकाराच्या जीवनाला टाळा लावून आम्ही निघालो होतो, कसल्याही जबाबदारीची किल्ली खिश्यात न् घेता आम्ही निघालो होतो तसे, इथे कोकणात आम्ही, चढ उताराचा घाटी रस्ता पार करत आम्ही आमच्या मार्गी होतो, समोर दिसणारा डोंगर, झाडांची गर्दी, रस्त्याची रुंदी, सापासारखी डौलदार वळणा वळणाची रसत्याची शेपूट, कोवळ्या उन्हाची झळ, गाडीतल्या एसी ला आराम देऊन आम्ही साइड विंडोला ओपन करून बाहेरच्या वाऱ्याची मजा घेत, केसांना खेळावणारा वारा अनुभवत, मनाला गार वाऱ्याची ओस शिंपडत, डोळ्यांना रंगीत कॉम्प्युटरच्या त्रासातून मुक्त करून इथे हिरव्या शालीची छटा चढवत, काहीसा जंगलांनी डोंगरांना आपल्या कुशीत गुडूप केले होते.. असा रंगीत प्रवास आमचा चालू होता..
एव्हड सगळं चालू असताना गाडीतील मुसिक सिस्टमनी का जणू साखरेचा खडा टाकावा तसं मनाला उस्फुर्त करनाऱ्या गाण्याल्या का जणू आणि कसे प्ले करावं, श्रेया घोषालच्या आवाजात "सून रहा है ना तू" च्या धूनला सुरवात झाली कामाहित पण नकळत हाताने वोल्युम वाढवला मग आपलं बाहेरच्या बाजूला बघत ऐकणं सुरु होतं, आम्ही रेडिओ सारखी बडबड करणारे अचानक वेगळ्याच दुनियेत गेलो होतो असे मला वाटते, कारण तोंडातून शब्दाचा अ.ब.क. हि पडत न्हवता, गाण्याची धून, मुसिक, बोल आणि बनलेला माहोल असे काहीतरी वेगळंच चित्र बनलं होतं, का जणू मनाच्या कोपऱ्यात जुन्या आठवणींचा कापूर हवेत पसरू लागला होता, त्याचा दरवळणारा कापूर सुघंध घुमत होता मनातल्या मनात, आठवणीत म्हणाल तर आशिकी-२ च्या गाण्यांनी गातलेल्या धुमाकूळ त्याकाळातील आठवला कि मन कसे आनंदाने उड्या मारू लागते, म्हणजे कसे थंडीच्या दिवसात गाराठलेल्या विहरित उडी मारण्यात जी माजा आहे ना असेच काही तरी..
गुणगुणनाऱ्या श्रेयाच्या आवाजात मनात शांत बसलेल्या वादळाला कुणीतरी दिवचत होते, कोणतरी मनाच्या जवळ अजूनही घर करून बसले आहे ह्याची हलकीशी जाणीव होतं होती, "ती" चे अस्तित्व अजून मनाशी भिडत होते, तसं बोलायला गेलं तर अश्या अनेक गाण्यांची लिस्ट आहे की ती गाणी ऐकताना मला वेगळ्याच जगात घेऊन जातात, असच काहीतरी माझं आता होत होते, तिच्या बद्दल मनात विचारांची किती गर्दी होयची ह्याची जरा आठवण झाली हे गाणे ऐकताना, गाडी चालवणारा मित्र काय कि मागे बसलेला मित्र काय आम्ही तिघे जरा वेगळ्याच दुनियेत गेलो होतो.
गाडी आपल्या स्पीड मध्ये निवांत चालू होती, काच खाली असल्याने बाहेरचा वारा चेहऱ्या वर धडकत होता, मनाशी होणाऱ्या विचारांना थंड वाऱ्याची हलकीशी गोजिरी माया पाघळत होती, मायाळ तिच्या रूपाची आठवण करून देत होती, ह्या गाण्याची जादू जरा औरच आहे म्हणजे मन कसं सुखावून जाते ऐकल्यावर. बाहेरच चित्र काहीतरी वेगळच फिल्मी दिसत होते मला काहीशा वेळेला, झाडांना मागे टाकत आम्ही सुसाट होतो, गाडीचा वेग जास्त असल्याने वारं आत घुसताना कानाशी घोंगावणारा आवाज येत होता, सुका पाला-पाचोळा हवेत उडत होता रस्त्यावरचा, पावसानं जोरात पडावं असे मनाशी फार वाटत होते कारणच तसे होते म्हणा आणि गाण्याने मूडही तसा फुलत होता. समोर बघताना मागचा सगळा भूतकाळ आठवत होता, चित्र न् चित्रच समोर खेळू लागले होते डोळ्या समोर माझ्या, गण्यासोबत मी मला केव्हाच हरवून बसलो होतो, तिच्या आठवणीत माझा मनाचा झोका चांगलाच झुलत होता.
"अपने करम की कर अदाएं
यारा.. यारा.. यारा…
मुझको इरादे दे, कसमें दे, वादे दे
मेरी दुआओं के इशारों को सहारे दे
दिल को ठिकाने दे, नए बहाने दे
ख़्वाबों की बारिशों को
मौसम के पैमाने दे
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं.."
इथंच काळीज माझं पाघळलं, गाण्याचे बोल, मुसिक आणि बनलेला माहोल सर्व एकदम दही साखरेचे मिश्रण झाले होते, कोणाची तरी आठवण ठिपकत होती मनात, आठवणींचा पाझर पुठावा असे काही तरी होतं होते, गाण्याच्या झोकात मी फ्लॅशबॅक मधे कधी पोहचलो ते मला जनावलेच नाही, आमच्या तिघांचे एकमेकांकडे लक्ष न्हवते, शेजारी गाडी चालवणारा मित्र गॉगल घालून नजर चुकवत समोर गाडी चालवत होता मला तर वाटतं होते की हा पण कुठल्यातरी क्षणात हरवला असेल आठवणीत कुणाच्यातरी, आणि मागे पहिले तर पऱ्या डाव्या बाजूच्या विंडोतून बघत आपल्या स्वतःला गाणं ऐकताना गोंजारत होता, आमचं कल्लोळ चालणार मूड काहीसा सायलेंट झाला होता, मग मी पण बाहेर बघत गाण्याचा रस कानाशी चाखत होतो..
मंजिलें रुसवा हैं, खोया है रास्ता
आये ले जाए, इतनी सी इल्तेजा
ये मेरी ज़मानत है
तू मेरी अमानत है हाँ …
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं
वक़्त भी ठहरा है, कैसे क्यूँ ये हुआ
काश तू ऐसे आये, जैसे कोई दुआ
तू रूह की राहत है
तू मेरी इबादत है
..ह्या काहीशा ओळीनंतर मी अजून काहीसा सुखावलो होतो, तसं ह्या गाण्याचा जोर हि तसाच तरबेज आहे म्हणा प्रत्तेक वेळेला हे गान काहीसे खेळवून जाते, मग असेच आम्हा सर्वांचे पण असे काही तरी झाले होते, गाण्यात गुंतताना मनाला मला कधी आवर घालता आला नाही, मग आज मी तसा कुठलाहि प्रयत्न केला नाही, गाण्याचा वोलुयम पण थोडासा मी वाढवला, श्रेया घोशाल ज्या पद्धतीने जीव ओतून ह्या गाण्याला गोडवा दिला आहे न त्याला खरच हलक्यात मोजता येणे जरा अवघड आहे.. मग पुढे गाणे तसेच ऐकत शेवटच्या टप्याला आले होते..
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं..
यारा…
..इथे गाण्याने स्टोप घेतला आणि आम्हा सगळ्याचा तोंडून एकाच वाक्य एकदम आले बाहेर..
"ए रिपीट कर रे....!"
**समाप्त**
©®
#Travel_Story
#jeet
#blogger
-----------
जितेंद्र वाजे
२७-०२-२०१८

Sunday, February 4, 2018

अचानक एंट्री.. ©®

अचानक एंट्री.. ©®
सकाळच्या साखर झोपेत असताना मोबाईल वाजू लागला होता, मग मीच-मिचणाऱ्या डोळ्यांना उघड झाप करत पाहिले, म्हटलं इतक्या सकाळी कोणाला आठवण झाली माझी, नंबर अनोळखी होता त्यामुळे उचलला लगेच, समोरून गोड आवाजात “Hello” ऐकू आले, आवाज अनोळखी होता म्हणजे लांबचं न जवळचं असा कुठल्याच कॅटेगिरी मध्ये त्या आवाजाची ओळख लागत न्हवती, मग पुन्हा विचारपूरवक बोलणे सुरु केले, समोरील आवाजातुन मधागत गोड धार ओसरत होती, ह्या आवाजाने साखर झोपेचं साखरेचे पाख झाले होते पुरते, पण झोपेतच मी अडखळत बोलत आणि त्यात समोरून येणारा आवाज दबक्या स्वरात येत होता, बोलताना ती घाबरत होती, म्हणजे तिला माहित न्हवते माझा काय रेस्पोंस असेल तिच्या अचानक कॉल वर..
       ती : हेल्लो, मी *** बोलते, कसब्यातून..
       मी : हो बोला..!
       ती : तुझा ब्लॉग वाचला मी नेटवर, छाण वाटले वाचून, तू लिहलेले शब्द नि शब्द पाठ झाले मला..
       मी : माझा नंबर कुठून मिळाला तुम्हाला?..
       ती : भेटला मला नेटवर, काही प्रोब्लेम झाला का? मी कॉल केला तर..?
       मी : नाही तसे काही नाही, पण...(..म्हणत शांत झाहलो..).. काही नाही... धन्यवाद कॉमेंट साठी..
                                                              ****** ****
...तेव्हा जास्त बोलणे नाही झाले तीचासोबत पण थोडक्यात बोलणे झाले म्हणजे तोंड ओळख व्हावी जशी, तिने स्वताहून केलेला कॉल आणि धाडसाबद्दल मला नवल वाटले पण तिच्या गोड आवाजाने मला घायाळ केलते तसे कुठेतरी.. तिने आवर्जून फोन करून त्या ब्लॉग बद्दल सांगितलेले मला सारखे मनाशी खेळत होते, मग पुन्हा तोच ब्लॉग वाचू लागलो त्या दिवशी, तसा काही मोठा आकस्मित परिणाम नाही झाला मनावर पण कोणीतरी एवढ्या खोल आणि मन लाऊन वाचेल ह्याची जाणीव न्हवती तेव्हा, मित्रांनी दिलेले प्रोस्थाहन आणि मनाशी खेळणाऱ्या शब्दांची आवड ह्या काही गोष्टीने सुरु झालते पण असा काही तरबेज आणि साहित्तिक पद्धतीचा लेखक नाही पण असाच आपले काही तरी चालू होते, ति मग नंतर संपर्कात राहू लागली, कधी फोन वर तर कधी मेसेज वर माझासोबत बोलणे चालू होते, तिचे वाचनावरील वेढ मला अजून उत्तेजित करू लागले होते लिहण्यास मग लिहताना तिच्या सोबत होणारया गप्पा वाढल्या, तिचे फोन येणे, मेसेज वाढू लागले, म्हणजे बोलणे वाढले होते आमचे, तिने भेटण्यासाठी भरपूर वेळा सांगायची पण माझेच काही तरी इथले तिथले निघायचे मग राहून जायचे आमचे भेटणे, तशी लांब न्हवती पण होती जवळचं, माझा ब्लॉग मधील “ती” तिला सारखी भासायची, मला मग सारखेच तिच्या बद्दल विचारणे सुरु केलते, पण आपले मी तिला टाळायचो, ती पण मग समजून घ्यायची कि मला तिच्याबद्दल विचारलेले आवडत नाही ते, मला सारखे बोलायची मला तिला भेटायचे आहे म्हणून वगैरे...

...ब्लॉग बद्दल बोलतना ति जरा त्या प्रवासात..त्या विषयात घुसायची, तिला प्रत्तेक ब्लॉग बद्दल बोलायचे असायचे माझासोबत म्हणजे फोन केला कि मग तासं तास बोलायची, ब्लॉग मधील प्रत्तेक शब्दावर नि ओळीवर तिचे काही तरी मत असायच, बोलताना कधी कधी ती कविता करून जायची, कुठला शब्द भारी नि कुठली ओळ बरोबर बसली नि कुठे काही फिसकटले तर ती सांगून मोकळी होयची, दिवसाची सुरवात चहा पासून होयची मग मागच्या आठवड्यात खाल्लेली मी मिसळी पर्यंत आमचे बोलणे होयचे, माझी बडबड आणि मिसळ कीर्तनाने ती पण मिसळ वेडी झाली होती, तिला कधी आणि कशी मिसळचे वेड लागले हे तिलाही समजले नाही, प्रत्तेक वेळेस काही खाल्ले किंवा कुठे फिरायला गेली तर त्यावर पुन्हा चर्चा, तिने केलेला ड्रेस चौइस पासून ते मला आवडेल तो कलरचा ड्रेस घेण्यापर्यंत, तिने विकत घेतलेला नवीन मेकप किट पासून ते मला आवडणाऱ्या पिंक लिपस्टिक पर्यंत, तिने केलेल्या नवीन हेयर कट पासून ते मला आवडणारे लांब काळेभोर केसांपर्यंत.. आमचे बोलणे-चर्चा करणे सुरु होते, प्रेम बीम भांडगड नाही पण आमचे बोलणे चालू झाले होते घट्ट मैत्री गत, तिला कधी हि हुक्की आली तर मग सारखी मागे लागायची भेटू म्हणून, नाहीतर कुठेतरी बाहेर जाऊ असे म्हणत पुन्हा विषय छेडायची आणि तिला माहित असायच कि मला तेव्हा तरी भेटणे शक्य न्हवते, पण आमचे फोन आणि मेसेज वर घट्ट जमू लागले होते. तिचे ऑफिस आणि घर ह्या मध्ये जास्त वेळ ती माझा सोबत बोलण्यात घालवायची, मग सकाळी ऑफिसला पोहचेपर्यंत ते घरी जाईपर्यंत हीची बडबड चालू असायची.

..काही दिवस असेच गेले, पण एका दिवशी आमचे भेटणे ठरले भेटू म्हणून, तसे मी पण इच्छुक होतो, पण फोटो वगैरे पाहिले होते आम्ही एक मेकांचे पण तरीही भेटण्याची इच्छा होती आमच्या मध्ये, तिच्या घरी मोकळे वातावरण होते त्यामुळे ती घरी सांगूनच येणार होती मला भेटायला, आमचे ठरल्या प्रमाणे आम्ही खडकवासल्याला भेटणार होतो, त्यादिवशी मी सकाळी लवकर निघायचे म्हणून झोपलो पण उदया भेटायचे आहे ह्या गोष्टीवरूनचं आमच्या मध्ये फोन वर चर्चा सुरु होती, त्यात रात्री खूप उशीर झाला होता, मग तिला सकाळी मला उठव म्हणत मी झोपलो, सकाळी ती ठरलेल्या वेळेत निघाली होती घरून, आणि तिने मला अलार्म कॉल पण दिला होता, पण मी पुरता गाढ झोपेत होतो, थोड उशिरा जाग आली मला, कसे बसे गडबडीत मी आवरले आणि गाडीला किक मारून निघालो, तिचे कॉल सुरु झाले होते कि पोहचले आहे म्हणून, पण मी अजून अर्ध्या रस्यातपण नाही पोहचलो होतो, तिला समजले होते कि मी उशीर करणार म्हणून, आणि त्या पद्धतीने ती वाट बघत थांबली..

..थोडा उशीरच झाला होता पण शेवटी पोहचलो मी, तेथे जाऊन कुठे आहे म्हणून कॉल केला तेव्हा ती आधीच खाली खडकावर पाण्यात पाय सोडून बसली होती, आणि तसे तिने मला तेथेच यायला लावले, आज चक्क प्रतक्ष्य भेट होती आमची त्यामुळे माझी बोलती बंद झाली होती आणि त्यात मी उशीर हि केला होता, समोर तिच्या पोहचलो नि तिने मस्त गोड हसून ओळख दिली. मला वाटल कि ती आता चांगला वचपा काढेल माझावर उशीरा आलो आहे म्हणून पण तसे काहीच नाही उलट तिने पुन्हा रोजच भेटते तसे बोलणे सुरु केले, मग मी पण मिसळून गेलो आणि तिचा सोबत बोलायला लागलो.

..आमच्यात असे बोलण्यासारखे काही राहिलेच न्हवते कारण तिचा बद्दल मला आणि माझा बद्दल सर्व तिला माहिती होते, भेटल्यावर पुन्हा तिने “ती” बद्दल विचारायचा अट्टाहास धरला मग आमचा त्याच विषयावर बोलणे सुरु होते, माझ बोलणे सुरु झाले आणि तिने फ़क़्त ऐकायचे सर्व असे ठरवून आली होती, त्यामुळे तिचा बद्दल ऐकण्या ऐवजी माझेच सुरु झाले होते, ती शांत पने ऐकत मला साथ देत होती, समोर शांत निसर्ग, त्याचाही पलीकडे आकाशी भिडणारा सिह्गड मला सारखा खेचत होता, तिने ओळखले कि माझा मना मध्ये कसली घालमेल सुरु आहे ते, मग तिनेच स्वताहून विचारले जाऊया का सिंहगडावर, काही तरी खाऊ तिथे मला भूक लागली आहे असे बोलून पुन्हा हट्टीपना करू लागली, मग आम्ही तिची गाडी तिथेच ठेऊन सिंहगडाकडे निघालो, ती पण मस्त बिनधास्त मागच्या सीट वर बसली होती, गाडीचालवतानाहि तिचे बडबड चालूच होती, तिला अश्या ठिकाणी यायला आवडते आणि त्यामुळे ती चांगलीच रंगात आली होती, काही वेळाने आम्ही वरती पोहचलो, गाडी लाऊन आम्ही वरच्या बाजूला पोहचलो, पोटामध्ये भुकेने आग ओकत होती त्यामुळे लगेच आम्ही खाण्यास थांबलो एका हॉटेल मध्ये, खेकडा भजी आणि नंतर पिटल भाकरी दनकावली तेव्हा कुठे आमचा जीवात जीव आला, पुढे जाऊन एका कठड्यावर बसलो, सर्व मोकळे असल्याने वार मस्त घुमत होते, शांत वातावरण मनाशी मस्त वाटू लागले होते, ती आणि मी काही वेळासाठी गप्प झालो होतो, मग नंतर तीच पुन्हा बोलायला लागली.

..तिची नि माझी भेट तर झाली पण आम्ही अजून मित्रच आहोत, ते पण प्रेमाच्या अलीकडे आणि मैत्रीच्या पलीकडे गत, काही नात्यांना प्रेमाचा शेवट भेटतोच असे नाही पण प्रेमाने जपलेले नाते हे कितीक पतीने घट्ट नी निर्मळ असते, तिला हि मनात भरपूर काही येते नि भरपूर भावना ह्या गुंतल्या आहेत पण जिथे पुढे भविष्यच नाही त्या भांडगडित पडायचे नाही असे तिला मी आधीच सांगून मोकळे झालो होतो, पण तिचा माझावर हक्क गाजवण्याचा हट्टीपणा तो काही कमी नाही झाला न तो कधी कमी होणार.

**समाप्त**

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

 

#अचानक_एंट्री  ©®  #jeet #blogger #मराठी #साहित्य


-------------------
जितेंद्र वाजे ©®
०५-०२-२०१८

Wednesday, January 24, 2018

गोरखगड..

 गोरखगड..


२०१० च्या गोरखगड भटकंतीची लाही-लाही डोक्यातून उतरली न्हवती तशी अंगाची सालटून निघालेली जंगलतोड तेव्हांच हाडांचा भूग्गा करून सोडला होता, म्हणजे अंगातील खाज हि अंगाशी आलती माझा त्यावेळेसचं..योगी, प्रकाश, स्वप्न्या आणि मी आम्ही चौघेच तेव्हा..
मग पुन्हा २०१८ च्या २० जानेवारीच्या सकाळी आमच्या पुन्हा तशीच खाज खिजवू लागली होती, मग काय पुन्हा चौघेच मिळून निघालो ह्यावेळेस हि.. शनिवारच्या सकाळी झोपेला डोळ्याच्या उगढ-बंद खेळीतून सावरून मी पुरता जागा झालो, पोटामध्ये काहीसा नष्ट कोंबून मी निघालो ते थेट पुन्हावळ्यात मित्राच्या घरी पोहचलो, तेथे माझी परी पार्क करून मित्राच्या गाडीत सामील होऊन निघालो गोरखगडच्या दिशेला.
चौक गावात पोहचाल्यावर आम्ही मग तेथे खाऊ*खादाड सामग्रीची वैवस्था लावली, कारण आम्हाला रात्रीचा मुक्काम करायचा होता ह्या वेळेला आणि तसे आम्ही पूर्व तयारी करुनच आलो होतो म्हणा, तशी गाडीला स्पीड देऊन आम्ही पोहचलो एकदाचे पायथ्याचा गावाला, ब्यागा बिगा घेऊन सुरु झालो गड चढाई करायला, उन्हाचा तन तन न्हवती कारण चांगले  पाच वाजले होते आणि उशीर होणार हे माहित होते त्यामुळे आमची हि हालचाल जोरात झालती वर जायला, मंदिराच्या मधूनच दमछाक निघेल अशी चढाई सुरवात झालती, खडतर, झाडी झुडपातून आमची वन वन सुरु झालती आणि काहीशा वेळाने कुठे तरी वरच्या बाजूला पोहचलो, तिथेच समोर दिसणारा सुलाख डोळ्यात भावला आणि त्यात उजव्या बाजूला दिनकरराव त्यांचा कुशीत रुजू जाण्यास तयारीला लागले होते, त्यांचा नारंगी रंगाची उधळण चालू झालती तशी माझा मोबईलचा कॅमेराने क्लिक क्लीकाट सुरु केला, मन भरेपर्यंत काय ते फोटो काढले आणि आम्ही मार्गस्थ झालो, वरच्या पायथ्याच्या मंदिराचे दर्शन करून आम्ही चढाई ला सुरवात केली, हाश हुष करत आम्ही दगडांवर स्वर झालो आणि वरच्या गुहेत पोहचलो, पोहचताना वरती कधी रात्र झाली हेच कळले नाही, अंधार पसरला होता, तेव्हा आम्ही चौघेच होतो त्यामुळे माणशी मस्त वाटले होते, अश्या दगड मातीच्या देशात एक आपलेच राज्य असणे म्हणजे आनंदाची वारीच म्हणावी असे वाटते मला.
कड्याला डोक टेकवून. आकाशी पसरलेले चांदण तेव्हा भलतचं भरले होते, चांदण्यांची गर्दी पाहताना मनातल्या कोमेजलेला मी कुठतरी फुलारलो होतो, किर्र शांतता, कोणाची कट कट नाही न कोणाचा त्रास, आम्ही आमच्याच दुनियेत रमलो होतो, सकाळी वरच्या टेकडावर जायची कून कून आमच्या मनात चालू झाली होती, गडावरचा सूर्यास्त आणि सूर्योदय जग्ण्यात जी मजा आहे ती कशातच नाही हो..

समोर उगवणारा सूर्य, त्याने मांडलेला रंगांचा खेळ, उधळलेली नारंगी रंगाची भूक्की, त्यात थंडीचा गारठलेला ओस, असा काहीतरी भारीच अनुभव घेत आमचा रम्य दिवसाला सुरवात झाली..

#भटकंती #गोरखगड #प्रवास_वर्णन #सह्याद्री


-------------------
जितेंद्र वाजे ©®
२५-०१-२०१८
 

Tuesday, December 5, 2017

याड लागलंय.. ©®

याड लागलंय.. ©®
याड लागलंय.... खरच याड लागलं होतं.. आता फ्ल्याश ब्याग मध्ये जाण्यात काही अर्थ नाही पण काही मधाळ आठवणींना पाझर पुठला कि जिव्हारी गोडवा पसरतो आणि आठवणींच्या गोड तलावात बुडून जाण्यास मनास कोणीही थांबवू शकत नाही, अश्याच त्या सैराट मय दिवसात घालवलेले, जगलेले दिवस आठवले म्हणजे “याड लागलंय” ह्या गाण्याची आणि सैराट मुविच्या त्या दिवसातली आठवण...
..सकाळ होऊन दिनकरराव नव्वद अंशाच्या कोनात येऊन उभे होते आणि ते पण तळ तळत्या उन्हाची झळ माझा चेहऱ्यावर आली होती, डोळ्यांनी चीर-मीर करत उघडण्याचा प्रयत्न करत माझी झोप उडाली, आता किती वाजले ह्याचा मला अंदाजच नाही, सकाळचे खूप वाजून गेले होते, अंगातला आळसं झटकत उठलो आईला चहाची मागणी गेली, तसा चहा झालता सकाळचा घरात पण आता माझासाठी पुन्हा!, चहा एक कप घश्या खाली उतरवला तेव्हा कुठ माझी झोप पूर्ण उडाली, सकाळची अंघोळ आटपून मी आवरून घेतले, ब्याग-बिग असले काही नाही आपले मग गाडीची चावी घेतली, एक वही सोबत बसं आणि निघालो बाहेर..
ठरल्या वेळात “ती” बस स्त्यांडला थांबली असेलच असे गृहीत धरून मी निघालो, काही वेळात स्त्यांडला पोहचलो, तिथे ठरल्या वेळेत म्याडम पोहोचल्या होत्या, मला तसा वेळ झालता म्हणा आणि ते तिच्यासाठी सवयच झाली होती पण त्याचा राग निघतो म्हणा कधी तरी, गाडी तिच्या समोर उभी केली अन तिच्या कड बघत बसलो, चेहर्यावर स्कार्फ, ब्याग खांद्याला अडकवलेली, हातातील घड्याळ बघत ती माझाकडे करड्या नजरेने बघत होती, तिच्या दुसर्या हातातील डायमंडची ब्यांगल उन्हात मस्त चमकत होते, स्कार्फ मध्ये तिचे काळेभोर डोळे कातील दिसतात हे तिला सांगून दमलो पण आज तिने डोळ्यांना काळ्या रंगाची डार्क लायनर लावली होती त्यामुळे त्या काळ्याभोर मायाळ डोळ्यात मी आज पुन्हा फसलो होतो, ती जवळ आली मग पुन्हा तिच्या तिखट शब्दात तेच रोजचे गाराने ऐकवत झोडपू लागली, माझ मग काय गुमान ऐकत बसलो, तिचे झाले आणि थांबली आता, मग मीच तिला डोळ्यांनी ईशारी करून बस बोललो, ती बसलिही, तिने बसताना खांद्याला जोरात हिचका देत बसली, हे असे तिचे खट्याळ वागने चालूच असते म्हणा त्यात काही नवीन नाही.
ती रागात असली कि गाडीवर ती एक इंच लांब होऊन बसते, जी पर्यंत हिचा राग शांत होत नाही तोवर ती काही बोलत नाही मग ती गुमान बसली मागे, गाडी टिळक रोडने घेऊन थेट रामनाथला थांबलो, हिचा तिखट राग शांत करण्याचे रामबाण उपाय म्हणजे झणझणीत मिसळ हिला चारायची, हॉटेलात जाऊन दोन मिसळ सांगून मी मोकळा झालो, टेबलावर दणकन बसत हि समोर माझा, चेहऱ्यावरचा स्कार्फ काढून तिने ठेवला बाजूला, तिच्या मागच्या बाजूला जोराचा पंखा चालू होता त्यामुळे हिचे केस त्या हवेच्या हेलकाव्याने हवेत उडत होती, त्या केसांना सावरत हिची गडबड झाली, मग स्वताच काकांना पंखा कमी कारायला सांगून ती पुन्हा माझापासून नजर चुकवून ती मोबाईल मध्ये घुसली, समोर माझा असताना मोबाईल मध्ये घुसलेले मला आवडत नाही हे तिला ठाऊक असते पण मुद्दामून खोड काढण्यासाठी माझासोबत बोलायचे सोडून हि मोबाईलमध्ये घुसून बसली होती. मग देवकृपेने समोर मिसळची प्लेट आमच्या दोघानसमोर....

मिसळची वैवस्तीतरित्या वैवस्था लाऊन तिला घेऊन शनिवारवाड्यात घेऊन गेलो, मग हिच्या पोटाची शांती केली तेव्हा कुठ राग शांत झालता थोडा, आतमध्ये जाऊन आम्ही बसलो, हिला मनवयाचे माझे शर्तीचे प्रयत्न चालू होते, मग नंतर काय जणू माझा मनात आले आणि हिला मी मंगला ठेटरला घेऊन गेलो, तेथे गेल्या नंतर पाहिले तर “सैराट” चे पोस्टर लागले होते, ह्या मुव्हीचे गाणे ऐकून मी तसा दिवानो झालतो पण तो बघण्याचा योगा-योग तो आला न्हवता, पण आज अचानक बघण्याचे माझे ठरले, पोस्टरवर आर्ची-परश्या चित्र मला भन्नाट वाटले होते त्या पोस्टरला बघून माझा मनातले वाईलंट वाजू लागले होते, ओठांवर गाण्याची बोल गुणगुणू लागले होते, हाताची ताशेरे झाल्यागत त्यांची हालचाल होऊ लागली होती, मग तिकीट घरात जाऊन दोन कॉर्नरची तिकिट्स घेतली, हिच्या चेहरयावरच्या धुडगूस मूडचा पत्ता अजून मुक्कामी होता अजून, मी तिला चल म्हणत आतमध्ये गेलो मग सीट पाहून बसलो, मूवी सुरु झाला तरी म्याडम अजून काय माझाकडे बघायला काही तयार नाहीच मग मी पण आपले मूवी बघत बसलो, काय जणू थोड्या वेळात “याड लागलय” गान लागल तसे माझ्या मनाची गाण्याची तरंग आतल्या आत वाजू लागली होती, नकळत मी तिचा हात पकडला होता हे माझा लक्षात हि आले न्हवते पण गाणे संपेपर्यंत ती काही बोलली नाही पण पूर्ण गाणे झाले त्यानंतर पूर्ण मूवी झाला पण अजून माझा हात तिच्या हाता मध्येचं होता, तिला बघितले तेव्हा ती वेगळ्याच जगात होती, शांत अशी बसली, कसल्या तरी विचारात गुंतली होती. तिचा निरागस चेहरा बघत मीही चुप्प झाहलो होतो.
तीचा बदललेला मूड आता काहीसा मधागत गोड झाला होता, गुपचूप होती पण डोळ्यात तिच्या आभाळ दाटले होते काहीसे, मनात शांत वादळ होते कशाचे तरी, ओठांवर भरून आलेले शब्द फक्त व्यक्त होणे बाकी होते, ती नक्की काय बोलेल मला ह्याच प्रश्न पडला होता, तिने घेतलेले मौन आता माझा जीव घेत होता अन माझाकडून काही बोलणे हि होत न्हवते, काहीसा वेळाने तिनेच खांद्यावर डोके ठेऊन पुन्हा शांत झाली, थोडीशी हळव्या मनाची त्यामुळे अजून काळजी वाटते हिचे, मग मीच तिला इकडचे तिकडचे करत बोलू लागलो, तिचा मूड काहीसा बदलत होता, मघाशी एन्डिंगचा सीन बघून म्याडम थोड्या हळव्या झालत्या, त्यामुळे काही वेळासाठी ती आणि तिच्या मनातील विचारांनी वादळी रूप घेऊन हिला हळवे केले होते, नंतरून पुन्हा पोटाची आग ओकू लागली होती, तसेच आम्ही खाली गंधर्व हॉटेलात गेलो, नेहमी प्रमाणे पनीर-बटर सांगून एक मसाला पापड लगेच आण म्हणून ऑर्डर दिली, हिला जेवायच्या आधी मसाला पापड ज्याम आवडतो, जेवताना हि म्याडम अजून शांतच होत्या, नंतरून पापड आल्यावर मस्त कराम-कुरुम करत खात होती आणि हसतंच माझाकडे बघत होती, तिचे असे मिश्कील पने बघून हसणे मला थेट काळजात घाव करतात, मग तो वार झेलत मी पण पोटभर जेवलो, मग थेट समोरील गार्डन मध्ये जाऊन बसलो, हिच्या मनात अजून काही तरी कून-कून करत होते, जे तिला बोलायचे होते पण बोलणार कसे म्हणून पुन्हा चूप बसली.

मोबाईल मध्ये बघ, इकडचे-तिकडचे बोलत तिला मी थेट विचारले, काय झाले आणि काय बोलायचे आहे का तुला??.. तिला बोलताना शब्द सुचत न्हवते वाटत पण थोडीशी थांबली आणि बोलली..

“सैराट पिच्चर मधला शेवटचा सीन बघून मला जरा घाबरल्या गत होत आहे रे..! मनात सारखे काही न काही येत आहे...!”

अरे...असे आहे होय... मग तिच्याकडे बघून मी जोराने हसू लागलो, आणि हि पण गप्प थंड एक्ष्प्रेशन देत माझाकडे बघू लागली, मग पुन्हा मला चिमटे घेत राग माझावर ओकू लागली होती, तिला माझा मनात काय आहे हे ऐकायचे होते पण नक्की बोलावे कसे हा विचार करत मी हसणे माझे चालूच ठेवले होते, पण पुन्हा नाकाच्या शेंड्यावर राग धरून हि गप्प झाली, मग पुन्हा तिला लाडी-गोडी लावत तिला म्हस्का मारत बसलो काही वेळ.

आमच्यातला सवांद झाला आणि तिला समजवले हि, तिला थोडासा आधार देत पुन्हा तिचा मूड फ्रेश व्हावा म्हणून एक आयीस-क्रीम खाऊ घालून तिला फ्रेश केले आणि निघालो घरी आम्ही. तिला तिच्या ठिकाणे सोडले आणि एक हलकीशी स्माईल देत तिचाकडे बघून बोललो..

“मग कधी जायचे पळून आपण?!!” ....

**समाप्त**

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

 

#याड_लागलंय ©® #सैराट #jeet #blogger #sairat

-------------------
जितेंद्र वाजे ©®
०६-१२-२०१७