Tuesday, August 23, 2016

पन्हाळा ते पावनखिंड प्रवास ५५kms चा..



स्वप्न सत्यात उतरल्यावर त्याला उराशी कवटाळून जगलेले दोन दिवस म्हणजे पन्हाळा ते पावनखिंड केलेला ट्रेक....

जीवाची पर्वा नं करता बेफिकीर पणे केलेली सुरवात.... जायचं कसे ते माहित नाही सोबत किती ते माहित नाही, त्यांची ओळख नाही तरी भावाहून सखे वाटणारी भावबंधु भेटले प्रवासाला सुरवात झाली... चिडीचूप पाडलेला बोलक्या स्वभावाला नवी पालवी फुटावी तशी अनोळखी भावांशी गप्पा सुरु झाल्या..नुकत्याच भेटीत आपलेसे झालेले मित्र त्यांचा रमलेला मी अशाने झाली सुरवात प्रवासाला..

पन्हाळ्याचे मुख दर्शन घेऊन आम्ही मागच्या बाजूने गड उतरू लागलो, गड पाठीशी ठेवत पायांनी आपला मर्जीने रस्ता पकडून पाऊले पडू लागले, छोटस गाव सोडून भाताची शेतीतून बांधावरून चालू लागलो, थोडासा जंगल प्रवास करून पून्हा एक पार करून मसई पठारावर पोचलो, मसई पठार म्हणजे नुकत्याच लग्न झालेल्या नवं वधु वाणी नटलेले वाटत होते, अख्खा पठार हा हिरव्या शालूने वेढला होता, आकाशी निरागस ढग, नजर लागावी असे सौंदर्य वाटत होते पठाराचे, पावसाची जराशा सरीने त्याचे रूप अजून मोहक वाटत होते, घोंगावणारा वारा अंगाशी खेळू पाहत होता, ऊर भरून आल्यावानी आनंदाची लाट ओसंडून वाहत होती मनात, गप्पा गोष्टींचा फडच लागला होता चालता-चालता, आणि परंपरेने पोरांनी फोटूनचा स्नेह वर्षाव सुरु केला, कोणास थांबवावे न कोणास टोकावे अश्या मूलमंत्राने सर्वांनी ट्रेक ला सुरवात खेलती त्यामुळे बेफिकीर पणे फोटू काढत सर्व आपला मज्जाव साधत होते. हिरव्या गालीचाला पायाशी असलेल्या मऊ वार लादिला तुडवावे तसे चालू लागलों, जागो जागू पावसाळी पाण्याचे कुंड दिसत होती, काहीशा पालवी फुटलेली झाडांचा काड्या हवेचा हेलकावाने झुलत होत्या, पठारावरील जनावरांची चंगलं होती, हिरव्या खाऊचा ते बेहिशेब पणे त्यावर ताव मारत होती, आम्हीच साला गरीब तेथे पाठीशी गाठोडे पेलवत चालत होतो, निसर्ग हा मायबाप, होय खरच मायबाप त्याचे मायाळ हद्दीत आम्ही चालत होतो, बघता बघता पठार संपवत उतार आला आणि डोंगर रांगाचे नजराणे दिसू लागले, डोळ्याचे पारणे फिटू लागली इथला नजराणा पाहून खरच...

आता पठार पार करून उतरू लागलो आम्ही झाडी झुडपे बाजूला सारत वाट काढू लागलो, जरासा फरक पडू लागला मागच्यान मधे आणि आमच्यात, पण फारसा दुरावा टिकला नाही थकलेल्या अंगानी आळवणी द्यायला सुरवात केली होती त्यामुळे आम्ही बसत-उठत आघाडी घेत होतो, मग एका ठिकाणी थांबण्याचे ठरले दुपारच्या जेवणाला थांबलो सर्व. एव्हाना भुकेच्या कावळ्यांनी आळवणी देणे केव्हाच सुरु केलत तर त्यांची शांती होणार असे वाटू लागले आणि आम्ही बसलो जेवायला, आमच्यातल्या एकाने अंडा-मसालाचा डबा उघडला, सर्वांची नजर जशी पडली तशी सर्वांनी गिधडा वाणी झडप मारली त्यावर प्रत्येक जण आपला हिस्याला येईल तेवढे घेण्याची धडपड करत होते, आम्हीच साला निरागस श्रावणवासी गप पिठलं-भाकर तोडत गुमान बसलो, चुकीच्या वेळी योग्य ती गोष्ट समोर आल्यावर जो त्रास होत होता तो काहीसा जाणवत होता मला, मग पोटाची शांती करून सर्वांनी कूच पुढच्या प्रवासाला घेतली. बरच अंतर कापून झाल्यावर पायांचा तळव्याची कुहू ऐकू येत होती तरी त्यांना दुर्लक्षित करत मी पुढे चालत होतो, जाताना आपल्याला नवीनच वाटणारी फुलांचे दर्शन होत होते मग काय मला तेवढेच निम्मित, त्यांचे सौंदर्य मोबाईल मध्ये टिपत प्रवास सुरु होता, 
कधी गाव तर कधी पुन्हा जंगल तर कधी डोंगर असा तडजोडीचा पल्ला आम्ही गाठत होतो, पावसाळा हा कोकणावर फारच मेहेरबान ते खरच आहे अख्खा मुलुख पावसाने झोडपून काढला होता इथला कारण जाताना नगण्य पावसाळी झरे वाहताना दिसत होते, काहीशा ठिकाणी चिखल तर असा होता कि बस्स, पडेल तेथे पाय हा फसत होता, चिखलात पाय हे सटकत होती, चांगला खेळ चालू होता आमचा, शेती-शिवार मस्त हिरवी गार पसरली होती चोहीकडे, आम्ही भाताचा बांधाहून तोल सांभाळत चालू लागलो, बघता-बघता सकाळची दुपार झाली तरी काय मुक्कामाचे ठिकाण आले नाही, तसच चालत राहिलो शेवटी संध्याकाळी काय ते पोहचलो आम्ही मुक्कामी, गेल्यावर तो चहा आणि सर्वांनी आप आपले खाऊ काडून हादडने सुरु केली, मस्त फ्रेश होऊन घरात आम्ही बसलो, सर्वांनी आप आपले अनुभव सांगितले, चांगले विचार काहींनी सांगितले, खूप दिवसांनी असा मोकळा व्यासपीठ भेटल्या वाणी झाले मला, वेळ सरत गेली थोड्या वेळाने जेवण झाले, झोपण्याची तयारी झाली आणि झोपले सर्व जण, सगळेच पुरती थकले होते मग लगेच झोप लागणे सहाजिकच.....
जुन्या काळात कोंबडा आरडला कि सकाळ आणि उठायचची क्रिया होती पण आता काय ते अलार्म लावा आणि उठा असेच चालते, मग काय अलार्म आरडला सकाळचा सहाला आणि एक एक जण अंथरुणात नागीण नृत्य करत उठू लागले, बघता बघता पुरती फौज जागी झाली आणि तयारी ला लागली, मी आणि माझा नुकताच झालेला मित्र ठरलेला पुणेरी थाटात अंघोळीला ओढ्याला गेलो, कारण ते आमचा रक्ताताच नाही हो बादली भर पाण्यात अंगाची लाही-लाही मिटवायची, मस्त पावसाळी ओढ्यात जाऊन अंघोळ केली भले ते थंडीनं कुडकुडत होतो पण अंघोळी नंतर पुन्हा नवीन जन्मल्या वाणी वाटत होत, आवरून साऱ्यांनी पोह्यावर ताव मारत नाश्ता संपवला आम्ही ते पोह्याचे रसिक दोन-तीनदा प्लेटा हदडल्या :p ....

पुन्हा चिखलात पाय रोवत आम्ही राहिलेला प्रवास सुरु केला, ग्रुप चा फोटो कडून आम्ही जंगल वाट पकडत चालू लागलो, कोकणातल्या डोंगर रांगाचे दर्शन हळू-हळू होऊ लागले कुठं तरी लांब पसरलेली डोंगरांची रांग, झाडा झुडपात गर्द पणे लपलेली जंगल वाट, लाल चिखलानी माखलेली पायवाट, मधेच साचलेले डबके, डोंगरांच्या घळीतून वाहत येणारे ओढे, त्यांचे रूप एकदम शुभ्र, निथल, पंधरा दुधावानी स्वच्छ त्या पाण्याचे सौंदर्य, काटेरी झाडांनी आडवलेली वाट, त्यातून सावरा-सावर करत काढलेली वाट, डोक्यावर झाडांचा फांद्यांची व्यापलेले मायाळ छत, बरचस सुख हे नकळत पदरी पडत होते आज, पायांनी आता दुखण्याचे बोंबा-बोंब मारणे केव्हाच सोडले होते त्यामुळे कालच्या पेक्षा आज त्यांचे दुखणे हे सुखद भासत होते मला, कोकण म्हणजे भाताची शेती, खरच जाताना असंख्य भाताची पेरणी केलेले तुकडे दिसत होते, त्या बांधावरून वाट काढत आम्ही चालू लागलो होतो, मोबाईल ला नेटवर्क पासून मुक्त ठेवले होते, थोडं चालून मग एखाद गाव लागत होत मग पुन्हा डोंगर रांग असा प्रवास आमचा तर घड्याळाचा काटा जस जसा पुढे जात होता तस पोटाचे कावळ्यांनी हल्ला बोल सुरु केला होता, काही वेळानी डांबरी रोड लागला आणि सुटकेचा श्वास सोडला बाबा सर्वांनी, पांढरेपाणी गावात आलो जेथे जेवणाची सोय खेलती, तेथे पोहचतात वाढलेल्या ताटावर स्वार झालो आणि भान हरवत काय ते पोटाची आग मिटवली सर्वांनी, जेवण आटपून आम्ही निघालो पावनखिंड कडे, पुन्हा ६kms चा प्रवास पण आता ते काहीच वाटत नव्हता तर काही वेळातच तेथे पोहचून आम्ही काहीसा वेळ घालवला मग आता घरी जायची ओढ ती लागली होती आणि आमचा बस कडे सर्वांचे डोळे हे लागले होते, संध्याकाळचा ६-७ ला बस आली आणि आम्ही परतीचा प्रवासाला लागलो......

हे दोन दिवस खरच आठवणीत राहण्याजोगे, प्रवासात काय-काय अनुभवले हे शब्दात सांगणे खरच अवघड तरीही शब्दांची काहीशी मांडणीचा प्रयत्न केला, प्रवास ५५kms चा हा जीवा-भावाचा होता खूपस जगलो हे दोन दिवस...

.................
जितेंद्र वाजे
२२.०८.२०१६

#Travel_Blog
#पन्हाळा_पावनखिंड२०१६