Tuesday, December 5, 2017

याड लागलंय.. ©®

याड लागलंय.. ©®
याड लागलंय.... खरच याड लागलं होतं.. आता फ्ल्याश ब्याग मध्ये जाण्यात काही अर्थ नाही पण काही मधाळ आठवणींना पाझर पुठला कि जिव्हारी गोडवा पसरतो आणि आठवणींच्या गोड तलावात बुडून जाण्यास मनास कोणीही थांबवू शकत नाही, अश्याच त्या सैराट मय दिवसात घालवलेले, जगलेले दिवस आठवले म्हणजे “याड लागलंय” ह्या गाण्याची आणि सैराट मुविच्या त्या दिवसातली आठवण...
..सकाळ होऊन दिनकरराव नव्वद अंशाच्या कोनात येऊन उभे होते आणि ते पण तळ तळत्या उन्हाची झळ माझा चेहऱ्यावर आली होती, डोळ्यांनी चीर-मीर करत उघडण्याचा प्रयत्न करत माझी झोप उडाली, आता किती वाजले ह्याचा मला अंदाजच नाही, सकाळचे खूप वाजून गेले होते, अंगातला आळसं झटकत उठलो आईला चहाची मागणी गेली, तसा चहा झालता सकाळचा घरात पण आता माझासाठी पुन्हा!, चहा एक कप घश्या खाली उतरवला तेव्हा कुठ माझी झोप पूर्ण उडाली, सकाळची अंघोळ आटपून मी आवरून घेतले, ब्याग-बिग असले काही नाही आपले मग गाडीची चावी घेतली, एक वही सोबत बसं आणि निघालो बाहेर..
ठरल्या वेळात “ती” बस स्त्यांडला थांबली असेलच असे गृहीत धरून मी निघालो, काही वेळात स्त्यांडला पोहचलो, तिथे ठरल्या वेळेत म्याडम पोहोचल्या होत्या, मला तसा वेळ झालता म्हणा आणि ते तिच्यासाठी सवयच झाली होती पण त्याचा राग निघतो म्हणा कधी तरी, गाडी तिच्या समोर उभी केली अन तिच्या कड बघत बसलो, चेहर्यावर स्कार्फ, ब्याग खांद्याला अडकवलेली, हातातील घड्याळ बघत ती माझाकडे करड्या नजरेने बघत होती, तिच्या दुसर्या हातातील डायमंडची ब्यांगल उन्हात मस्त चमकत होते, स्कार्फ मध्ये तिचे काळेभोर डोळे कातील दिसतात हे तिला सांगून दमलो पण आज तिने डोळ्यांना काळ्या रंगाची डार्क लायनर लावली होती त्यामुळे त्या काळ्याभोर मायाळ डोळ्यात मी आज पुन्हा फसलो होतो, ती जवळ आली मग पुन्हा तिच्या तिखट शब्दात तेच रोजचे गाराने ऐकवत झोडपू लागली, माझ मग काय गुमान ऐकत बसलो, तिचे झाले आणि थांबली आता, मग मीच तिला डोळ्यांनी ईशारी करून बस बोललो, ती बसलिही, तिने बसताना खांद्याला जोरात हिचका देत बसली, हे असे तिचे खट्याळ वागने चालूच असते म्हणा त्यात काही नवीन नाही.
ती रागात असली कि गाडीवर ती एक इंच लांब होऊन बसते, जी पर्यंत हिचा राग शांत होत नाही तोवर ती काही बोलत नाही मग ती गुमान बसली मागे, गाडी टिळक रोडने घेऊन थेट रामनाथला थांबलो, हिचा तिखट राग शांत करण्याचे रामबाण उपाय म्हणजे झणझणीत मिसळ हिला चारायची, हॉटेलात जाऊन दोन मिसळ सांगून मी मोकळा झालो, टेबलावर दणकन बसत हि समोर माझा, चेहऱ्यावरचा स्कार्फ काढून तिने ठेवला बाजूला, तिच्या मागच्या बाजूला जोराचा पंखा चालू होता त्यामुळे हिचे केस त्या हवेच्या हेलकाव्याने हवेत उडत होती, त्या केसांना सावरत हिची गडबड झाली, मग स्वताच काकांना पंखा कमी कारायला सांगून ती पुन्हा माझापासून नजर चुकवून ती मोबाईल मध्ये घुसली, समोर माझा असताना मोबाईल मध्ये घुसलेले मला आवडत नाही हे तिला ठाऊक असते पण मुद्दामून खोड काढण्यासाठी माझासोबत बोलायचे सोडून हि मोबाईलमध्ये घुसून बसली होती. मग देवकृपेने समोर मिसळची प्लेट आमच्या दोघानसमोर....

मिसळची वैवस्तीतरित्या वैवस्था लाऊन तिला घेऊन शनिवारवाड्यात घेऊन गेलो, मग हिच्या पोटाची शांती केली तेव्हा कुठ राग शांत झालता थोडा, आतमध्ये जाऊन आम्ही बसलो, हिला मनवयाचे माझे शर्तीचे प्रयत्न चालू होते, मग नंतर काय जणू माझा मनात आले आणि हिला मी मंगला ठेटरला घेऊन गेलो, तेथे गेल्या नंतर पाहिले तर “सैराट” चे पोस्टर लागले होते, ह्या मुव्हीचे गाणे ऐकून मी तसा दिवानो झालतो पण तो बघण्याचा योगा-योग तो आला न्हवता, पण आज अचानक बघण्याचे माझे ठरले, पोस्टरवर आर्ची-परश्या चित्र मला भन्नाट वाटले होते त्या पोस्टरला बघून माझा मनातले वाईलंट वाजू लागले होते, ओठांवर गाण्याची बोल गुणगुणू लागले होते, हाताची ताशेरे झाल्यागत त्यांची हालचाल होऊ लागली होती, मग तिकीट घरात जाऊन दोन कॉर्नरची तिकिट्स घेतली, हिच्या चेहरयावरच्या धुडगूस मूडचा पत्ता अजून मुक्कामी होता अजून, मी तिला चल म्हणत आतमध्ये गेलो मग सीट पाहून बसलो, मूवी सुरु झाला तरी म्याडम अजून काय माझाकडे बघायला काही तयार नाहीच मग मी पण आपले मूवी बघत बसलो, काय जणू थोड्या वेळात “याड लागलय” गान लागल तसे माझ्या मनाची गाण्याची तरंग आतल्या आत वाजू लागली होती, नकळत मी तिचा हात पकडला होता हे माझा लक्षात हि आले न्हवते पण गाणे संपेपर्यंत ती काही बोलली नाही पण पूर्ण गाणे झाले त्यानंतर पूर्ण मूवी झाला पण अजून माझा हात तिच्या हाता मध्येचं होता, तिला बघितले तेव्हा ती वेगळ्याच जगात होती, शांत अशी बसली, कसल्या तरी विचारात गुंतली होती. तिचा निरागस चेहरा बघत मीही चुप्प झाहलो होतो.
तीचा बदललेला मूड आता काहीसा मधागत गोड झाला होता, गुपचूप होती पण डोळ्यात तिच्या आभाळ दाटले होते काहीसे, मनात शांत वादळ होते कशाचे तरी, ओठांवर भरून आलेले शब्द फक्त व्यक्त होणे बाकी होते, ती नक्की काय बोलेल मला ह्याच प्रश्न पडला होता, तिने घेतलेले मौन आता माझा जीव घेत होता अन माझाकडून काही बोलणे हि होत न्हवते, काहीसा वेळाने तिनेच खांद्यावर डोके ठेऊन पुन्हा शांत झाली, थोडीशी हळव्या मनाची त्यामुळे अजून काळजी वाटते हिचे, मग मीच तिला इकडचे तिकडचे करत बोलू लागलो, तिचा मूड काहीसा बदलत होता, मघाशी एन्डिंगचा सीन बघून म्याडम थोड्या हळव्या झालत्या, त्यामुळे काही वेळासाठी ती आणि तिच्या मनातील विचारांनी वादळी रूप घेऊन हिला हळवे केले होते, नंतरून पुन्हा पोटाची आग ओकू लागली होती, तसेच आम्ही खाली गंधर्व हॉटेलात गेलो, नेहमी प्रमाणे पनीर-बटर सांगून एक मसाला पापड लगेच आण म्हणून ऑर्डर दिली, हिला जेवायच्या आधी मसाला पापड ज्याम आवडतो, जेवताना हि म्याडम अजून शांतच होत्या, नंतरून पापड आल्यावर मस्त कराम-कुरुम करत खात होती आणि हसतंच माझाकडे बघत होती, तिचे असे मिश्कील पने बघून हसणे मला थेट काळजात घाव करतात, मग तो वार झेलत मी पण पोटभर जेवलो, मग थेट समोरील गार्डन मध्ये जाऊन बसलो, हिच्या मनात अजून काही तरी कून-कून करत होते, जे तिला बोलायचे होते पण बोलणार कसे म्हणून पुन्हा चूप बसली.

मोबाईल मध्ये बघ, इकडचे-तिकडचे बोलत तिला मी थेट विचारले, काय झाले आणि काय बोलायचे आहे का तुला??.. तिला बोलताना शब्द सुचत न्हवते वाटत पण थोडीशी थांबली आणि बोलली..

“सैराट पिच्चर मधला शेवटचा सीन बघून मला जरा घाबरल्या गत होत आहे रे..! मनात सारखे काही न काही येत आहे...!”

अरे...असे आहे होय... मग तिच्याकडे बघून मी जोराने हसू लागलो, आणि हि पण गप्प थंड एक्ष्प्रेशन देत माझाकडे बघू लागली, मग पुन्हा मला चिमटे घेत राग माझावर ओकू लागली होती, तिला माझा मनात काय आहे हे ऐकायचे होते पण नक्की बोलावे कसे हा विचार करत मी हसणे माझे चालूच ठेवले होते, पण पुन्हा नाकाच्या शेंड्यावर राग धरून हि गप्प झाली, मग पुन्हा तिला लाडी-गोडी लावत तिला म्हस्का मारत बसलो काही वेळ.

आमच्यातला सवांद झाला आणि तिला समजवले हि, तिला थोडासा आधार देत पुन्हा तिचा मूड फ्रेश व्हावा म्हणून एक आयीस-क्रीम खाऊ घालून तिला फ्रेश केले आणि निघालो घरी आम्ही. तिला तिच्या ठिकाणे सोडले आणि एक हलकीशी स्माईल देत तिचाकडे बघून बोललो..

“मग कधी जायचे पळून आपण?!!” ....

**समाप्त**

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

 

#याड_लागलंय ©® #सैराट #jeet #blogger #sairat

-------------------
जितेंद्र वाजे ©®
०६-१२-२०१७







Thursday, November 23, 2017

कैलासगड भ्रमंती २०१७

कैलासगड भ्रमंती २०१७ ©®

पुण्याहून काही कोस लांब असलेला हा रौद्ररूप धारण असलेला किल्ला आज पर्यंत कसा नजरेआड राहिला काय माहित राव, ताम्हिणी आणि लोणावळा डोंगर रांगेच्या गर्भात वसलेला हा किल्ला म्हणजे दुधावरील साय आहे, मुळशी टाटा धरणाच्या फुगवट्याला लागून हा तळ ठोकून बसलेला किल्ला, किल्ला म्हटलं तर समोर येणारे चित्र म्हणजेच बुरुज, तटबंदी, दरवाजे, महाल, इतिहासाची खून, मंदिर अजून भरपूर काही येते पण ह्या किल्ल्यावर असे काहीच नाही. किल्ल्याची ओळख/जन्म असे कि हा घाटावरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जायचा असे वाचले मी म्हणजे टेहाळणीसाठी स्वराज्यात आलेला हा किल्ला, किल्ल्यावर एक भगवा ध्वज आणि महादेवाची पिंड आहे बाकी मोकळे सटान असे पठार, पाहण्यासारखे म्हणाल तर मोकळा निसर्ग, किल्लावरील मनमुराद मोकळे पठार, ते झाड-झुडपाची गर्दी, धरणाच्या पाण्यानी घातलेला वेढा असे अफाट सौंदर्य ह्या कैलासगड उर्फ घोडमांजरीच्या डोंगराचे..

थंडीच्या बोथट गारठ्यानी सकाळी गाडी चालवताना अतोनात कष्ट होत होते पण तरीही हा किल्ला सर करायचे म्हणून आम्ही निघालो घरातून सकाळी सहाला, पुढे मल्हार माची हॉटेल जवळ पोटा-पाण्याची सोय लाऊन आम्ही ताम्हिणी-लोणावळा रोडला लागलो, तिथल्या अंधारबन ट्रेक पोइंटला फोटा-फोटी करून आम्ही पुढे वडूस्ते गावातून पुढे किल्याच्या खिंडीत पोहचलो, खिंडीतनं गडाच्या डोंगर सोंडेला धरून समोर दिसणाऱ्या वाटेला पकडून आम्ही वर चढू लागलो, सुरवातीलाच दमछाक करणारी डोंगरचढाई घाम काढणार पुढे हे तर जाणवले होते पण हवशेला मर्यादा नसते म्हणतात न तसेच काही तरी मनाशी धरून आम्ही वर चढू लागलो, डोंगर तसा तीन-चार डोंगर टप्यात आहे त्यामुळे त्याला डावीकडून वळसा देत आम्हाला चढायचे होते आणि तसेच उराशी जीवाला धीर देत आम्ही गड डोंगर चढू लागलो, गडाच्या डावीकडील पायवाट पकडत आम्ही चालू लागलो, प्रत्तेक पावलात घनदाट गवत-झुडपाला सारत आम्ही निघालो होतो, डावीकडील दरी बघून घाबरं-घाबरं होणार मन सावरत, लटपटनाऱ्या पायांना ताठ ठेवत आमची चढाई चालु होती, काही काळ घसरणाऱ्या पायाला सावरत आमची चढाई चालू होती, गडाला तसा आम्ही गोल वेढा देत चाललो होतो पण डोंगर काय तो थांबायचं नाव घेत न्हवता आणि आमचा दम काही भरत न्हवता, आपल कस बस वर चढून खुल्या पठाराला दिलखुलास मन भरून बघून, हिंदाडून आम्ही वरचा अक्खा पठार फिरून काढला, वरनं सह्याद्रीच्या डोंगररांग ह्या कधी घायाळ, कातील, दिलखुलास, आल्हाद, मनमुराद, अभेधक, आकस्मित, चमत्काराचा मेरू पर्वत, महाराष्ट्रच हिमपर्वत रांग असे असे बरेच म्हनाव ह्या सह्याद्रीच्या पर्वत रंगांना ते कमीच आहे आणि अपुरेच आहे म्हणा.... असा हा अखंड सह्याद्री बघितला, डोळ्यात सामावला, मनात भरला, उराशी कवटाळला....आणि आम्ही पुन्हा घरच्या मार्गाला लागलो..


#भटकंती #कैलासगड #प्रवास_वर्णन #सह्याद्री


---------------------
जितेंद्र वाजे

२४-११-२०१७ 

Wednesday, October 25, 2017

तिच्या विळख्यात..

तिच्या विळख्यात.. ©®

सकाळी ऑफिसला मी घाईतचं निघालो, तिने टिफिन भरून टेबलावर ठेवला होता. तिला कडी लाऊन घे म्हणत मी बाहेर पडलो, रोजची सवय जाताना तिला हलकीशी स्माईल देऊन मी खाली उतरायचो पण आज मी जरा जास्तच घाईत होतो त्यामुळे खाली जाऊन गाडीला कीक मारून ऑफिसला निघालो, महिनाअखिर होता त्यामुळे कामाची गडबड चालू होती ऑफिसात आणि हेचं डोक्यात फिरत होते, गाडी चालवताना मला का जणू तिची आठवण येत होती तिचा बोलका चेहरा डोळ्या समोर येत होता, मी निघताना आईचे पूजा-पाट चालू होते कानाशी घंटीचा आवाज तो अजून किन्न केल्यागत घुमत होता पण निघताना हि किचन मधून माझा कडे मिश्कीलपणे हसून बघत होती पण मी तेव्हा रोजच्या गत आपलं तिच्याकडे बघून तयारीला लागलो होतो पण तिचा चेहऱ्यावरील हाव-भाव काही तरी मला सांगत होते आज पण त्यावर माझा डोक्याची बत्ती पेटली न्हवती, ट्राफिक जशी सरकत होती तसं तसा मी पुढे होत चाललो होतो, का जणू तिला मला आज काहीतरी सांगायचे होते आणि मी ते ऐकून न घेताच निघालो होतो असा काहीसा मला भास होत होता, ऑफिसला मी पोहोचलोच, पार्किंग ला गाडी लाऊन खालच्या चहा टपरीवर जाऊन एक चहाचा अर्धा कप घेतला आणि वर पोहचलो ऑफिसला..

ऑफिसातली तीच रेटलेली कामकाम आपल सुरु करत दिवस सुरु झालता, मंथएंड त्यामुळे ऑफिस मध्ये सगळ्यांची कामाची गर्दी झाली होती, माझा म्यानेजर तर फिरकला पण नाही सकाळ पासून त्यामुळे कामाचा स्पीड अजून तरी जोमातच होता, मोबाईल सायलंट वर असतो रोज त्यामुळे त्याकडे पण लक्ष नाही, दुपारचे आता बारा होऊन गेले होते, लगबग जेवणाची वेळ पण झाली होती, टीमची सगळे जन टिफिन घेऊन कॅन्टीनला जायची तयारीला लागले तसं मग मी पण आपल निघालो, टिफिन मध्ये काय असते हे मला टिफिन उघडत नाही तोवर काय ते समजत नसते, बायकोची किमया काय चमत्कार घडवते हे ते टिफिन उघड्ल्यावरचं समजते, कॅन्टीन मधे जाऊन टेबलावर सर्व बसले, टिफिनच्या वरच्या डब्यात आज गोड शिरा होता, दुसर्या डब्यात माझी आवडीची शेपूची भाजी, तिसर्यात आपले नेहमीचे वरण-भात. मला जरासे उचकी लागल्यागत झाले, आता सकाळ पासून कोणाचे फोन आले कि नाही हे मी बघितलेच नाही कारण कामच एवढे होते आज, आमचे सर्व उरकून आम्ही रोजच्या ठिकाणी जाऊन जमलो, जाताना मोबाईल चेक केला, बघितले तर हिचे वीस ते पंचवीस मिसकॉल येऊन गेलते, मी जरा दचकलोच कि आज हिला काय एवढी कळ लागली कारण रोज कधी एक साधा कॉल नसतो आणि आज काय तर म्याडमचे एवढे कॉल, मी लगेच कॉल फिरवला हिला, समोरून तसे जाळ ऐकू येणार हे गृहीत धरले होते मी पण हिचे काही तर नवीनच आज, मला म्हणते कशी शिरा आवडला का? मी पण आपल गोड तोंड करत शिर्याची तारीफ करत तिला जाम खुश केले, म्याडम आज जरा भलत्याच मूड मध्ये बोलत होत्या, बोलणे झाले पुन्हा काम आपले अंगाशी घेत संध्याकाळ होई पर्यंत राबत बसलो, मग नंतर हिचा पुन्हा कॉल काय तर घरी लवकर या म्हणून, मी आपल हो ला हो बोलत ठेवला फोन, घड्याळाचा सातचा काटा पुढे गेलता मग आपले आवरून घरी निघालो, घरी पोहचलो आणि घरामधे घुसलो तसे आईची करडी नजर माझावर आणि मी मनात म्हटलं काय झाले मातोश्रींना आज मग पुढे आत जाऊन फ्रेश झालो, घरामधे चुळबुळ चालू होती ते मला काय समजले नाही, आईने पुन्हा माझाकडे बघत जवळ आली आणि कान पिळले, च्यायला आता काय केले मी, आईने ओरडत बोलून गेली कि बायकोची काळजी आहे कि नाही गधड्या, काही समजते कि नाही तुला असं काही तरी बडबडत होती, पण मी आपल गुमान ऐकत बसलो..

बेडरूम मध्ये मी गेलो, झोपताना हिला आता गोडीत विचारावे म्हणून जवळ गेलो, आज नक्की काय झालते ते मला काही अजून कल्पना नाही कि नेमके काय बोलायचे होते आईला, इथे हि अजून वेगळ्याच ख़ुशी मध्ये होती, तिने आज माझा जीव घ्यायचे ठरवले होते वाटत, कारण डोळ्यांना काळसर काजळ लाऊन, शेहरयावरचा हलका मेकअप, कपाळावर चंद्रकोर, कानातले झुंमके तिचे मस्त डोलत होते, केसांना मोगरयाचा गजरा माळला होता, मोगरयाचा सुगंध मस्त खोलीत दरवळत होता, हिच्या खोडील स्वभावाची सवय आहे मला पण आज नेमके काय चालले होते तेच समजत न्हवते, तरीही आपले धाडस करून हिच्या जवळ गेलो, तिच्या बाजूला बसलो क्षणभर पण मी ब्ल्यांक झालतो, काय झाले म्हणत तिच्या कानाशी हळूच विचारारले, तिने हलकीशी स्माईल दिली, मी पुन्हा तिला लाडील आग्रहाने विचारून लागलो तिने मग डोळे बंद करून, काही वेळ शांत बसली, मग पुन्हा माझा कानाशी येऊन हलक्या आवाजात काही तरी बोलून गेली..

हिने कानाशी बोलून गेलेल्या चार शब्दात माझे जग बदलून टाकले होते, मी कावरा बावरा झालो होतो, तिच्या भरलेल्या डोळ्यांना बघत, खुलून आलेल्या चेहरावर हात ठेवत माझा आनंद मी आवरण्याचा प्रयत्न करत होतो, तिला काही कळण्या आधीच तिला हलीकीशी मिठी मारली, तिच्या भरलेल्या डोळ्यात मी पाहत, तिला जवळ ओढले, मनाशी फुललेल्या मोगर्याला मी ओठांवर आणत तिला मी “थंक यु डियर फॉर गुड न्यूज” म्हणत तिच्या फोरहेडवर कीस करत मी मोकळा झालो..
तिने सांगितलेला बातमीने माझे अवघे जग बदलले होते रात्री पासून, सकाळी जाग मला पहाटेच आली होती, उठ्ल्यावार तिच्याकडे पहिले ती गाड झोपेत होती, तिला उठवायचा मी आता अलगड पना माझाकडून आता होतं न्हवटा, तिच्या चेहऱ्यावरची गोड स्माईल बघून माझा ओठांना पण हसु आवरले नाही, तसेच बाहेर बालकनीत जाऊन थांबलो समोर तांबड आलेल्या आकाशाकडे बघत मी निवांत मनाशी विचार करत बसलो, आजची सकाळ माझासाठी काहीतरी नवीन वर्षाची पहिली सकाळ असल्यागत भासत होते, काही वेळाने बालकनीत आलेल्या कोवळ्या उन्हात बसलो, सकाळच्या कोवळ्या उन्हात थांबताना मला क्षणभर आनंद काहीसा गोडसर वाटू लागला होता, हि झोपेत गोड तर दिसतेच पण आज तिच्याकडे बघताना मला भलताच गोडवा मनामधे घोळू लागला होता. तिला त्रास द्यायचे नाही ठरवून मी चहा बनवला आणि कपात घेऊन बाल्कनीत जाऊ थांबलो..

माझ्या मनाच्या आनंदाचे वारे जोरानं घुमत होते आज, सारखे हिला आवडणाऱ्या गोष्टींची लिस्ट समोर येत होती, तिला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे - चोकलेट, कॅडबरी, पाणी पुरी, मिठायीतील एक एक प्रकार, फिश, नॉन वेज मध्ये तसे भरपूर काही, व्हेज मध्ये तिची एक एक लीस्ट आहे, माझ्साराखीच ती मिसळ वेडी, तिला वेस्टर्न फूड नाही आवडत कारण तिचा आपल्याच खवई जगात तिला रमू वाटते, बाहेर हुंदडायला, फोटो काढ, शॉपिंग, तिला साडी फार आवडते आणि ती साडीत दिसते पन सुंदर... असे बरेच काही येत होते मनात कारण आता तिची हौस पुरवण्याची एक लाट आली असल्यासारखे झालते, तिच्यासाठी काय करू आणि काय नाही, तिची काळजी अजून कशी चांगल्या पद्धतीने घेता येईल ह्याच विचारात मी होतो काही वेळ, माझा डोक्यातले भ्रमांड घुमत हते, पहिल्या दिवसाची पहिली सकाळ अशीच जात होती माझी, ठरल्याप्रमाणे तिने टिफिन देऊन मला ऑफिसला जायला मोकळे केले, ऑफिसात हि बातमी सांगणे मला काही बरे वाटले नाही म्हणू हे सर्व माझाच मनाशी गुप्त ठेऊन ऑफिसात गप्प काम करत बसलो होतो. संध्याकाळी मग घरी जाताना मस्त मोगर्याचा भरलेला गजरा घेऊन गेलो, तिला हळूच झोपण्या आधी तिला तो गजरा तिच्या पदरात ठेवला, तीची ख़ुशी वेगळीच रंग घेत होती आज, मी आपले तिच्यातले सात रंग बघत तिच्या कडे बघत बसलो, तिलाहि माहित होते माझी काय अवस्था झाली आहे ते., मी असे काहीतरी वेगळे आगळे करेन ह्याचा तिला अंदाज न्हवता, मग नंतर आमच्या गप्पा रंगल्या तिला ख़ुशी भेटेल अश्या काही जुन्या आठवणींची फोडणी देत तिच्या हसण्याचा मीटरला मी वाढवू पाहत होतो, काही वेळाने आम्ही झोपून गेलो..

आता ह्याचा पुढे उगवणारा दिवस हा माझासाठी तोला मोलाचा होता, पुढे लिहिण्या सारखे भरपूर आहे पण इथेच थांबतो, शब्दांचे काय त्यांना उराशी धरले कि पानभर ओलं करून जातात...

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

#तिच्या_विळख्यात ©®
#jeet
#blogger
-----------
जितेंद्र वाजे
२४-१०-२०१७













Monday, September 25, 2017

मनात सलत राहणारी गोष्ट.. ©®

मनात सलत राहणारी गोष्ट..


मनात सलत राहणारी गोष्ट.. ©®


थंडीची गार मौसमी दिवस ओसरत चालले होते त्यादिवशी, रात्र मोठी आणि दिवस लहान झाला होता, मनाशी काही तरी सलत होत पण काय ते काही समजत न्हवते, रात्र डोळ्यात तेल घालून जागून काडली, मित्राचा सकाळीच फोन आला, कुठे आहेस म्हणत मलाच विचारले, मग काही नाही म्हणत पुन्हा तो स्वताच शांत झाला, मला काही सुचेना कि हा सकाळच्या पारी फोन करून गप्प का ते, मी पुन्हा त्याला फोनवर व्यवस्थीत विचारायचा प्रयत्न केला पण तो समोरून काहीशा दबक्या आवाजात बोलू लागला, तू आताच्या आत्ता भेट मला, त्याची आवाजातील हळवे हुंदके मी जाणले पण मला हि काही सुचेना कि एवढा सकाळी काय झाले असेल ते, मित्र म्हटलं कि जीव कि प्राण माझा तो कोण हि असो लांबचा किंवा जवळचा, त्यामुळे मी गडबडीत माझी सर्व कामे आवरले आणि घाईतच त्याचाकडे निघालो, माझा गाडीचा स्पीड आता काळजीने वाढला होता, त्याच्या घराखाली जाऊन मी कॉल केला आणि तसाच तो काही वेळात आला पण खाली, लगबग गाडीवर बसला माझा आणि मला चहाचा टपरी वर चाल म्हणत तो गडबड करू लागला, सकाळच्या कोवळ्या उन्हात आम्ही हातामध्ये चहाचा कप घेत बाजूला असणार्या बंद टपरीच्या कठड्यावर बसलो.
ह्याच अजून काहीच नाही पण मलाच काळजीने मन भरू लागले होते, त्याला विचारू लागलो आता तरी बोल बाबा काय झाले ते, त्याचा पडलेला चेहरा अजून सुन्नच, माझा आता रागाचा पारा चढला आणि मी त्यावर खेकासलो, तसा तो हळू आवाजात बोलला..

“ अरे, तिचे लग्न आहे उदया..”

मला विश्वासच बसला नाही कि हा अचानक असे काय सांगू लागला, मी शॉक झालो आणि एकदम त्याचावर ओरडलो .. “काय....?”.. माझासाठीहि हा जरा धक्काच बसल्या गत होते, कारण काल परवा आम्ही भरपूर काही प्लान्स करून बसलो होतो कि ह्याचं जिच्यावर प्रेम आहे तिला कसे प्रोपोस करायचे ते, पण हा माणूस आज चक्क तिचे लग्न आहे आणि ते पण उद्या..! आमच्या दोघात आता शांतता पसरली होती, त्याची अवस्था आता खरच केविलवाणी होती, ते पाहून मलाच रडू येत होते कारण इतक्या दिवस आम्ही ज्या गोष्टी साठी धडपड करत होतो ते नाहीसे होणार असेच काहीतर झाले होते.

आम्ही चहा उरकून मग झेड ब्रिज ला जाऊन बसलो, तेथे गेल्यावर त्याला सविस्तर विचारणार होतो मी, तसे आम्ही बसलो तेथे आणि हा सुरु झाला सांगायला (पुढील सर्व त्या मित्राचा शब्दात..)..

..ती कधीच मन मोकळी न्हवती रे, ना कधी तिने मनातले सांगितले मला, साधे भेट म्हटलं तरी ती कधी तयार नसायची, का जणू घाबरायची कुठल्या तरी गोष्टीला, तिला माहित होते माझा मनात काय आहे ते पण का जणू ती समजून टाळल्या गत करायची, हटकून करायची कि काय माहित. तसा मीच भित्रा होतो म्हणा तिच्या सोबत बोलायचो, फोन करायचो आणि आमचे तसे व्हात्सअप वर पन बोलणे होयचे पण मला कधी विषय काढताच यायचा नाही, उगाच कुठल्या न कुठल्या विषयावर तीचासोबत बोलायचो, तिला केलेल्या कविताहि ती आवर्जून वाचायची आणि रिस्पोन्स द्यायची, मला साला मलाच नाही जमले तिला काही बोलायला, तिचा वाढदिवसाला घेतलेले ग्रीटिंग अजून घरातल्या कपाटामध्ये जपून ठेवले आहे, पण साला मलाच जमले नाही, कधी कधी ती बोलायची तिच्या घरच्यांनी स्थळ बघणे सुरु केले आहे ते, माझी तेव्हा जाम टरकायची, भीतीने माझे पाय घामाने ओले होयचे, तीची कळकळ मी तेव्हाच का नाही समजून घेतली, तिला नक्की काय बोलायचे होते हे मी तेव्हाच का नाही समजून घेतले, माझेच वेडसर वागणे अंगाशी आले माझा रे..
आज सकाळी तिचा गुड मोर्निंग चा मेसेज आला, मला बोलू लागली कि उद्या लग्न आहे म्हणून, मला धक्काच बसला रे, मला काहीच कळत न्हवते काय करावे ते, तिला आता काय रिप्लाय देऊ हेच समजत न्हवते, मग नंतर तिला मीचं विचारले आता सुचले का तुला सांगायला ते, ती बोलली कि माझे धाडस होत न्हवते कि तुला कसे सांगू ते, ह्याचा मला काहीच अर्थ लागत न्हवता, तिने लग्नाची तयारी केली, मुलगा निवडला, तिचे जमले, लग्नाची तारीख पण आली जवळ आणि हिला मला सांगायची हिम्मत का नाही झाली, तीचावर आता ओरडू कि काय करू अशी माझी अवस्था झालती रे, तिला तसे समजत होते कि माझी काय अवस्था झाली आहे ते, पण तिचे असे वागणे मला खरच पटले नाही, तिला भेटायचे आहे आणि ते पण आत्ताचा आत्ता, असे तिला बोललो पण तिची पण अडचणच होती रे, लग्न घरातील मुलगी कशी येणार भेटायला, माझा सारखा मूर्ख मीचं हे ठरलो आज, तिचा सोबत भरपूर बोललो, भरपूर विनवणी केली, बोलताना ढसा ढसा रडलो पण, त्याच काहीच होणार न्हवते आता हे मला समजले पण ती अशी अचानक लांब जात आहे, परकी होणार आहे, सोडून जाणार आहे, असे बरेच काही होणार होते एका दिवसात पण ते मला स्वतालाच पचत न्हवते, तिला माझा अश्या वागण्या मुळे टेन्शन येत होते पण तिच्या काळजी पायी मी माझ सर्व टेन्शन बाजूला सारून पुन्हा तिला बर वाटावं म्हणून मी बोलू लागलो..
तिचा काळजी पायी माझ हळवं, रडक, एकट, घूसमटलेलं.. मन आता आतूनच हुंदके देत तीचे ऐकत बसले होते, तिचा लग्नाची तयारी, तिची आज हळद, घरी आलेले पाहुणे, घरी चालू असलेला गोंधळ हे सर्व ऐकत बसलो, हिला माझी केलेली कोंडी आवडत होती वाटत, ती ज्या प्रमाणे लग्नासाठी तयार झाली होती ह्याचावरून तिला आता माझे काहीच देणे घेणे न्हवते ते मी जाणले आणि तिला माहित होते तिला काही त्रास होणार असे मी असे काही करणार नाही ते, माझ पुरत बुजगावण तिने केले हे माझा लक्षात आलते पण मी अजून तिचेच गाराने ऐकत होतो..

..ह्याने आता आहे नाही ते सर्व मला सांगून मोकळा झाला होता, ह्याचा कोरडा पडलेला आवाज, सुखलेले ओठ, गळून पडलेला चेहरा आणि बेजान झालेलं शरीर मला आता बगवेना झालते, जिवलग मित्र हा आणि ह्याची हि अवस्था खरच जिव्हाळी लागत होते, उदया तिचे लग्न होते, आणि हा बहादूर मला तिच्या घरी चल म्हणून माझा मागे लागला, पुरता वेडा झालता हा, मला आवरनं जरा कठीण झालते, पण हळव्या मनाचा होता काय बोलेल ते माझा समोरचं पण तिला काडीमात्र त्रास होणार नाही ह्याची खंबीर काळजी घेणार हा, शेवटी गळ्यात मिठी मारून खांदा ओला होई पर्यंत काय तो रडला, तिला ह्याची काहीचं कल्पना नसेल कि तिचा साधा एक मेसेज काय करून ठेवेल माझा मित्राचे, तेव्हा मलाही रडूच आलते पण आणि सावरले स्वताला आणि ह्याला धीर देऊ लागलो, पण हा हट्टी पण तेवढाच होता म्हना ह्याने मला तिच्या घरापाशी घेऊनच गेला, पण लांबूनच आम्ही तिचा घरची हालचाल पाहू लागलो, तिचा घरात लग्न आहे असे काहीच वातावरण न्हवते म्हणजे साधे केळीच्या पानाचे खांब पण न्हवती लागली, किवा कुठलाच गाजावाजा न्हवता तेथे, आम्ही तेथे भरपूर फेऱ्या मारल्या, तिच्या घरापाशी काही तास घालवले आणि निघालो घरी, ह्याचा पुन्हा हट्ट आता कि तिच्या लग्नाला जायचे म्हणून, एवढे सगळे होऊन हा माणूस लग्नाला जायचे म्हणून हट्ट करू लागला, तिला हा पुन्हा मेसेज वर बोलला वाटत कि “तू आता तयार असशील तर तुला पळवून न्हेतो पण तू मला सोडून नको जाऊस, तुझावर खूप प्रेम आहे माझे, काही पण करेन तुझासाठी..” तिला ह्याचा मध्ये फसायचे न्हवते म्हणजे आता हि वेळ न्हवती विचार करायची त्यामुळे तिने त्याला सरळ नकार देत बोलली..
“ जे नशिबात असते तेचं होते..”..

आता ह्यांचा दोघात जे काय सवांद होयचा हा मला आहे असे हुबे हूब सांगायचा, मला बोलायचा मन  मोकळे होते रे तुला सांगितले कि, मग मी पण ह्याचा लव स्टोरी मध्ये सामील होयचो, तिलाहि माझा चेहरा ओळखीचा झालता कारण हा माणूस ती समोर आली कि गार होयचा, त्याला तिच्या समोर बोलायची कधी हिम्मत झालीच नाही त्यामुळे ह्याचे इतक्या दिवस लटकले होते आणि ह्या लव स्टोरीचा क्लायमेक्ष हा असा होईल ते आम्ही कधी गृहीत धरले न्हवते..

ह्याची झोप उडाली होती आणि माझी झोप उडवली होती ह्याने, मला ह्याची काळजी वाटू लागली कि हा स्वताचे काही करून तर घेणार नाही ना असे भरपूर मनात येत होते माझे, त्यामुळे ह्याला मी एकत सोडलं न्हवते, तिचा लग्नाच्या दिवशी हा भावड्या तयार ना, माझा मागे धाड लाऊन बसला होता, रडून ह्याच्या डोळ्यातील पाण्याची नाळ वाहून आटली होती, डोळे चांगलेच लाल झाले होते, काही तरी खाऊन घे म्हणत मी मागे लागलो पण हा ऐकतो कुठे माझे, आम्ही दोघे आता तिचा लग्नाच्या मुहूर्ताला पोहचलो, वेळेतच गेलतो म्हणा पण मांडवाच्या बाहेर ह्याने मला थांबवले, आत ह्याला जायचे होते पण ह्याचे धाडस होत न्हवते तशी माझी पण तारांबळ उडाली होती, कारण इतक सोप नसते ह्या असल्या वेळेला येणे आणि हि वेळ सामोरे जाने ते, आत घोषणा झाली मंगलाष्टागाची.. बाहेर आवाज येत होता स्पष्ट आणि आम्ही समोरच उभे, ह्याची गडबड सुरु झाली, त्याचा हळव्या मनाची जिव्हाळी फुटली, पायाला कापर फुटली होती, थर थरणारे अंग त्याचे, मला त्याने थोडे लांब नेले तेथून, तोवर शेवटची मंगलाष्टागे सुरु झाली आणि आता हा पुरता खचला होता, तो सरळ खालीच बसला, ढसा ढसा रडू लागला, आता मला काहीच कळेना कि ह्याला कसे सावरू ते, पण इथे मला त्याचासोबत खंबीर थांबणे महत्वाचे होते आणि तसे मी त्याला आधार देत त्याला सावरले, एवढ्या हळव्या जीवाचा माझा मित्र असा ह्या अवस्थेत माझा समोर आणि मी काहीच करू शकत नाही पण करणार तरी काय मी, वेळ न्हवती, मुविमध्ये जसे धाखवले जाते ते इवढे साधे आणि सोपे नसते म्हणा. मला वाटत होते त्याने इमाजीन केले असेल तिचा सोबत मांडवा मध्ये कोणी भलताच असेल त्याचा सोबत तिचे लग्न होत आहे ते, ह्या जीव घेण्या कल्पनेपुढे कोणताही भारीतला भारी माणूस काही करू शकत नाही म्हणा..

तो दिवस आणि त्याने घातलेला धुमाकूळ सावरणे कठीण होते मला आणि त्याचा साठी हि ते कठीणचं होते त्या दिवशी तिला भेटणे, आम्ही तिला आत मध्ये जाऊन भेटलो हि मग पुन्हा तसचं लगेच मागे फिरत आम्ही निघालो हि बाहेर, कारण ह्याला तिथे जास्त वेळ थांबवणे मला जरा रिस्क वाटत होते, ह्याला त्याचा पेक्षा तिचीच काळजी होती त्यामुळ ह्याने असे काही केले नाही जेणेकरून तिला गालबोट लागेल, आम्ही तिला भेटलो आणि तेथून निघालो लगबगीने, तेथून आम्ही बाहेर आलो म्हणा पण त्याला मी मनातली एक शंका विचारली, तुला एवढा त्रास होत होता तरी तू का आलास हिचा लग्नाला, काय गरज होती, त्याने एक स्मिथ हास्य देत बोलून गेला..

“मला ती किती खुश आहे ते बघायचे होते लग्नात, बस म्हणजे नंतर मनात सलत नाही राहणार कि तिच्या मनातही माझाविषयी काही तरी होते...!.. मन आता मोकळे झाले रे माझे....”

ह्याचा ह्या अजब प्रकाराला बघून मी थक्क झालो, एवढ सगळ सहन करून हा माणूस सहज मावळलेल्या सुर्यागत शांत, निथळ, निरागस हाव भाव देत चालू लागला होता, म्हणजे जिच्या साठी जीवाचा आटा पिटा केलता आणि तिने असे वागावे आणि ह्याने असे सहन करावे हे काही तरी अजब होते, पण त्याला ती विसरणे शक्य न्हवते पण फ़क़्त आता काही सीमारेषा लागू झाल्या ह्यापुढे तिच्यात आणि त्याचामधे बस..

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक ©®

#मनात_सलत_राहणारी_गोष्ट.. ©®
#jeet #blogger #ती
-----------
जितेंद्र वाजे
२६-०९-२०१७







Sunday, September 10, 2017

पावसाळा आणि ती

पावसाळा आणि ती



पावसाळा म्हटलं कि चिखल, गडबड, गर्दी, सर्दी, गरम भजी, कडक चहा, वडापाव, गाडीवरून धुराड रपेट, अंग अंग ओल, अंगभर ओले कपडे, साचलेले डपके, ओसंडून वाहणारा ओढा, भरलेले रस्ते, कौलावरून पडणारे पाणी, त्या कौलाखाली ठेवलेली बादली, तीपण तुडुंब भरून वाहणारी, डोक्यावर घेतलेले घोंगडं, अंधारात गेलेली गल्ल्या........ बरच काही ते पाऊस म्हटलं कि येत राहते मनात.....

प्रत्तेकाची आठवण असते काही-न-काही पाऊस म्हटलं तर, तसे माझे पण असेच काही तरी झाले, ऑफिस मधून घरी येताना, काहीसा रिमझिम पाऊस चालू होता, रोजचेच आपले घर-ऑफिस-घर आणि मग आता पाऊस, हेक्टिक वैगरे काही नाही पण आपले चालू होते रोजचेचं, गाडीची काच तशी अर्धी खुली ठेवली होती, गार वार आत झोकावत होतं, कानाला चांगला मारा पडत होता त्यात ते गाडीत रेडीओ वर गाणे चालू झाले अचानक “रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम”, म्हणजे बाहेरच्या पावसाने सगळे बदलून बसला होता माझा मनातल्या मूडच्या वादळाला, मग काय घरी येई पर्यंत पावसाने चांगलीच भर घातली होती मनात माझा, गाडीतून उतरून मग घरापर्यंत येई पर्यंत माझा तोंडी त्याच गाण्याचे बोल पूट-पुटत होते, घरामध्ये आल्यावर कपडे बदलून मग ग्यासवर चहाला उकळीला ठेवले आणि किचनच्याच खिडकीतून बाहेर डोकावत निवांत थांबलो, पहाटेची वेळ होती, घरातले सगळे गाड झोपलेले त्यामुळे पिनद्रौपची शांताता नि त्यात बाहेर पडणारा पाऊस आणि ग्यासवर उकळनारा चहा....हुशस्स्स...

..खिडकीच्या जाळीच्या स्लाईड मधून बाहेरचा पाऊस स्पष्ट दिसत होता, पावसाने रस्त्यानि वाहनारी पाण्याची नाळ त्या अंधारातही मोहक भासत होती, लाईटच्या खांबाची तांबडी लाईट त्यामुळे तो ओलसर रस्ता मला काहीसा सांगत होता कि काहि तरी आठवण करत होता ते काही समजत न्हवते, पण मनाची काहीशी चुळबुळ चालू झाली होती माझात, आणि त्यात चहाला चांगली उकळी पण आली होती, ग्यास वरील चहाचे पातीले चांगलचं वाफा सोडत होत आणि त्याच्या आत चहा उड्या मारत होता, थोड्या वेळात ग्यास बंद करून लगेच कपात चहा ओतला नि थेट आतल्या खोली मधे येऊन दार लाऊन घेतले मग पुन्हा खिडकीच्या बाजूला थांबून उजव्या हातात कप घेऊन, समोर बाहेर पडणारा पाऊस बघत चहाचा एक चुसका ओढला, त्यानंतर मनाला मिळालेले समाधान निशब्द होते म्हणजे ते आता इथे शब्दामधे मांडणे जरा अवघडच आहे मला...

चहाचा कप हातातचं माझा, समोर रीम झिम पडणारा पाऊस, गारठलेले खिडकीचे गज, खिडकीतून तोंडावर आदळणारा गार वार्याचा झोका, निशब्द अंधार, समोर ओला रस्ता, ओठांशी चहाचा गोडवा आणि कानाशी त्यागाण्याची धून अजून घुमत होती.. असाच काहीश्या फ्ल्याशब्याक कडे ओढलो जात होतो मी, म्हणजे पावसाळा आणि जुलै महिना एक घनिष्ट संबंध म्हणजे माझा साठी हो.. पाऊस पडतोय खरा पुढे माझा पण कानाशी आवाज काहीतरी भलताच येत होता, जस कि पावसाळ्यात मुसळधार पावसात छत्री डोक्यावर घेऊन पावसापासून वाचत मला हाक मारणारी “ती” ओरडा करत थांबली असावी, पावसाचा पडणारा आवाज आणि तिचा ओरडा काहीसा सारखाच....!

ह्या गारठलेल्या पावसाने आता थेट मला मेमरीत न्हेऊन सोडलं होत. ते पण असे...

पावसाळा जरासा चांगलाच रंगात आला होता, झोडपत होता अक्षरशा, गिच्च करून टाकले होते सगळी कडे, रात्री राब-राब राबून घरी आलो कामाहून (रात्रपाळी हो अमुची त्यामुळे सकाळी घरी येतो !!) पावसाचा सडा जरा जोमात मारा मारत होता, नॉर्मल माणसांसाठी जुलैच्या त्या दिवसाची सकाळी होत होती, रोजच्यागत ह्या वेळेला झोपणारा मी अजून वटवागळागत अजून ढिम्म जागाच होतो, सकाळचे तसे सात वाजून गेलते, मग माझी धडपड सुरु झाली, अंघोळ-चहा-नाष्टा उरकून घेतला, चकाचक कपडे चढवले, डीओ फवारला अंगावर, बुटाड पायात रुतवले, कानाला हेअफोन रोवले, डोळ्यावर गॉंगल लावला आणि गाडीला कीक मारून ढूश झालो ते थेट बानेरच्या डीमार्टला गाडी थांबवली, पावसाचे भूस-भूस पडणे चालूच होते पण मी ते झेलत होतो अंगावर त्याचे मला काहीच वाटत न्हवते, आता सकाळचे चांगलेच ०९:१५ झालते आणि त्यात पाऊस हि मस्त चालू होता, मग समोरच्या टपरी वर जाऊन चहा सांगितला, भिजल्यामुळे अंगातून पाणी टपकत होते त्यानंतर हातात चहाचा गरम ग्लास घेऊन माझा पाऊस पडल्या अंगाला शेकत होतो, खिशातला मोबाईल काढला आणि नंबर लावला... रिंग वाजत होती मग तसाच कानाला फोन ठेऊन पलीकडून “हेल्लो” ची वाट बघू लागलो, तसा वेळ लागत नाही हेल्लोसाठी पण तो दिवस काय जणू खास होता त्यामुळे गप्प वाट बघत बसलो, रिंग झाली पण काही बोलन झाले नाही, काही मिनिटांनी समोरूनचं कॉल आला..

(फोनवरील सवांद)
मी : हेल्लो, कुठे आहेस?
ती : बस मधे..
मी : बर, किती वेळ लागेल पोहचायला? मी थांबलो आहे टपरीवर तुझी वाट बघत..
ती: बर, आलेचं.. ५ मिनिटात!!        

समोरून हेल्लो आज चांगल्याच मूड मध्ये होतं कारण आज आवाजातला गोडवा चांगलाच पाझरत होता बोलताना, हिचे पाच मिनिट आता मला चांगलेच तरसवत होते आज, वाट बघायची सवय नाही मला पण आज नबोलता गुमान तिची वाट बघत होतो, तसे तिच्यावर चिडत नाही मी, माझा राग पाघळतो ती समोर असली कि मग तिच्यावर चिडण्याचा प्रश्नच नाही, ती कुठवर पोहचली ह्याची अजून मला माहिती नाही त्यामुळे मी अजून एक चहा-कट सांगितला, कारण वाट बघताना माझातला गोडवा वाढवायचा होता मला आणि वेळ कशी जाईल ह्याचा विचारात मी, पाऊस रिमझिम चालू होता, मी तेथे टपरीच्या समोर चहाचा घोट घेत थांबलेला, मागून कोणाचा तरी हाक मारण्याचा आवाज मला येत होता, तसाच मी मागे वाळून पाहिले, आणि काय तर आमचं हेल्लो आल होते कि!!, छत्रीला डोक्यावर पकडून, डाव्या हातात तिची ब्याग, मस्त लाल भडक रंगाचा ड्रेस, डोळ्यांना काळसर लाईनर ओढले होते, ओठांना हलकीशी लालबुंद लिपस्टिक लावली होती, त्या रंगाण तिचे ओठ खरच डाळिंबागत लालबुंद दिसत होते, अंगाने बारीक नाही ती त्यामुळे गाल वैवस्तीत गुबगुबित दिसत होते, कानात छोटूसं डोरलं घातलं होत, एका हातात घड्याळ आणि दुसर्या हातात एकच बांगडी तीपण इस्टाइल मध्ये, असा काहीतरी सुंदर रुपडं आमच्या हेल्लोचं, तिचा आवाज कानात माझा घोंगावत होता, ती आता जवळ येत होती, मी अजूनही हातातल्या चहाला घशाखाली ओतत होतो, तीचं मटकट चालत येन आणि माझ तिच्याकडे बघन आता काहीस फिल्मी सीन चालू होता आमच्यात, ती येताच माझ्यावर स्वार झाली, हलक्या-जोराने ती आता मला मारू लागली होती, आता का अचानक सुरु झाली हि काय माहित पण आता जोपर्यंत हीच मन भरत नाही तोवर हि मारत राहणार, मी पण लागत आहे ह्याच ढोंग घेत तिच्यासमोर कळवळत होतो, ती शांत झाली आणि तिच्या तोंडाचा दानपट्टा सुरु झाला, आज का आलास, आताच का आलास, काय गरज होती, तुला तर काहीच आठवण नसते ई. भरपूर काही ती सुरु झाली आणि मी चिडीचूप तीचं ऐकत थांबलो..

तिला काय बोलाव काही सुचत न्हवत, माझे असे अचानक येन तिला सप्रायीस होते, तसा मी असे धक्के देण्यात माहिरच आहे म्हणा, तिला म्हटलं बस गाडीवर जायचे आहे आपल्याला आज बाहेर, तिच्या चेहऱ्यावर हाता मोठासा प्रश्नचिन्ह पडला होता आणि तो मी जाणला होता, तिने फ़क़्त विचारले कधी येणार आपण?? मी हळूआवाजात बोलून मोकळा झालो “लवकरच, रात्र होयच्या आधी” तो हसली आणि लगेच ऑफिसला फोन करून सांगितले सुट्टीचे, लगबग ती बसली गाडीवर, मी गाडीला कीक मारली आणि निघालो, गाडी थोडी पुढे गेली तोवर म्याडमांनी स्कार्फ घातला चेहऱ्यावर आता पुणेरी पेहराव तर झालाच पाहिजे न म्हणे स्कार्फ, आता माझा गाडीला दोन कानाचे आरशे नाहीत त्यामुळे तिला आरश्यातून बघता येत न्हवते मग गाडी चालवताना उगाच हटकून मागे वळून तीला बघायचो, ती मग हसून मला फटका मारायची आणि बोलायची गप गाडी चालव, स्कार्फ मध्ये तिच्या डोळ्यांना काय जोम येतो काय माहित पण जेव्हा स्कार्फ घालते तेव्हा तिचे डोळे मला भन्नाट वाटतात राव जसे तासलेल्या तलवारीची धार तसेच काहीसे कातील..

तिला काही तरी ऐकायचे होते माझा कडून पण मी पण हटकून काहीच नाही असे दाखवत होतो, गाडीचा वेग तसा नॉर्मल होता पाऊस हि काही थांबत न्हवता, पण काहीसा झुरमुर पडत होता, ति थंडीन कुडकुडत होती, तिची होणारी हेलमेल मला जानवत होती, त्या थंडीने तिची अंगाची थरथर होत होती, नकळत तिने मागण मला घट्ट मिठी मारली, आणि खांद्यावर डोके ठेऊन ती निवांत गप्प झाली होती, डोळे मिटून ती आता ती उसासे देत होती, तीच असे निवांत पने खांद्यावर डोक ठेऊन बसने मला फार भाळते, नकळत ती तिच्या विचाराण मध्ये गुंग झाली होती, कसल्या तरी विचारात पडली होती, मला तसे जाणवले पण मी काही न बोलताच गाडी चालवत होतो, तिला तिची वेळ दिली, मग नंतर स्वताच बोलू लागली, आपण कुठे चाललो आहोत, तसे मी सांगणार हि न्हवतो, पण तिला जास्त सिक्रेट मध्ये ठेवायचे न्हवते, त्यामुळे सांगून मोकळा झालो, आम्ही आता जवळपास लोणावळ्यात पोहचलो, गर्दी न्हवती त्यामुळे आम्ही वैवस्तीत पुढे निघालो, हिला भूक लागली असेल म्हणून मी गाडी एका हॉटेलात बाजूला घेतली, काहीस खाऊन आम्ही निघालो, तिला आज पावसात चिंब भिजवायचे होते मला त्यामुळे कुठेही न थांबता पुढे भुशी द्याम कडे पोहचलो, तसा आज इथे येण्याचा आमचा प्लान अचानक होता त्यामुळे इथेच का आलो हे तिनेही विचारले नाही, तिचा हाथ पकडून पुढे द्यामच्या वरती जाऊन मागच्या बाजूला गेलो आम्ही, तेथे तळ्याच्या काठी आम्ही दोघे बसलो, आता गर्दी नसल्याने कोणाचा त्रास न्हवता आम्हाला, ती पुन्हा खांद्यावर डोके ठेऊन बसली, तिच्या केसा’न सोबत खेळत मी तिच्यासोबत बोलत बसलो, असा निवांत वेळ भेटत नाही आम्हाला, मग काहीतरी भलत्या गोष्टींची चर्चा न करता, मी थेट तिच्या हातात कॅडबरीची मोठेवाले पाकीट ठेवले, ती आता चांगलीच खुश झाली, मला आता कडकडून तिने मिठी मारली, ती अशी मोकळी क्वचितच होते, कोण तरी बघेल, लोक काही तरी बोलतील वैगरे वैगरे असे तिचे चालू असायचे, पण आज जरा ती चांगल्याच मूड मध्ये होती, तिच्या डोळ्यात वेगळीच खुशी होती, ओठांवर तीचे मिश्कील हसणे मोहक वाटेल असे होते, तिच्या गालांचा गालगुच्चा घेतला, तेव्हा तिने तीचे डोळे हलकेशे मिटले, आता आमच्या होणार्या गप्पा आता भलत्याच रंगात आल्या होत्या, मला तिच्यासोबत असा मोकळा वेळ घालवायचा होता, तो आज जगताना मी भलताच भारावून गेलो होतो.

तिला तसेच कुशी मध्ये घेत, तिच्या कानाशी मी काही तरी बोलण्याचा पर्यंत करत माझी चुळबुळ सुरु झाली, तिलाहि त्याची जाणीव होऊ लागली कि माझी काही तरी धडपड सुरु आहे ते, तिची खोडसर वृत्ती त्यामुळे मला चिडवत होती, पण तशी ती पण उत्सुक होती कि मी आता काय बोलणार ते, मी बोलणार आणि ती ऐकणार अशी वेळ आलती, भारावून गेलेल्या मनाला आता मी मुठीत धरून मनातल ओठांवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो, पावसात भिजल्याने माझा ओठांची होणारी कुडकुड ती आकस्मित पने ऐकत होती, छातीत वाडलेल्या ठोक्यांची गती तिला जाणवू लागली, तिच्या कंबरेवरील हात मी हलकासा घट्ट करत, कानाशी तिच्या पूट पुटनाऱ्या ओटांना माझा आता कुठतरी आवाज फुटला..

“हैप्पी बर्थडे बबू... <3  “

....असे बोलून माझा मनावरचा भार कमी केला, ओठांवर आता आकस्मित स्मिथ फुटले माझ्या, गारठलेले अंग अंग आता कुठतरी ढील पडले, तिला समजले आणि कळले कि असा सहज केलेला प्लान, रात्रीपासून न केला कॉल नि मेसेज, म्हणजे सर्व काही ठरवूनचं आलो होतो मी, तिला राग होता भरपूर कि मी तिला रात्रीच्या बाराच्या ठोक्याला का नाही कॉल केला, साधा मेसेज तरी करून सोडायचा पण इथे येऊन तिला दिलेले सप्रायीस तिला खूप आवडले, तिच्या डोळ्यातला ओलावा मला सांगत होता, तिने घट्ट मारलेली मिठी मला सांगत होती, हलक्या हाताने मारलेले लाडीव फटके मला सांगत होते, तिचा मांजरीच्या पिलागत झालेला क्युटनेस मला बोलत होता, भरपूर काही तिच्या प्रत्तेक हाव भाव मला सांगत होता कि ती आता किती खुश आहे ते...

हुश्श ह्या पावसाळ्यातल्या आठवणी ना खरच जीवचं घेतात.....

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

#blogger
-----------
जितेंद्र वाजे
११-०९-२०१७









Sunday, July 9, 2017

पैठणीत "ती"

पैठणीत “ती”... ©®

कविताचं तशी लिहायची होती पण शब्दांची रेलचेल अशी मोजक्या शब्दात लिहण मला जमलं नसतचं मग पानभर माझ लिखाण आलेच....

तिच्या बद्दल लिहायचं म्हटलं तरी मनाच्या तलावाला काहीसा समुद्राच्या लाटांगत उसळी येते, म्हणजे विषय काही असो तिच्या बद्दल, तिचे गुलाबी सौंदर्य, सोनेरी रूप, गोजिरी अदा, घायाळ तिचे स्मिथ, खट्याळ तिचं वागण.... असे बरेच काही ते तिच्याबद्दल म्हटलं तर मनामधे माझ्या वादळी वार्यागत घुमत असते, शब्दांचे काय ते बेभान होत असतात आणि ते माझा मनाच्या दरीत घोंगावत असतात, मग ते शब्द लिहताना मुसळधार पावसागत कागदावर बरसत असतात.

सहज फेसबुकच्या भितडावर असाच भरकटत होतो आज आणि एकजनाचा “पैठणी(साडी)”चा फोटो शेयर केलेला आला डोळ्या समोर, तसा मूड माझा काही भारी न्हवता, म्हणजे रोजच्यागत आपल घरातच दिवसभर घालवलेला दिवस, ते दिवसातून कित्तेकदा चहाच्या उकळीला बघत घालवलेली वेळ, मग तोच चहाचा कप हाताशी मिरवत घराच्या एका कोपर्यातून दुसार्या कोपर्याला दिलेली भेट, मग तोच चहाचा कप त्याचा कोल्ड टी होईपर्यंत ओठांशी टिकवत मिरवत घालवलेली वेळ, बाहेर पडणारा पाऊस हा आपला चांगल्या पद्धतीने मला घेरण्याचा अतोनात प्रयत्न करत असतोच, मग पुन्हा त्याची भीती मनाशी ठेवत पुन्हा चहाच्या गरम घोटाला घश्याखाली उतरवत घालवलेली वेळ, म्हणजे असाच काहीसा माझा दिवस मी घालवलेला आणि त्या फेसबुकच्या शेयर केलेल्या फोटोवर माझी नजर ती बसली, काय झाले ते मला समजण्याआधीच मी त्या “पैठणी”ला माझा मनाच्या भितडावर चीपकावले...

असो... पैठणी ती मस्त अशी अर्धवट घडी मोडलेली समोर माझा, जांभळ्या रंगाची, सोनेरी काठपदराची सुंदर रेखीव नक्षीकाम केलेली, आतमधे अल्हाद बारीकश्या सोनेरी ठुश्या उमटवल्या होत्या त्यावर, आता ह्यातलं मला समजेल त्याच्यापण पलीकडे होते एवढी ती सुंदर अशी ती पैठणी साडी... पण सगळ ठीक होते त्या पैठणी पर्यंत, आता मी तर त्याचाही पलीकडे गेलो होतो, समोर त्या पैठणीचा फोटो पण मनात काही तरी अजून चित्र ते फडकत होते, ते चित्र अजून माझ्या डोळ्यासमोर अजून धूसर होते, त्याची चाहूल मला लागत होती पण ते चित्र अजून धूसरचं होते मला...

..ते चित्र आता माझासमोर आता क्लेअर होते, पैठणी नेसलेली “ती” आता माझा समोर येत होती, चित्र काहीसे रोमांचक होते माझासाठी पण माझ्यातल्या आतल्या काळजाला पाण्याचा झरा फुटू लागला होता तसा, कोरड पडलेल्या डोळ्यांना रंगीत पाण्याची धारा सुटू लागली होती, चिमटी लावल्यागत चीपकलेल्या ओठांना आता मोकळा श्वास घेता येत होता, चेहरयावर हसू जरासं फुटू लागले होते, माझी कावरी बावरी हालचाल झाली होती, आता हे होणे साहजिकच कारण “ती” समोर आली होती माझा पुन्हा...

तसे हिचे यायचे काही नवल न्हवते पण मनातले पेटलेले रान ह्यावेळेस भलत्याच जोमात होते, वाढणारी आग आतमधल्या माझा सुख्या पडलेल्या पाला-पाचोळ्याला घेऊन बेभान आग होत गगनाला ती झळ पोहचेल अशी पेटले होते, आजपर्यंत उनाढ होत चाललेले माझे दिवस आज काहीशे रंगीन होऊ भासत होते, कळण्या अगोदरच तिचे रंगीत रूपडं माझा समोर डोळ्यासमोर येऊन उभ राहिले होते, घशाला ती कोरड पडली होती माझा पण पाण्याची तलफ ती मला भासत न्हवती कारण माझासमोर आता अमृताचा घोटभर असलेला सोण्याचा प्याला होता तर तहान माझी अशिच विरघळून गेली होती, आता फ़क़्त काय तो माझातला शून्य आणि बाकी मीच राहिलो होतो, तसे रूप हीचे आधीच वेडसर पण ह्या पैठणीत तिला पाहताना माझी हालत अजून वाईट होत होती..असो...

वार्याला सुमार नाही असा तो वाहत होता, आणि ती चेहऱ्यावर स्मिथ देत उभी, जांभळ्या पैठणीत ती अगदी रुबाबदार दिसत होती, गडद जांभळ्या रंगाची पैठणी, त्याला सोनेरी तारेची विणलेली भरीव काठ, मोर पंखाची नक्षी, झाडांची चढवलेली वेली त्यात अजून नक्षीदार त्यामुळे ती अजून देखणी दिसत होती. ह्या सगळ्यात तिचा डाव्या हातावर लटकणारा पदर मला काहीसा अजून भाळत होता मनाला आणि पूर्ण पैठणीवर उमटवलेल्या जरीच्या ठुश्या त्या अजून मनमोहक दिसत होत्या, तिच्या उजव्या हाताच्या दंडावर सोन्याचे पिळदार बाजूबंद मस्त होते, हातात सोन्याच्याच नक्षीदार बांगड्या त्याच्या जोडीला लाल रंगाच्या बांगड्या त्यामुळे तिचा हात अजून सुंदर भरून दिसत होता, उजव्या हाताच्या बोटात एक नक्षीदार अंगठी, डोळ्यात तिचं तेज होते जस काय पैठणीचे रूप तिच्या डोळ्यात चमकत आहेत तसे मला भासू लागले, कानात तिच्या लोंबकळत हवेत झुलनारे झुंबके, गळ्यात सोनेरी ठुशी नाजुकशी त्यावर लांब असा राणी हार चढवला होता, नाकात नथनी तीने टोचली होती आणि ती हळूच माझा काळजाला हलकीशी टोचत होती, कपाळावर गडद लालसर टिकली, केसांना तिने अलगद बांधले होते आणि त्यावर मोगरा हा नचुकता माळला होता, त्या मोगर्याचा सुगंध माझा नाकाशी हळूच अशी खोड काढत होता आणि त्याची प्रचीती मला माझा मनात होणार्या गुद्गुडलीने होत होती, पैठणी ती जमिनीला टेकली होती त्यामुळे तिचे पाय पूर्णतः झाकले होते आणि तिचा ओठांचा लालबुंद रंग जसा पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यागत ओलसर....

अशी काहीशी “ती” पुन्हा माझा डोळ्यासमोर आली नि डोळ्यातल्या बुबुळाला ओलसर करून गेली...


#पैठणी #Paithani #मराठी
#jeet
#blogger
-----------
जितेंद्र वाजे ©®
१०-०७-२०१७