ती...
भाग_५
"तो दिवस अजूनही मला आठवत नाही..
केंव्हा..!
कधी.....!
कुठे..........!
"ती" माझा आयुष्यात घर करून गेली ते.....!"
...उगवणारी प्रत्येक एक सकाळ उबदार भासू लागत होती, पडणारा पाऊस हा आपलासा वाटू लागला होता, गारठनाऱ्या वातावरणात उबदार तिचा सहवास हवा-हवासा भासत होता, हिची एन्ट्री तशी झाली तेव्हा एकदमसे असे झाले की सुक्या पाचोळ्यावर अचानक पने ठिणगी पडली आणि पेटलेली आग जशी..
तिने हलचल जी माजवली होती मनात माझ्या ह्याचा तिला एक मात्राचा अंदाज नव्हता, मी माझ्याच दुनियेत तिला बघत होतो स्वप्नदुनियेत, हसताना तिच्या मिश्किल अदांचा घास मी माझा मनाला भरवत असे, माझं काही तरी अजब चालू असायचे. माझ्या मनाची विकेट पडली ह्याची खाना-खून पण नाही माझा मित्रांना, मी माझाच दुनियेत मनातल्या मनात तिच्या बद्दलचे दळण दळने चालू असायचे, काही दिवस हे असेच गेले, पण दिवस जसे उलटत होते तशी माझा मनाची तारांबळ जास्त वाडु लागली होती, आणि मुळात म्हणजे समजत नाही की काय करायचे आता पुढे, तिच्याबद्दल तर रोजच मनात संगीत गिटार ताणने चालू होते, पण गुणगुणनाऱ्या गाण्याला नेमकी चाल घावत नव्हती मुळात, उगाच मनाची खेचा-खेची चालू होती, रोज कॉलेजला जाणे सात-सात तास घालवणे आणि पून्हा घरी येणे आणि त्यातला अर्धा वेळ हा माझा तिच्यातच गुंतलेला असायचा, थोडक्यात मन माझे भरकटले होते, ती माझा समोर तर होती पण माझपासून खूप लांब होती. नकळत तिच्या जवळ जाण्याची कुणकुण मनी भासत होती, मनात माझा सोबत तिच्या बोलके होण्याच्या गरम पाण्याच्या उकाळ्या येऊ लागल्या होत्या, पन भित्र्या मनाला ते काय जमत न्हवते मग शांत अळीमिळी गुपचिळी केले मी तेव्हा. पाऊस हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागला होता, पण जाताना कधी रिमझिम तर कधी जोरात सडा मारून जायचा, खरंच हा पाऊस तेव्हापासून मनात घर करून बसला होता, नेमकं म्हणजे पडणाऱ्या पावसाची आणि तिची चांगली जमायची, तिला पाऊस आवडायचा कि नाही याची मला काहीच कल्पना नाही पण पावसात भिजणारी "ती" मात्र माझा मनात एक वादळी पाऊस बनून जायची.
कॉलेज कट्यावरील आम्ही पाच मित्र म्हणजे हे समीकरण होते रोजचे.. जे म्हणजे..
सकाळच्या वर्गातील एन्ट्री पासून,
चालत येताना होणाऱ्या गप्पांपर्यंत,
वर्गात घुसताना घातलेल्या घोंधळापर्यंत,
लेक्टर चालू असताना केलेल्या टुकारपणापर्यंत,
मधल्या सुट्टीतल्या वडापाव-मिरची पर्यंत,
परत भरणाऱ्या ढेकरखाऊ लेक्टर पर्यंत,
उगाच कोणाच्या तरी नावाने एक-मेकांना चिडवण्यापर्यंत, मग नको त्या विषयावर केलेल्या चर्चेपर्यंत,
सुटताना शेवटच्या लेक्टरला मारलेल्या आरोळीपर्यंत, कट्यावर पाय सोडून बसून रमलेल्या चर्चेपर्यंत,
ते घरी पोहचल्यावर "उद्या लवकर ये रे!" म्हणत घेतलेल्या निरोपापर्यंत..
बनलेलो आम्ही पाच मित्रांचे (पाच)कूट असे काहीतर, "ती" तर आलीच माझा कॉलेज फिल्मी दुनियेत पण तिच्या आधी मित्रांची धाड पडली होती सुरवातीलाच, पण कुठेतरी मनातील माझा "ती" ला ह्यांछापासून दडून ठेवले होते मी, मनातल्या होणाऱ्या बदलत्या ऋतूंना मी काही दिवस लपवून ठेवले होते, मग आमचे रोजचे दिनचक्र तर चालूच होते आणि मनात माझा हीचासोबतचा मुका लपंडाव पण चालूच होता...।।..
क्रमशः .....
नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..
सहज असे मनातले काही शब्द..
................
जितेंद्र वाजे
१२.१२.२०१६