Monday, July 20, 2015

हरिशचंद्र

शनीवारचा दिवस भिमाशंकर, शिवनेरी गड, माळशेज घाट आणि डयाम चा ब्याकवॉटर फिरून पुरता काडला. डोळ्यासमोरचा तप्त सुर्यनारायण डोंगराच्या आड़ जान्याआधी हरिशचंद्र चा म्हणजे पायथी म्हणजे पाचनायीत जाण्याची धडपड सुरु झाली....!

कोतुर हुन पाचनाईस जाण्यास गाडीने वेग घेतल, सिमेंटचा जंगलात राहणारे आपन आजचा दिवस काय दाखवेल ह्याची आम्हातल्या कोणालाच कल्पना न्हवती कारण जे अनुभवले ते आठवले तरी अंगावर काटा येतो :p . ( राणवाट, आजूबाजूला दरयाच त्यात त्या अंधारात अजुन भयान वाटत होत्या, एकच गाडी जाईल असा रस्ता, जाताना काळोखान नटलेल मोठ मोठाले डोंगर, आतापर्यंत निवांत बसलेले मागचे तीन जण अचानक डाटी-वाटी झाल्यासारखे बसले होते ते मित्र, डोळ्यावरचे त्तांचे हाव-भाव पाहून असे वाटले जणु थोड्याच वेळात पाझरतील) एकदाचे पाचनायी मुक्काम ठिकानी पोहचलो, गाराठलेल्या हातावार आलेले काटे गोंजारत मुक्काम घरी तसच चालत निघालो. पोहचताच ब्यागांची आवरा-आवर सुरु झाली, "जाम भुक लागली"  अशा केवीलवाणी बोलने ऐकताना आज थ्रिल पना जगल्यासारखे वाटले थोडक्यात. जेवनावर ताव मारून स्वताला तसाच रजईवर टाकुन १२.१५ च्या दरम्यान झोपी गेलो ते थेट मोबाइल अलार्म चा गजरने ६.०० ला उठलो नी मीच का उठू म्हणून द्वेशात सर्वांची झोपेची एक करुण सर्वाना उठवले.

हरिशचंद्र चा पायथी राहिलो पण त्याला रात्री पासूनच बघायची मनी चुळ-बूळ चालू होती तशी, तसा गोड निद्रेतुन उठून पडवीचा समोर दगडांवर उभा राहून त्याला पहायची धडपड सुरु झाली  पण धुक्यान्नी थोड़े जकडल़े होते त्याला आणि जसे मला आज ते डीवचाट होते मग उगाच तसाच काही इकडे तिकडे करत काहीसा वेळ काडला आणि ठोडी वारयाची सर आली अनि काहिसी हरिशचंद्राची ही सुंदर छटा दिसून आली..... Cont..

असा हा हरिषचंद्रगड त्यात स्वताला वाहुन द्यावेसे वाटते आणि सारखे सारखे इथेच यावेसे वाटते....

#हरिषचंद्रगड
#Travel_Story
#jeet

-----------
जितेंद्र वाजे
२१-०७-२०१५

Sunday, July 19, 2015

हरिषचंद्रगड....

पुर्ण हरिषचंद्रगड उलता-पालता करून काडला, धुक्यानी त्याला तसा लपेटलेच होते, #कोकणकडा बघायला भेटेन म्हणुन जिवाचा आटा-पिटा केला पण धुक्यात तो जसा लपला तसा माझ्यावर रागवलाच की काय जेने करुण दर्शण द्यायचे नाहीचः असे थाम करुन बसला आहे..
गणेश मंदिर उतरुन केदारेश्वर गुहेकडे जाऊन पोहचलो आणि सर्व काही विसरुन पाण्यात उतरलो. ठंड पाणी, गाराठलेली गुहा, गुहेत धुक्यान्नी गर्दी केलेली, पींडीच्या समोर जाउन माथा टेकवला आणि गुहेतल्या चिट पाखराचेपण ऐकुन कान किरर होतील असा मोठा आवाजाचा ठेका घेत "हर हर महादेव" चा गजर केला....

असा हा हरिषचंद्रगड त्यात स्वताला वाहुन द्यावेसे वाटते आणि सारखे सारखे इथेच यावेसे वाटते....

#KedareshwarCave
#हरिषचंद्रगड
#Travel_Story
#jeet

-----------
जितेंद्र वाजे
०५-०६-२०१५

Wednesday, July 8, 2015

गफलत मृगगडावरची

नुकताच पाऊस बरसुण गेला असेल, पडलेल्या पावसाने आपली कमालीची छाप सोडली होतीच त्यात गडापर्यंत डांबरी वाट ओलसर करुण सोडली होती, पायथ्यास पोहचताच गाडीला स्ट्यांडच्या आधारावर तीथेच सोडुन पाउलवाट बघत पुडल्या भ्रमंतीला श्री गणेशा केला. गाव सोडुन पाऊलवाट पकडत मार्गी लागलो, आणि गडाच्या पायथ्या लगतच्या जंगलात येउन थांबलो, माझ्या चेहय्रावर होणारी गफलत बघुण मित्र पुटपूटला.. आपण चाललोय ती वाट बरोबर की आपण भटकलोय....????!!!! 

चेहय्रावर स्मित हास्य देत तसच खिशातले नॅपकिन काडून चेहरा कोरडा करत दगडावर बसलो, बॅगेतुन पाण्याची बॉटल काडुण कोरडा घसा ओला केला, मग पुन्हा आपन बरोबरच आहोत असे स्वतालाच बोलुन समोर झुडपात घुसलो सावरा सावर करत पाउल ठेवले काही १५-२० धडपड करुण पुडे एका अधभुद झाडाचे दर्शण झाले!!!! 

जसा हरवलेले वासरु भेटल्यावर गाईचा हंबरडा निघतो तसाच आमच्या तोंडुन आनंदाची सुसकार पडली आणि समोर मृगगड कडे जाणारी दिशा दर्शवणारी हि पाटी दिसली, मग काय हरणाच्या वेगाने गडाकडे धुम ठोकली....! Cont....

प्रत्येक गडावर अशा दिशादर्शक पाट्यांचे दर्शण होत असते, अशा मित्रांना माझे मनापासुन आभार!!!! आमचा सारखे अनेक वाटसरुंना ह्या पाट्यांचा खुप खुप आधार भेटतो.

#मृगगड
#MrugagadFort
#Travel_Story

-----------
जितेंद्र वाजे
०३-०६-२०१५