Tuesday, February 27, 2018

ए रिपीट कर रे....!

"ए रिपीट कर रे....!" ©®
काही तरी लिहायला घेतलेले त्याला पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल ह्याची काहीच कल्पना नाही आणि नसते कधीच, असाच प्रवास अनुभव मी घेतला होता लिहण्यास, म्हणजे असा अनुभव जो जवळच्या मित्रांसोबत घालवलेला असा काही तरी, म्हणजे २०१७ च्या पहिल्या दिवशी आम्ही केलेला एकत्र कोकण दौरा आणि त्यात आलेला अनुभव काहीसा आजही लक्षात राहण्यासारखा जो आज कुठेतरी पूर्ण झाला लिहून, जरा वेळ लागला पूर्ण करायला पण असो...आणि तो अनुभव असा....!
..."ए रिपीट कर रे....!"
..अचानक पिन ड्रॉप सायलेंट आमच्यात, एकमेकांचे चेहरे बघत आम्ही जरासं चकितचं झालतो, कोणाला सुचलच नाही काय झाले अचानक आणि का एकदम मन भरून आल्यावानी आम्ही "रिपीट" चा ठेका घेतला.....!
जास्त सुरवात पासून, लांबवत, खेचत बोलण्यापेक्षा थेट ताम्हिणीच्या पुढे, मानगावातून कोकणाच्या झाडी झुडपातून निघणाऱ्या घाटात आल्या नंतरचचं खोदून काढतो आता..
म्हणजे आम्ही आमच्याच मूड मध्ये होतो म्हणजे भारी लईत, गाडीत आम्ही तिघेचं, नवीन वर्षाच्या जशन मधे तुफाणीत होतो इथे आल्यावर, जिपीयस् ला कामी लावून आम्ही सुसाट होतो, गाडीत जुन्या आठवणींचा फड रमलेला,म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प वैगरे टाळून आम्ही जगलेल्या जुन्या आठवणी उकरत कोमेजलेल्या मनाला चांगलसं तासतं होतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस, कोकण दर्शन, उनाडगिरी, भटकंती, रोजच्या गणित भागाकाराच्या जीवनाला टाळा लावून आम्ही निघालो होतो, कसल्याही जबाबदारीची किल्ली खिश्यात न् घेता आम्ही निघालो होतो तसे, इथे कोकणात आम्ही, चढ उताराचा घाटी रस्ता पार करत आम्ही आमच्या मार्गी होतो, समोर दिसणारा डोंगर, झाडांची गर्दी, रस्त्याची रुंदी, सापासारखी डौलदार वळणा वळणाची रसत्याची शेपूट, कोवळ्या उन्हाची झळ, गाडीतल्या एसी ला आराम देऊन आम्ही साइड विंडोला ओपन करून बाहेरच्या वाऱ्याची मजा घेत, केसांना खेळावणारा वारा अनुभवत, मनाला गार वाऱ्याची ओस शिंपडत, डोळ्यांना रंगीत कॉम्प्युटरच्या त्रासातून मुक्त करून इथे हिरव्या शालीची छटा चढवत, काहीसा जंगलांनी डोंगरांना आपल्या कुशीत गुडूप केले होते.. असा रंगीत प्रवास आमचा चालू होता..
एव्हड सगळं चालू असताना गाडीतील मुसिक सिस्टमनी का जणू साखरेचा खडा टाकावा तसं मनाला उस्फुर्त करनाऱ्या गाण्याल्या का जणू आणि कसे प्ले करावं, श्रेया घोषालच्या आवाजात "सून रहा है ना तू" च्या धूनला सुरवात झाली कामाहित पण नकळत हाताने वोल्युम वाढवला मग आपलं बाहेरच्या बाजूला बघत ऐकणं सुरु होतं, आम्ही रेडिओ सारखी बडबड करणारे अचानक वेगळ्याच दुनियेत गेलो होतो असे मला वाटते, कारण तोंडातून शब्दाचा अ.ब.क. हि पडत न्हवता, गाण्याची धून, मुसिक, बोल आणि बनलेला माहोल असे काहीतरी वेगळंच चित्र बनलं होतं, का जणू मनाच्या कोपऱ्यात जुन्या आठवणींचा कापूर हवेत पसरू लागला होता, त्याचा दरवळणारा कापूर सुघंध घुमत होता मनातल्या मनात, आठवणीत म्हणाल तर आशिकी-२ च्या गाण्यांनी गातलेल्या धुमाकूळ त्याकाळातील आठवला कि मन कसे आनंदाने उड्या मारू लागते, म्हणजे कसे थंडीच्या दिवसात गाराठलेल्या विहरित उडी मारण्यात जी माजा आहे ना असेच काही तरी..
गुणगुणनाऱ्या श्रेयाच्या आवाजात मनात शांत बसलेल्या वादळाला कुणीतरी दिवचत होते, कोणतरी मनाच्या जवळ अजूनही घर करून बसले आहे ह्याची हलकीशी जाणीव होतं होती, "ती" चे अस्तित्व अजून मनाशी भिडत होते, तसं बोलायला गेलं तर अश्या अनेक गाण्यांची लिस्ट आहे की ती गाणी ऐकताना मला वेगळ्याच जगात घेऊन जातात, असच काहीतरी माझं आता होत होते, तिच्या बद्दल मनात विचारांची किती गर्दी होयची ह्याची जरा आठवण झाली हे गाणे ऐकताना, गाडी चालवणारा मित्र काय कि मागे बसलेला मित्र काय आम्ही तिघे जरा वेगळ्याच दुनियेत गेलो होतो.
गाडी आपल्या स्पीड मध्ये निवांत चालू होती, काच खाली असल्याने बाहेरचा वारा चेहऱ्या वर धडकत होता, मनाशी होणाऱ्या विचारांना थंड वाऱ्याची हलकीशी गोजिरी माया पाघळत होती, मायाळ तिच्या रूपाची आठवण करून देत होती, ह्या गाण्याची जादू जरा औरच आहे म्हणजे मन कसं सुखावून जाते ऐकल्यावर. बाहेरच चित्र काहीतरी वेगळच फिल्मी दिसत होते मला काहीशा वेळेला, झाडांना मागे टाकत आम्ही सुसाट होतो, गाडीचा वेग जास्त असल्याने वारं आत घुसताना कानाशी घोंगावणारा आवाज येत होता, सुका पाला-पाचोळा हवेत उडत होता रस्त्यावरचा, पावसानं जोरात पडावं असे मनाशी फार वाटत होते कारणच तसे होते म्हणा आणि गाण्याने मूडही तसा फुलत होता. समोर बघताना मागचा सगळा भूतकाळ आठवत होता, चित्र न् चित्रच समोर खेळू लागले होते डोळ्या समोर माझ्या, गण्यासोबत मी मला केव्हाच हरवून बसलो होतो, तिच्या आठवणीत माझा मनाचा झोका चांगलाच झुलत होता.
"अपने करम की कर अदाएं
यारा.. यारा.. यारा…
मुझको इरादे दे, कसमें दे, वादे दे
मेरी दुआओं के इशारों को सहारे दे
दिल को ठिकाने दे, नए बहाने दे
ख़्वाबों की बारिशों को
मौसम के पैमाने दे
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं.."
इथंच काळीज माझं पाघळलं, गाण्याचे बोल, मुसिक आणि बनलेला माहोल सर्व एकदम दही साखरेचे मिश्रण झाले होते, कोणाची तरी आठवण ठिपकत होती मनात, आठवणींचा पाझर पुठावा असे काही तरी होतं होते, गाण्याच्या झोकात मी फ्लॅशबॅक मधे कधी पोहचलो ते मला जनावलेच नाही, आमच्या तिघांचे एकमेकांकडे लक्ष न्हवते, शेजारी गाडी चालवणारा मित्र गॉगल घालून नजर चुकवत समोर गाडी चालवत होता मला तर वाटतं होते की हा पण कुठल्यातरी क्षणात हरवला असेल आठवणीत कुणाच्यातरी, आणि मागे पहिले तर पऱ्या डाव्या बाजूच्या विंडोतून बघत आपल्या स्वतःला गाणं ऐकताना गोंजारत होता, आमचं कल्लोळ चालणार मूड काहीसा सायलेंट झाला होता, मग मी पण बाहेर बघत गाण्याचा रस कानाशी चाखत होतो..
मंजिलें रुसवा हैं, खोया है रास्ता
आये ले जाए, इतनी सी इल्तेजा
ये मेरी ज़मानत है
तू मेरी अमानत है हाँ …
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं
वक़्त भी ठहरा है, कैसे क्यूँ ये हुआ
काश तू ऐसे आये, जैसे कोई दुआ
तू रूह की राहत है
तू मेरी इबादत है
..ह्या काहीशा ओळीनंतर मी अजून काहीसा सुखावलो होतो, तसं ह्या गाण्याचा जोर हि तसाच तरबेज आहे म्हणा प्रत्तेक वेळेला हे गान काहीसे खेळवून जाते, मग असेच आम्हा सर्वांचे पण असे काही तरी झाले होते, गाण्यात गुंतताना मनाला मला कधी आवर घालता आला नाही, मग आज मी तसा कुठलाहि प्रयत्न केला नाही, गाण्याचा वोलुयम पण थोडासा मी वाढवला, श्रेया घोशाल ज्या पद्धतीने जीव ओतून ह्या गाण्याला गोडवा दिला आहे न त्याला खरच हलक्यात मोजता येणे जरा अवघड आहे.. मग पुढे गाणे तसेच ऐकत शेवटच्या टप्याला आले होते..
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं..
यारा…
..इथे गाण्याने स्टोप घेतला आणि आम्हा सगळ्याचा तोंडून एकाच वाक्य एकदम आले बाहेर..
"ए रिपीट कर रे....!"
**समाप्त**
©®
#Travel_Story
#jeet
#blogger
-----------
जितेंद्र वाजे
२७-०२-२०१८

Sunday, February 4, 2018

अचानक एंट्री.. ©®

अचानक एंट्री.. ©®
सकाळच्या साखर झोपेत असताना मोबाईल वाजू लागला होता, मग मीच-मिचणाऱ्या डोळ्यांना उघड झाप करत पाहिले, म्हटलं इतक्या सकाळी कोणाला आठवण झाली माझी, नंबर अनोळखी होता त्यामुळे उचलला लगेच, समोरून गोड आवाजात “Hello” ऐकू आले, आवाज अनोळखी होता म्हणजे लांबचं न जवळचं असा कुठल्याच कॅटेगिरी मध्ये त्या आवाजाची ओळख लागत न्हवती, मग पुन्हा विचारपूरवक बोलणे सुरु केले, समोरील आवाजातुन मधागत गोड धार ओसरत होती, ह्या आवाजाने साखर झोपेचं साखरेचे पाख झाले होते पुरते, पण झोपेतच मी अडखळत बोलत आणि त्यात समोरून येणारा आवाज दबक्या स्वरात येत होता, बोलताना ती घाबरत होती, म्हणजे तिला माहित न्हवते माझा काय रेस्पोंस असेल तिच्या अचानक कॉल वर..
       ती : हेल्लो, मी *** बोलते, कसब्यातून..
       मी : हो बोला..!
       ती : तुझा ब्लॉग वाचला मी नेटवर, छाण वाटले वाचून, तू लिहलेले शब्द नि शब्द पाठ झाले मला..
       मी : माझा नंबर कुठून मिळाला तुम्हाला?..
       ती : भेटला मला नेटवर, काही प्रोब्लेम झाला का? मी कॉल केला तर..?
       मी : नाही तसे काही नाही, पण...(..म्हणत शांत झाहलो..).. काही नाही... धन्यवाद कॉमेंट साठी..
                                                              ****** ****
...तेव्हा जास्त बोलणे नाही झाले तीचासोबत पण थोडक्यात बोलणे झाले म्हणजे तोंड ओळख व्हावी जशी, तिने स्वताहून केलेला कॉल आणि धाडसाबद्दल मला नवल वाटले पण तिच्या गोड आवाजाने मला घायाळ केलते तसे कुठेतरी.. तिने आवर्जून फोन करून त्या ब्लॉग बद्दल सांगितलेले मला सारखे मनाशी खेळत होते, मग पुन्हा तोच ब्लॉग वाचू लागलो त्या दिवशी, तसा काही मोठा आकस्मित परिणाम नाही झाला मनावर पण कोणीतरी एवढ्या खोल आणि मन लाऊन वाचेल ह्याची जाणीव न्हवती तेव्हा, मित्रांनी दिलेले प्रोस्थाहन आणि मनाशी खेळणाऱ्या शब्दांची आवड ह्या काही गोष्टीने सुरु झालते पण असा काही तरबेज आणि साहित्तिक पद्धतीचा लेखक नाही पण असाच आपले काही तरी चालू होते, ति मग नंतर संपर्कात राहू लागली, कधी फोन वर तर कधी मेसेज वर माझासोबत बोलणे चालू होते, तिचे वाचनावरील वेढ मला अजून उत्तेजित करू लागले होते लिहण्यास मग लिहताना तिच्या सोबत होणारया गप्पा वाढल्या, तिचे फोन येणे, मेसेज वाढू लागले, म्हणजे बोलणे वाढले होते आमचे, तिने भेटण्यासाठी भरपूर वेळा सांगायची पण माझेच काही तरी इथले तिथले निघायचे मग राहून जायचे आमचे भेटणे, तशी लांब न्हवती पण होती जवळचं, माझा ब्लॉग मधील “ती” तिला सारखी भासायची, मला मग सारखेच तिच्या बद्दल विचारणे सुरु केलते, पण आपले मी तिला टाळायचो, ती पण मग समजून घ्यायची कि मला तिच्याबद्दल विचारलेले आवडत नाही ते, मला सारखे बोलायची मला तिला भेटायचे आहे म्हणून वगैरे...

...ब्लॉग बद्दल बोलतना ति जरा त्या प्रवासात..त्या विषयात घुसायची, तिला प्रत्तेक ब्लॉग बद्दल बोलायचे असायचे माझासोबत म्हणजे फोन केला कि मग तासं तास बोलायची, ब्लॉग मधील प्रत्तेक शब्दावर नि ओळीवर तिचे काही तरी मत असायच, बोलताना कधी कधी ती कविता करून जायची, कुठला शब्द भारी नि कुठली ओळ बरोबर बसली नि कुठे काही फिसकटले तर ती सांगून मोकळी होयची, दिवसाची सुरवात चहा पासून होयची मग मागच्या आठवड्यात खाल्लेली मी मिसळी पर्यंत आमचे बोलणे होयचे, माझी बडबड आणि मिसळ कीर्तनाने ती पण मिसळ वेडी झाली होती, तिला कधी आणि कशी मिसळचे वेड लागले हे तिलाही समजले नाही, प्रत्तेक वेळेस काही खाल्ले किंवा कुठे फिरायला गेली तर त्यावर पुन्हा चर्चा, तिने केलेला ड्रेस चौइस पासून ते मला आवडेल तो कलरचा ड्रेस घेण्यापर्यंत, तिने विकत घेतलेला नवीन मेकप किट पासून ते मला आवडणाऱ्या पिंक लिपस्टिक पर्यंत, तिने केलेल्या नवीन हेयर कट पासून ते मला आवडणारे लांब काळेभोर केसांपर्यंत.. आमचे बोलणे-चर्चा करणे सुरु होते, प्रेम बीम भांडगड नाही पण आमचे बोलणे चालू झाले होते घट्ट मैत्री गत, तिला कधी हि हुक्की आली तर मग सारखी मागे लागायची भेटू म्हणून, नाहीतर कुठेतरी बाहेर जाऊ असे म्हणत पुन्हा विषय छेडायची आणि तिला माहित असायच कि मला तेव्हा तरी भेटणे शक्य न्हवते, पण आमचे फोन आणि मेसेज वर घट्ट जमू लागले होते. तिचे ऑफिस आणि घर ह्या मध्ये जास्त वेळ ती माझा सोबत बोलण्यात घालवायची, मग सकाळी ऑफिसला पोहचेपर्यंत ते घरी जाईपर्यंत हीची बडबड चालू असायची.

..काही दिवस असेच गेले, पण एका दिवशी आमचे भेटणे ठरले भेटू म्हणून, तसे मी पण इच्छुक होतो, पण फोटो वगैरे पाहिले होते आम्ही एक मेकांचे पण तरीही भेटण्याची इच्छा होती आमच्या मध्ये, तिच्या घरी मोकळे वातावरण होते त्यामुळे ती घरी सांगूनच येणार होती मला भेटायला, आमचे ठरल्या प्रमाणे आम्ही खडकवासल्याला भेटणार होतो, त्यादिवशी मी सकाळी लवकर निघायचे म्हणून झोपलो पण उदया भेटायचे आहे ह्या गोष्टीवरूनचं आमच्या मध्ये फोन वर चर्चा सुरु होती, त्यात रात्री खूप उशीर झाला होता, मग तिला सकाळी मला उठव म्हणत मी झोपलो, सकाळी ती ठरलेल्या वेळेत निघाली होती घरून, आणि तिने मला अलार्म कॉल पण दिला होता, पण मी पुरता गाढ झोपेत होतो, थोड उशिरा जाग आली मला, कसे बसे गडबडीत मी आवरले आणि गाडीला किक मारून निघालो, तिचे कॉल सुरु झाले होते कि पोहचले आहे म्हणून, पण मी अजून अर्ध्या रस्यातपण नाही पोहचलो होतो, तिला समजले होते कि मी उशीर करणार म्हणून, आणि त्या पद्धतीने ती वाट बघत थांबली..

..थोडा उशीरच झाला होता पण शेवटी पोहचलो मी, तेथे जाऊन कुठे आहे म्हणून कॉल केला तेव्हा ती आधीच खाली खडकावर पाण्यात पाय सोडून बसली होती, आणि तसे तिने मला तेथेच यायला लावले, आज चक्क प्रतक्ष्य भेट होती आमची त्यामुळे माझी बोलती बंद झाली होती आणि त्यात मी उशीर हि केला होता, समोर तिच्या पोहचलो नि तिने मस्त गोड हसून ओळख दिली. मला वाटल कि ती आता चांगला वचपा काढेल माझावर उशीरा आलो आहे म्हणून पण तसे काहीच नाही उलट तिने पुन्हा रोजच भेटते तसे बोलणे सुरु केले, मग मी पण मिसळून गेलो आणि तिचा सोबत बोलायला लागलो.

..आमच्यात असे बोलण्यासारखे काही राहिलेच न्हवते कारण तिचा बद्दल मला आणि माझा बद्दल सर्व तिला माहिती होते, भेटल्यावर पुन्हा तिने “ती” बद्दल विचारायचा अट्टाहास धरला मग आमचा त्याच विषयावर बोलणे सुरु होते, माझ बोलणे सुरु झाले आणि तिने फ़क़्त ऐकायचे सर्व असे ठरवून आली होती, त्यामुळे तिचा बद्दल ऐकण्या ऐवजी माझेच सुरु झाले होते, ती शांत पने ऐकत मला साथ देत होती, समोर शांत निसर्ग, त्याचाही पलीकडे आकाशी भिडणारा सिह्गड मला सारखा खेचत होता, तिने ओळखले कि माझा मना मध्ये कसली घालमेल सुरु आहे ते, मग तिनेच स्वताहून विचारले जाऊया का सिंहगडावर, काही तरी खाऊ तिथे मला भूक लागली आहे असे बोलून पुन्हा हट्टीपना करू लागली, मग आम्ही तिची गाडी तिथेच ठेऊन सिंहगडाकडे निघालो, ती पण मस्त बिनधास्त मागच्या सीट वर बसली होती, गाडीचालवतानाहि तिचे बडबड चालूच होती, तिला अश्या ठिकाणी यायला आवडते आणि त्यामुळे ती चांगलीच रंगात आली होती, काही वेळाने आम्ही वरती पोहचलो, गाडी लाऊन आम्ही वरच्या बाजूला पोहचलो, पोटामध्ये भुकेने आग ओकत होती त्यामुळे लगेच आम्ही खाण्यास थांबलो एका हॉटेल मध्ये, खेकडा भजी आणि नंतर पिटल भाकरी दनकावली तेव्हा कुठे आमचा जीवात जीव आला, पुढे जाऊन एका कठड्यावर बसलो, सर्व मोकळे असल्याने वार मस्त घुमत होते, शांत वातावरण मनाशी मस्त वाटू लागले होते, ती आणि मी काही वेळासाठी गप्प झालो होतो, मग नंतर तीच पुन्हा बोलायला लागली.

..तिची नि माझी भेट तर झाली पण आम्ही अजून मित्रच आहोत, ते पण प्रेमाच्या अलीकडे आणि मैत्रीच्या पलीकडे गत, काही नात्यांना प्रेमाचा शेवट भेटतोच असे नाही पण प्रेमाने जपलेले नाते हे कितीक पतीने घट्ट नी निर्मळ असते, तिला हि मनात भरपूर काही येते नि भरपूर भावना ह्या गुंतल्या आहेत पण जिथे पुढे भविष्यच नाही त्या भांडगडित पडायचे नाही असे तिला मी आधीच सांगून मोकळे झालो होतो, पण तिचा माझावर हक्क गाजवण्याचा हट्टीपणा तो काही कमी नाही झाला न तो कधी कमी होणार.

**समाप्त**

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

 

#अचानक_एंट्री  ©®  #jeet #blogger #मराठी #साहित्य


-------------------
जितेंद्र वाजे ©®
०५-०२-२०१८

Wednesday, January 24, 2018

गोरखगड..

 गोरखगड..


२०१० च्या गोरखगड भटकंतीची लाही-लाही डोक्यातून उतरली न्हवती तशी अंगाची सालटून निघालेली जंगलतोड तेव्हांच हाडांचा भूग्गा करून सोडला होता, म्हणजे अंगातील खाज हि अंगाशी आलती माझा त्यावेळेसचं..योगी, प्रकाश, स्वप्न्या आणि मी आम्ही चौघेच तेव्हा..
मग पुन्हा २०१८ च्या २० जानेवारीच्या सकाळी आमच्या पुन्हा तशीच खाज खिजवू लागली होती, मग काय पुन्हा चौघेच मिळून निघालो ह्यावेळेस हि.. शनिवारच्या सकाळी झोपेला डोळ्याच्या उगढ-बंद खेळीतून सावरून मी पुरता जागा झालो, पोटामध्ये काहीसा नष्ट कोंबून मी निघालो ते थेट पुन्हावळ्यात मित्राच्या घरी पोहचलो, तेथे माझी परी पार्क करून मित्राच्या गाडीत सामील होऊन निघालो गोरखगडच्या दिशेला.
चौक गावात पोहचाल्यावर आम्ही मग तेथे खाऊ*खादाड सामग्रीची वैवस्था लावली, कारण आम्हाला रात्रीचा मुक्काम करायचा होता ह्या वेळेला आणि तसे आम्ही पूर्व तयारी करुनच आलो होतो म्हणा, तशी गाडीला स्पीड देऊन आम्ही पोहचलो एकदाचे पायथ्याचा गावाला, ब्यागा बिगा घेऊन सुरु झालो गड चढाई करायला, उन्हाचा तन तन न्हवती कारण चांगले  पाच वाजले होते आणि उशीर होणार हे माहित होते त्यामुळे आमची हि हालचाल जोरात झालती वर जायला, मंदिराच्या मधूनच दमछाक निघेल अशी चढाई सुरवात झालती, खडतर, झाडी झुडपातून आमची वन वन सुरु झालती आणि काहीशा वेळाने कुठे तरी वरच्या बाजूला पोहचलो, तिथेच समोर दिसणारा सुलाख डोळ्यात भावला आणि त्यात उजव्या बाजूला दिनकरराव त्यांचा कुशीत रुजू जाण्यास तयारीला लागले होते, त्यांचा नारंगी रंगाची उधळण चालू झालती तशी माझा मोबईलचा कॅमेराने क्लिक क्लीकाट सुरु केला, मन भरेपर्यंत काय ते फोटो काढले आणि आम्ही मार्गस्थ झालो, वरच्या पायथ्याच्या मंदिराचे दर्शन करून आम्ही चढाई ला सुरवात केली, हाश हुष करत आम्ही दगडांवर स्वर झालो आणि वरच्या गुहेत पोहचलो, पोहचताना वरती कधी रात्र झाली हेच कळले नाही, अंधार पसरला होता, तेव्हा आम्ही चौघेच होतो त्यामुळे माणशी मस्त वाटले होते, अश्या दगड मातीच्या देशात एक आपलेच राज्य असणे म्हणजे आनंदाची वारीच म्हणावी असे वाटते मला.
कड्याला डोक टेकवून. आकाशी पसरलेले चांदण तेव्हा भलतचं भरले होते, चांदण्यांची गर्दी पाहताना मनातल्या कोमेजलेला मी कुठतरी फुलारलो होतो, किर्र शांतता, कोणाची कट कट नाही न कोणाचा त्रास, आम्ही आमच्याच दुनियेत रमलो होतो, सकाळी वरच्या टेकडावर जायची कून कून आमच्या मनात चालू झाली होती, गडावरचा सूर्यास्त आणि सूर्योदय जग्ण्यात जी मजा आहे ती कशातच नाही हो..

समोर उगवणारा सूर्य, त्याने मांडलेला रंगांचा खेळ, उधळलेली नारंगी रंगाची भूक्की, त्यात थंडीचा गारठलेला ओस, असा काहीतरी भारीच अनुभव घेत आमचा रम्य दिवसाला सुरवात झाली..

#भटकंती #गोरखगड #प्रवास_वर्णन #सह्याद्री


-------------------
जितेंद्र वाजे ©®
२५-०१-२०१८