Tuesday, February 27, 2018

ए रिपीट कर रे....!

"ए रिपीट कर रे....!" ©®
काही तरी लिहायला घेतलेले त्याला पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल ह्याची काहीच कल्पना नाही आणि नसते कधीच, असाच प्रवास अनुभव मी घेतला होता लिहण्यास, म्हणजे असा अनुभव जो जवळच्या मित्रांसोबत घालवलेला असा काही तरी, म्हणजे २०१७ च्या पहिल्या दिवशी आम्ही केलेला एकत्र कोकण दौरा आणि त्यात आलेला अनुभव काहीसा आजही लक्षात राहण्यासारखा जो आज कुठेतरी पूर्ण झाला लिहून, जरा वेळ लागला पूर्ण करायला पण असो...आणि तो अनुभव असा....!
..."ए रिपीट कर रे....!"
..अचानक पिन ड्रॉप सायलेंट आमच्यात, एकमेकांचे चेहरे बघत आम्ही जरासं चकितचं झालतो, कोणाला सुचलच नाही काय झाले अचानक आणि का एकदम मन भरून आल्यावानी आम्ही "रिपीट" चा ठेका घेतला.....!
जास्त सुरवात पासून, लांबवत, खेचत बोलण्यापेक्षा थेट ताम्हिणीच्या पुढे, मानगावातून कोकणाच्या झाडी झुडपातून निघणाऱ्या घाटात आल्या नंतरचचं खोदून काढतो आता..
म्हणजे आम्ही आमच्याच मूड मध्ये होतो म्हणजे भारी लईत, गाडीत आम्ही तिघेचं, नवीन वर्षाच्या जशन मधे तुफाणीत होतो इथे आल्यावर, जिपीयस् ला कामी लावून आम्ही सुसाट होतो, गाडीत जुन्या आठवणींचा फड रमलेला,म्हणजे नवीन वर्षाचे संकल्प वैगरे टाळून आम्ही जगलेल्या जुन्या आठवणी उकरत कोमेजलेल्या मनाला चांगलसं तासतं होतो. नवीन वर्षाचा पहिला दिवस, कोकण दर्शन, उनाडगिरी, भटकंती, रोजच्या गणित भागाकाराच्या जीवनाला टाळा लावून आम्ही निघालो होतो, कसल्याही जबाबदारीची किल्ली खिश्यात न् घेता आम्ही निघालो होतो तसे, इथे कोकणात आम्ही, चढ उताराचा घाटी रस्ता पार करत आम्ही आमच्या मार्गी होतो, समोर दिसणारा डोंगर, झाडांची गर्दी, रस्त्याची रुंदी, सापासारखी डौलदार वळणा वळणाची रसत्याची शेपूट, कोवळ्या उन्हाची झळ, गाडीतल्या एसी ला आराम देऊन आम्ही साइड विंडोला ओपन करून बाहेरच्या वाऱ्याची मजा घेत, केसांना खेळावणारा वारा अनुभवत, मनाला गार वाऱ्याची ओस शिंपडत, डोळ्यांना रंगीत कॉम्प्युटरच्या त्रासातून मुक्त करून इथे हिरव्या शालीची छटा चढवत, काहीसा जंगलांनी डोंगरांना आपल्या कुशीत गुडूप केले होते.. असा रंगीत प्रवास आमचा चालू होता..
एव्हड सगळं चालू असताना गाडीतील मुसिक सिस्टमनी का जणू साखरेचा खडा टाकावा तसं मनाला उस्फुर्त करनाऱ्या गाण्याल्या का जणू आणि कसे प्ले करावं, श्रेया घोषालच्या आवाजात "सून रहा है ना तू" च्या धूनला सुरवात झाली कामाहित पण नकळत हाताने वोल्युम वाढवला मग आपलं बाहेरच्या बाजूला बघत ऐकणं सुरु होतं, आम्ही रेडिओ सारखी बडबड करणारे अचानक वेगळ्याच दुनियेत गेलो होतो असे मला वाटते, कारण तोंडातून शब्दाचा अ.ब.क. हि पडत न्हवता, गाण्याची धून, मुसिक, बोल आणि बनलेला माहोल असे काहीतरी वेगळंच चित्र बनलं होतं, का जणू मनाच्या कोपऱ्यात जुन्या आठवणींचा कापूर हवेत पसरू लागला होता, त्याचा दरवळणारा कापूर सुघंध घुमत होता मनातल्या मनात, आठवणीत म्हणाल तर आशिकी-२ च्या गाण्यांनी गातलेल्या धुमाकूळ त्याकाळातील आठवला कि मन कसे आनंदाने उड्या मारू लागते, म्हणजे कसे थंडीच्या दिवसात गाराठलेल्या विहरित उडी मारण्यात जी माजा आहे ना असेच काही तरी..
गुणगुणनाऱ्या श्रेयाच्या आवाजात मनात शांत बसलेल्या वादळाला कुणीतरी दिवचत होते, कोणतरी मनाच्या जवळ अजूनही घर करून बसले आहे ह्याची हलकीशी जाणीव होतं होती, "ती" चे अस्तित्व अजून मनाशी भिडत होते, तसं बोलायला गेलं तर अश्या अनेक गाण्यांची लिस्ट आहे की ती गाणी ऐकताना मला वेगळ्याच जगात घेऊन जातात, असच काहीतरी माझं आता होत होते, तिच्या बद्दल मनात विचारांची किती गर्दी होयची ह्याची जरा आठवण झाली हे गाणे ऐकताना, गाडी चालवणारा मित्र काय कि मागे बसलेला मित्र काय आम्ही तिघे जरा वेगळ्याच दुनियेत गेलो होतो.
गाडी आपल्या स्पीड मध्ये निवांत चालू होती, काच खाली असल्याने बाहेरचा वारा चेहऱ्या वर धडकत होता, मनाशी होणाऱ्या विचारांना थंड वाऱ्याची हलकीशी गोजिरी माया पाघळत होती, मायाळ तिच्या रूपाची आठवण करून देत होती, ह्या गाण्याची जादू जरा औरच आहे म्हणजे मन कसं सुखावून जाते ऐकल्यावर. बाहेरच चित्र काहीतरी वेगळच फिल्मी दिसत होते मला काहीशा वेळेला, झाडांना मागे टाकत आम्ही सुसाट होतो, गाडीचा वेग जास्त असल्याने वारं आत घुसताना कानाशी घोंगावणारा आवाज येत होता, सुका पाला-पाचोळा हवेत उडत होता रस्त्यावरचा, पावसानं जोरात पडावं असे मनाशी फार वाटत होते कारणच तसे होते म्हणा आणि गाण्याने मूडही तसा फुलत होता. समोर बघताना मागचा सगळा भूतकाळ आठवत होता, चित्र न् चित्रच समोर खेळू लागले होते डोळ्या समोर माझ्या, गण्यासोबत मी मला केव्हाच हरवून बसलो होतो, तिच्या आठवणीत माझा मनाचा झोका चांगलाच झुलत होता.
"अपने करम की कर अदाएं
यारा.. यारा.. यारा…
मुझको इरादे दे, कसमें दे, वादे दे
मेरी दुआओं के इशारों को सहारे दे
दिल को ठिकाने दे, नए बहाने दे
ख़्वाबों की बारिशों को
मौसम के पैमाने दे
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं.."
इथंच काळीज माझं पाघळलं, गाण्याचे बोल, मुसिक आणि बनलेला माहोल सर्व एकदम दही साखरेचे मिश्रण झाले होते, कोणाची तरी आठवण ठिपकत होती मनात, आठवणींचा पाझर पुठावा असे काही तरी होतं होते, गाण्याच्या झोकात मी फ्लॅशबॅक मधे कधी पोहचलो ते मला जनावलेच नाही, आमच्या तिघांचे एकमेकांकडे लक्ष न्हवते, शेजारी गाडी चालवणारा मित्र गॉगल घालून नजर चुकवत समोर गाडी चालवत होता मला तर वाटतं होते की हा पण कुठल्यातरी क्षणात हरवला असेल आठवणीत कुणाच्यातरी, आणि मागे पहिले तर पऱ्या डाव्या बाजूच्या विंडोतून बघत आपल्या स्वतःला गाणं ऐकताना गोंजारत होता, आमचं कल्लोळ चालणार मूड काहीसा सायलेंट झाला होता, मग मी पण बाहेर बघत गाण्याचा रस कानाशी चाखत होतो..
मंजिलें रुसवा हैं, खोया है रास्ता
आये ले जाए, इतनी सी इल्तेजा
ये मेरी ज़मानत है
तू मेरी अमानत है हाँ …
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं
वक़्त भी ठहरा है, कैसे क्यूँ ये हुआ
काश तू ऐसे आये, जैसे कोई दुआ
तू रूह की राहत है
तू मेरी इबादत है
..ह्या काहीशा ओळीनंतर मी अजून काहीसा सुखावलो होतो, तसं ह्या गाण्याचा जोर हि तसाच तरबेज आहे म्हणा प्रत्तेक वेळेला हे गान काहीसे खेळवून जाते, मग असेच आम्हा सर्वांचे पण असे काही तरी झाले होते, गाण्यात गुंतताना मनाला मला कधी आवर घालता आला नाही, मग आज मी तसा कुठलाहि प्रयत्न केला नाही, गाण्याचा वोलुयम पण थोडासा मी वाढवला, श्रेया घोशाल ज्या पद्धतीने जीव ओतून ह्या गाण्याला गोडवा दिला आहे न त्याला खरच हलक्यात मोजता येणे जरा अवघड आहे.. मग पुढे गाणे तसेच ऐकत शेवटच्या टप्याला आले होते..
अपने करम की कर अदाएं
कर दे इधर भी तू निगाहें
सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं
सुन रहा है ना तू, क्यूँ रो रहा हूँ मैं..
यारा…
..इथे गाण्याने स्टोप घेतला आणि आम्हा सगळ्याचा तोंडून एकाच वाक्य एकदम आले बाहेर..
"ए रिपीट कर रे....!"
**समाप्त**
©®
#Travel_Story
#jeet
#blogger
-----------
जितेंद्र वाजे
२७-०२-२०१८

No comments:

Post a Comment