Sunday, December 11, 2016

ती...भाग ५

ती...

भाग_५


"तो दिवस अजूनही मला आठवत नाही..
केंव्हा..!
कधी.....!
कुठे..........!
"ती"  माझा आयुष्यात घर करून गेली ते.....!"

...उगवणारी प्रत्येक एक सकाळ उबदार भासू लागत होती,  पडणारा पाऊस हा आपलासा वाटू लागला होता, गारठनाऱ्या वातावरणात उबदार तिचा सहवास हवा-हवासा भासत होता, हिची एन्ट्री तशी झाली तेव्हा एकदमसे असे झाले की सुक्या पाचोळ्यावर अचानक पने ठिणगी पडली आणि पेटलेली आग जशी..

तिने हलचल जी माजवली होती मनात माझ्या ह्याचा तिला एक मात्राचा अंदाज नव्हता, मी माझ्याच दुनियेत तिला बघत होतो स्वप्नदुनियेत, हसताना तिच्या मिश्किल अदांचा घास मी माझा मनाला भरवत असे, माझं काही तरी अजब चालू असायचे. माझ्या मनाची विकेट पडली ह्याची खाना-खून पण नाही माझा मित्रांना, मी माझाच दुनियेत मनातल्या मनात तिच्या बद्दलचे दळण दळने चालू असायचे, काही दिवस हे असेच गेले, पण दिवस जसे उलटत होते तशी माझा मनाची तारांबळ जास्त वाडु लागली होती, आणि मुळात म्हणजे समजत नाही की काय करायचे आता पुढे, तिच्याबद्दल तर रोजच मनात संगीत गिटार ताणने चालू होते, पण गुणगुणनाऱ्या गाण्याला नेमकी चाल घावत नव्हती मुळात, उगाच मनाची खेचा-खेची चालू होती, रोज कॉलेजला जाणे सात-सात तास घालवणे आणि पून्हा घरी येणे आणि त्यातला अर्धा वेळ हा माझा तिच्यातच गुंतलेला असायचा, थोडक्यात मन माझे भरकटले होते, ती माझा समोर तर होती पण माझपासून खूप लांब होती. नकळत तिच्या जवळ जाण्याची कुणकुण मनी भासत होती, मनात माझा सोबत तिच्या बोलके होण्याच्या गरम पाण्याच्या उकाळ्या येऊ लागल्या होत्या, पन भित्र्या मनाला ते काय जमत न्हवते मग शांत अळीमिळी गुपचिळी केले मी तेव्हा. पाऊस हा आपल्या परतीच्या प्रवासाला लागला होता, पण जाताना कधी रिमझिम तर कधी जोरात सडा मारून जायचा, खरंच हा पाऊस तेव्हापासून मनात घर करून बसला होता, नेमकं म्हणजे पडणाऱ्या पावसाची आणि तिची चांगली जमायची, तिला पाऊस आवडायचा कि नाही याची मला काहीच कल्पना नाही पण पावसात भिजणारी "ती" मात्र माझा मनात एक वादळी पाऊस बनून जायची.

कॉलेज कट्यावरील आम्ही पाच मित्र म्हणजे हे समीकरण होते रोजचे.. जे म्हणजे..

सकाळच्या वर्गातील एन्ट्री पासून,
चालत येताना होणाऱ्या गप्पांपर्यंत,
वर्गात घुसताना घातलेल्या घोंधळापर्यंत,
लेक्टर चालू असताना केलेल्या टुकारपणापर्यंत,
मधल्या सुट्टीतल्या वडापाव-मिरची पर्यंत,
परत भरणाऱ्या ढेकरखाऊ लेक्टर पर्यंत,
उगाच कोणाच्या तरी नावाने एक-मेकांना चिडवण्यापर्यंत, मग नको त्या विषयावर केलेल्या चर्चेपर्यंत,
सुटताना शेवटच्या लेक्टरला मारलेल्या आरोळीपर्यंत, कट्यावर पाय सोडून बसून रमलेल्या चर्चेपर्यंत,
ते घरी पोहचल्यावर "उद्या लवकर ये रे!" म्हणत घेतलेल्या निरोपापर्यंत..

बनलेलो आम्ही पाच मित्रांचे (पाच)कूट असे काहीतर, "ती" तर आलीच माझा कॉलेज फिल्मी दुनियेत पण तिच्या आधी मित्रांची धाड पडली होती सुरवातीलाच, पण कुठेतरी मनातील माझा "ती" ला ह्यांछापासून दडून ठेवले होते मी, मनातल्या होणाऱ्या बदलत्या ऋतूंना मी काही दिवस लपवून ठेवले होते, मग आमचे रोजचे दिनचक्र तर चालूच होते आणि मनात माझा हीचासोबतचा मुका लपंडाव पण चालूच होता...।।..


क्रमशः .....


नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..

सहज असे मनातले काही शब्द..


................
जितेंद्र वाजे
१२.१२.२०१६

Tuesday, December 6, 2016

ती... भाग ४

ती...

भाग_४

जरासं धाडसचं करतोय म्हणा! जुन्या आठवणींना ढील देत , भूतकाळा तल्या संदुकाला डिवचत, उगाच मनाच्या खोल जाऊन निवांत वसलेल्या त्या रंगीत फिल्मी दुनियेला ढवळत, माझं हे गाराण दळत आहे इथे.. असो..

....त्या पाचजणीने वर येत मनाला माझ्या चांगलच छेडत, भिनवत, समोर येण्याचा थाट मांडला.. जिण्याहून चढत त्या पाचजणी चांगल्या ऐटीत एन्ट्री मारत दुसऱ्या मजल्यावर आल्या, मित्रांनी घातलेला रोजचा गोंधळ मी कानापासून दूर सारत माझं लक्ष त्यांच्यावर फिरवत होतो, पाऊस बाहेर रिमझिम पडत होता, गारठा सगळी कडे जाणवत होता, कुडकुडणाऱ्या अवस्थेत माझी कोवळी नजर त्यांच्यावर घुमत होती, पावसात जरासं भिजल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती, इथे माझं पण पाणी-पाणी झालं होतं काही क्षण, त्यांच्याकडे बघताना माझा डोळ्यात जणू चांदणंच चमकू लागलं होतं..

कोणीतरी डोळ्यावर लाइट मारावी अशे माझे डोळे चमकले आणि तशी ती समोर आली एकदाची. तिची अदा म्हणजे, बघून गुलाबाने पण फिक पडावं, इंद्रधनुष्याने रंगवलेले सप्तरंग हे बेरंग भासावे, उसळनाऱ्या लाटेण क्षणभर स्तब्द व्हावं, वादळी वाऱ्याने शांत व्हावं, अशी तिची अदा.. काहीसं अलगडसा अनुभव घेत मी त्यांच्याकडं पाहत होतो, पण अचानक कोणाचीतरी निरागस, गोंडसस्या एकाची अदा समोर माझा येत होती, चेहरावर मिश्किल स्मित देत, ओलसर केसांना झुलवत, काहिशा ओलसर केसांचा आकडा करून त्यांना बोटांशी खेळवत, डोळ्यांनीच मारा करत, रॅम्पवाल्क करावा असं काहीतरी भासवत "ती" समोरून येत होती, हे जरासं काल्पनिक आहे पण सांगताना मनाला भान राहत नाही माझा म्हणून येत होतं असे काहीतरी मनातून..

घोळका त्यांचा हळू-हळू समोर येऊ लागला, पाठीला एका बाजूस बॅग धरून भारी इस्टाइल मधे, हिल सॅंडल नाही पण जराशी खोटी हाइट दिसावी अशी सॅंडल घातली होती जणू, केसांना एका छोट्याश्या रबरबँड मध्ये खोचून, फिक्कट तांबूस कलरचे केस, कॉलेज ड्रेस मधे, कपाळावर छोटुशी काळी टिचकी (टिकली), ट्यालकम पावडर काहीशा प्रमाणात लावली होती चेहऱ्यावर, डोळ्यांना काजळी लावली होती माझा अंदाजे, एका हातात बारीकस घड्याळ, दुसरा हातात एकच सुंदर ब्यांगल असा काही तरी साधासा पेहरावा हिचा जो नकळत मनाला वार करून गेला त्या दिवशी, ह्यांनी झटकन वर्गात एन्ट्री केली तस मागो-माग आम्ही पण शिरलो आत..

वर्ग भरला, मास्तर आले वर्गात, सकाळचे वातावरण गाराठलेलं, थंड वार दरवळत होत सगळीकडे, हात माझे कुडकुडत होते, मास्तरांचे आपले सुरु होते शिकवणे, पण मी अजूनही त्याच झोक्यात होतो, त्याच फ्लॅशबॅक मधे होतो.. समोरून येणारी ती, तिची अदा, मिश्किलस् हसन, मटकत चालने, छत्रीमागील चेहरा, छत्री न् पाऊस यांचा लपंडावाचा खेळ, माझी मनाची घुसमट, सकाळचा रिमझिम पाऊस.... हे सारं ना माझा मनात सारखं-सारखं वादळी वाऱ्यावाणी घुमत होते, काही क्षणासाठी मी वर्गाच्या बाहेर होतो खरंच..
तस रोजचागत चौथ्या बाकावर मी बसलेला, पण उगाच नजर माझी डावी कडे वळत होती, तिला बघण्यासाठी मान माझी गिरक्या मारत होती, डोळ्यांचे भिंगरीवानी फिरणे चालू होते, केसांवर हिरो इस्टाइल मधे हात फिरवत तिच्याकडं बघत होतो, ती डावीकडे सगळ्यात शेवच्या रांगेतील बाकांमधल्या पाहिल्या बाकावर कडेला बसली होती, डाव्या हातात पेन धरत, हाताखाली एक वही ठेऊन तिची नजर समोर आणि इथून माझी तिरकस नजर तिच्यावर...।।..

क्रमशः .....


नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..

सहज असे मनातले काही शब्द..


................
जितेंद्र वाजे
०७.१२.२०१६