Tuesday, December 6, 2016

ती... भाग ४

ती...

भाग_४

जरासं धाडसचं करतोय म्हणा! जुन्या आठवणींना ढील देत , भूतकाळा तल्या संदुकाला डिवचत, उगाच मनाच्या खोल जाऊन निवांत वसलेल्या त्या रंगीत फिल्मी दुनियेला ढवळत, माझं हे गाराण दळत आहे इथे.. असो..

....त्या पाचजणीने वर येत मनाला माझ्या चांगलच छेडत, भिनवत, समोर येण्याचा थाट मांडला.. जिण्याहून चढत त्या पाचजणी चांगल्या ऐटीत एन्ट्री मारत दुसऱ्या मजल्यावर आल्या, मित्रांनी घातलेला रोजचा गोंधळ मी कानापासून दूर सारत माझं लक्ष त्यांच्यावर फिरवत होतो, पाऊस बाहेर रिमझिम पडत होता, गारठा सगळी कडे जाणवत होता, कुडकुडणाऱ्या अवस्थेत माझी कोवळी नजर त्यांच्यावर घुमत होती, पावसात जरासं भिजल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती, इथे माझं पण पाणी-पाणी झालं होतं काही क्षण, त्यांच्याकडे बघताना माझा डोळ्यात जणू चांदणंच चमकू लागलं होतं..

कोणीतरी डोळ्यावर लाइट मारावी अशे माझे डोळे चमकले आणि तशी ती समोर आली एकदाची. तिची अदा म्हणजे, बघून गुलाबाने पण फिक पडावं, इंद्रधनुष्याने रंगवलेले सप्तरंग हे बेरंग भासावे, उसळनाऱ्या लाटेण क्षणभर स्तब्द व्हावं, वादळी वाऱ्याने शांत व्हावं, अशी तिची अदा.. काहीसं अलगडसा अनुभव घेत मी त्यांच्याकडं पाहत होतो, पण अचानक कोणाचीतरी निरागस, गोंडसस्या एकाची अदा समोर माझा येत होती, चेहरावर मिश्किल स्मित देत, ओलसर केसांना झुलवत, काहिशा ओलसर केसांचा आकडा करून त्यांना बोटांशी खेळवत, डोळ्यांनीच मारा करत, रॅम्पवाल्क करावा असं काहीतरी भासवत "ती" समोरून येत होती, हे जरासं काल्पनिक आहे पण सांगताना मनाला भान राहत नाही माझा म्हणून येत होतं असे काहीतरी मनातून..

घोळका त्यांचा हळू-हळू समोर येऊ लागला, पाठीला एका बाजूस बॅग धरून भारी इस्टाइल मधे, हिल सॅंडल नाही पण जराशी खोटी हाइट दिसावी अशी सॅंडल घातली होती जणू, केसांना एका छोट्याश्या रबरबँड मध्ये खोचून, फिक्कट तांबूस कलरचे केस, कॉलेज ड्रेस मधे, कपाळावर छोटुशी काळी टिचकी (टिकली), ट्यालकम पावडर काहीशा प्रमाणात लावली होती चेहऱ्यावर, डोळ्यांना काजळी लावली होती माझा अंदाजे, एका हातात बारीकस घड्याळ, दुसरा हातात एकच सुंदर ब्यांगल असा काही तरी साधासा पेहरावा हिचा जो नकळत मनाला वार करून गेला त्या दिवशी, ह्यांनी झटकन वर्गात एन्ट्री केली तस मागो-माग आम्ही पण शिरलो आत..

वर्ग भरला, मास्तर आले वर्गात, सकाळचे वातावरण गाराठलेलं, थंड वार दरवळत होत सगळीकडे, हात माझे कुडकुडत होते, मास्तरांचे आपले सुरु होते शिकवणे, पण मी अजूनही त्याच झोक्यात होतो, त्याच फ्लॅशबॅक मधे होतो.. समोरून येणारी ती, तिची अदा, मिश्किलस् हसन, मटकत चालने, छत्रीमागील चेहरा, छत्री न् पाऊस यांचा लपंडावाचा खेळ, माझी मनाची घुसमट, सकाळचा रिमझिम पाऊस.... हे सारं ना माझा मनात सारखं-सारखं वादळी वाऱ्यावाणी घुमत होते, काही क्षणासाठी मी वर्गाच्या बाहेर होतो खरंच..
तस रोजचागत चौथ्या बाकावर मी बसलेला, पण उगाच नजर माझी डावी कडे वळत होती, तिला बघण्यासाठी मान माझी गिरक्या मारत होती, डोळ्यांचे भिंगरीवानी फिरणे चालू होते, केसांवर हिरो इस्टाइल मधे हात फिरवत तिच्याकडं बघत होतो, ती डावीकडे सगळ्यात शेवच्या रांगेतील बाकांमधल्या पाहिल्या बाकावर कडेला बसली होती, डाव्या हातात पेन धरत, हाताखाली एक वही ठेऊन तिची नजर समोर आणि इथून माझी तिरकस नजर तिच्यावर...।।..

क्रमशः .....


नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..

सहज असे मनातले काही शब्द..


................
जितेंद्र वाजे
०७.१२.२०१६

No comments:

Post a Comment