Sunday, February 5, 2017

थंडीच्या रातीतला तो घनगड!!


थंडीच्या रातीतला तो घनगड।

कधी तर जंग लागलेल्या मनाला काहीतरी सुचत असत कुठे जायचे म्हणून धडपडत असत, मग उलटे-सुलटे प्लॅन होत राहतात कधी कॅन्सल तर कधी त्यावर ठाम राहून कुठेतरी जायचंच म्हणून हट्ट धरून बसत असतं हे मन माझे....

कधी-कधी मन माझे असच काही तरी विचारांच्या गोताळ्यात मन  गुंतलेले असते त्याला कशाची लगाम नाही ना माझा त्यावर ताबा.... बेभान तुफानी वाऱ्या सारखे भरकटत असत मन माझे...

असाच मग एक दिवस आला पुन्हा जायचे कुठेतरी मुक्कामी, जगायचे अशी एक रात्र जिथे वाऱ्याची मोकळी लाट येत रहावी, समोर पहावं तर लांबच लांब डोंगरांची रांग दिसावी, आजूबाजूला बेलाग कड्या-डोंगराचा वेढा असावा, उभा असेल तो डोंगर ठेंगणा वाटावा अशी डाव्या-उजव्या बाजूला डोंगर कडे असावेत, वाऱ्याची खेळती लाट डोळ्यात लपलेल्या झोपेला जागी करणारी असावी, ना कुणाची कुणकुण ना कोनाची किर्रर्र असावी अशा ठिकाणी जायचे ठरले आणि थेट घनगड ला मुक्कामी रात्र काढायचे म्हणून प्लॅनला टाळा लावला एकदाचा.. 

ठरल्या प्रमाणे दिवस उजाडला, पोरांनी पेटपूजेची जय्यत तयारी केली होती मग मला डांगे चौकातून एकाला उचलून निघायचं होते, बाकीच्या बायका (दुचाकी बरं का!!) पुढे गेल्या आणि आपले ठरल्याप्रमाणे "आलोच/On the way आहे" ह्या शब्दांचा मान ठेवत प्रवासाला सुरवात झाली. कामशेतला विज्या भेटला मग सोबत त्याला घेऊन सरसावलो ते थेट कोरीगडाच्या पायथ्याला पोहचलो आणि थोडासा घशाला ओलावा म्हणून चहाचा घोट उतरवला घशात, मग मनाची शांती झाली आणि पुढे सरसावलो ते थेट अशा ठिकाणी येऊन थांबलो जिथे Y टर्ण आला जिथे डावीकडे जावे कि उजवीकडे हा प्रश्न होता, मग Google बाबांच्या कृपेने उजवी कडे निघालो आणि खिंड चढवून उतरलो समोर भांबुर्डी गाव सोडून एकोल्यात येऊन थांबलो आधीचा ३ बाईका येऊन वाट पाहत होत्या, आजचा सूर्यास्त थोडक्यात हुकला पण दुःख नाही त्याचे अजून भरपूर अशा गमतीशीर गोष्टी होणार होत्या त्याचा अंदाज होताच म्हणा, पायथ्याला थांबून एक मेकांना गळा भेट देत पोरांनी एकी हेच बळ चा सांगोवा घेतला, आणि पारंपारिक रित्या कोण चुकले, कसे चुकले, कोण उशीरा निघाले ह्यावर तूर्तास चर्चा सुरू झाली, सगळ्या चर्चेवर कानाडोळा करत मी पोटात भुकेने कावळे कोकलत आहेत ह्याची टिच मारली सर्वांना तर कुठे ब्यागान मधून व्हेज रोल काढले आणि हादडले अधाश्या वाणी सर्वांनी....

मग पुन्हा खांद्यांना जड बनवत सर्वांनी ब्यागा घेतल्या आणि अंधाऱ्या रात्री गड चढण्यास सुरवात केली, रातीचा तो काताळ रौद्र रुपात दिसत होता आणि असा सुमसान नजरेने खुणावत होता आम्हाला जणू बेताच्या जेवणाचे आमंत्रण धाडत होता आम्हा सर्वाना, वरती चंद्राची कोर दिसत होती फक्त उजेड नाहीसा झाला होता, समोर काहीतरी दिसावं म्हटलं तर डोळे आंधळे झाले होते सर्वांचे मग रस्ता सापडणे कठीण झालते आम्हाला पण आम्ही काय थांबतोय होय!! तसंच पुढे सरत आम्ही चालू लागलो प्रत्तेकाच्या खांद्यांना जाणीव व्हावी अश्या गोष्टी होत्या, कोनाच्या हातात जेवणाचे पार्सल, कोनाच्या हातात शेगडी, कोणाच्या हातात पान्याच्या बाटल्या तर काय काय भरपूर, एक एक जण दमत घुमत चालू लागला होता, मोबाईल च्या टॉर्चच्या उजेडात आमचं चालणे चालू होते, वरती थोडं गेल्यावर मग मंदिरात सर्वांनी पहिला स्टॉप घेतला मग दम काहीसा जिरपे पर्यंत आम्ही थांबलो मग पुन्हा वरती निघालो, रात्रीची वेळ काहीशी जंगल वाट, दाट झाडी, चाललेला आमचा गोंधळ असा आमचा काहीसा प्रवास चालू होता...

थोडं अजून वर आल्यावर एका पॉइंटला येऊन थबकलो मग पून्हा उजवी कडे फिरून आम्ही चढू लागलो, वरती पहिल्या गुहेत येऊन मोहीम फत्तेची तुतारी मनातल्या मनात सर्व जण वाजवू लागले, आमच्या आधी दोन ग्रुप आधीच आले होते त्यात एक फॅमिली पण होती, त्यांचं मस्त पैकी स्वयंपाक चालू होता, त्यात लहान मुलगी आपल्या आई सोबत मस्त बसली होती, फॅमिली ट्रिप काही तरी अशी पण होऊ शकते ह्याच कौतुक वाटलं मला, म्हणजे कस बाहेर पर्यटन स्थळाकडे जाण्यापेक्षा इथल्या मोकळ्या स्वतंत्र ठिकाणी येऊन घालवलेला वेळ एक वेगळाच आनंद देईल थोडक्यात. मग त्यांचा सोबत थोडं फ़ार बोलणं करून मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला जायचं ठरलं, मग शिडी जवळ येऊन आम्ही सर्व थांबलो कारण इथन पुढं खरी मजा होती म्हणजे थरार वैगरे बोलू शकाल, डाव्या बाजूला मस्त खोल दरी होती म्हणजे घसरला कि गेलाच मग :p , मग मी आणि विज्या पहिलं वर जाऊन सर्व वंगाळ (ब्यागा-बिगा हो!!) आमचे वर चढवले मग एक एकाला वर घेतले, थोड्या वेळात सगळे आल्यावर वरच्या बुरुजावर आलो म्हणेज मोहीम फत्ते झालती इथे, वरच्या बाजूला अजून जाऊन थांबण्याचे ठिकाण ठरवले आणि आमचा पसारा मांडला एकदाचा, जेवण बिवन काय ते पहिले आटपायचे ठरले आमचे तशी तयारी पण केली होती, शेगडी लावली आणलेलं मटेरियल शिजवले आणि जमलो एकदाचे, जेवण आटपून मग आमचे आवरले, थंडीचे दिवस होते तर थंडी जरा जाणवू लागली होती, गप्पा गोष्टी रंगल्या आमच्या, बघता बघता वेळ सरू लागली तशी थंडी पण वाडु लागली होती, मागच्या बाजूला सुधागडच्या डोंगररांगा, बाजूला तैल-बैलाच्या डोंगररांगा थोडक्यात काय तर चोहिकडून डोंगरांनी वेढा घातला होता आम्हाला, शेकोट्या पेटल्या, गप्पा रंगल्या, इथलं तिथलं, मागचं पुढचं, ऑफिसातलं वैगरे वैगरे गप्पांच्या फड ना फड रंगले होते, वेळ हळू हळू सरकत होती मग हातपसरणी-पायपसरणी करत पेंगायला लागले सगळे शेकोटीची उब आता कमी जाणवू लागली कारण वार जरा भलतच रौद्र रूप धारण करू लागले होते, कुड कुडत आपलं सर्वांचं चालू होते पण जस जसा वेळ सरकू लागला तशी थंडीची लाट वाडू लागली होती मग आमच्यातल्या एकानं  पुढाकार घेत टेंट मोकळा केला नि आम्ही चार चौघे घुसलो त्यात, मग कुठं जाऊन बरं वाटलं बाबा आणि डोळ्यांना मिटले जरा काही तासांनसाठी..

पहाटेची जाग आली की वाऱ्याने उठवले कुणास ठाऊक, टेंट चे कापड चांगलच फड फडत होते, जस काय ते तुफान वैगरे आलते कि काय! अंधाराची उजेडाकडे झेप घेणं सुरु होते, आणि आकाक्षी तांबूस रंगाची गडद छटा दिसू लागली होती, गार वारं घोंगावत होत, डोळ्यांवरची झोप अजून हलकीशी फिरत होती डोळ्यात, पोरांची हालचाल सुरु झालती, आवाज बडबड सर्वांची चालू होती, लाइफ मधल पिसफुल मोमेन्ट म्हणजे काय असत ह्यांच मधुर फीलिंग येत होत त्या पहाटेला, चोहीकडे डोंगर रांगा गडाचा अफाट वेढा, किल्ल्याच्या माथ्यावर लव्ह टच काय तो भासू लागला होता मला, माझे सगळं बाजूला सारत वरच्या पठारावर फिरणं चालू होत, ताम्हिणीचा घाट डोंगर, सुधागड डोंगरदेश, लोणावळ्याच्या कोराईचा किल्ला, म्हणजे स्वप्न दुनियेच्या मधेच मी उभा होतो थोडक्यात, किल्याच्या माथ्यावर फक्त पठार आणि खालचा प्रवेश द्वार तेवढांच पण थरार काय त्याची अनुभवती देऊन जातो एवढं मात्र नक्की, इथे दातांचा ताथय्या चालू होता म्हणजे चहासाठी आरोळी देत होता वाजवू वाजवू, तेवढ्यात चहा आमचा तयार आणि थेट तो घशात!!!!

सगळं आवरा आवारी आमची झाली दिनकररावांचे सोनेरी रुपडं डोळ्यात सामावून आम्ही खाली उतरू लागलो, कष्टाची      वारी होती आता खरी कारण रात्री चढताना काय होत आणि काय आहे ह्याची अनुभवती होणार होती आम्हाला, जस जसे आम्ही पूढे सरकू लागलो तस आम्ही च्याक होऊ लागलो कारण बघत होतो ते खरंच भयाण होते, बुरुजावरून उतरताना समोर दिसणारी दरी अंगात कापर येऊ लागलं होतं, मग हळू हळू आम्ही शिडी पाशी आलो जरासं दबकत दबकत आम्ही उतरू लागलो सावकाश, पूढे काहीश्या कालावधीत आम्ही गडाच्या पायथ्याला आलो नि घराच्या मार्गी लागलो.... 

#Ghangad_travel_Blog
#Travel_Story
#jeet


-----------
जितेंद्र वाजे
०६-०२-२०१७