Wednesday, November 30, 2016

ती... भाग ३

ती...

रिवाइंड-बिवाइंड करण्यापेक्षा आपण थेट फ्लॅशब्याग मधेच जाऊ असं वाटत मला..

तसे सकाळचे ७:४५ झाले होते, पावसाने वातावरण कस ओलचिंब केलते सगळीकडे, छत्रीच्या छत्राखाली रिमझिम पाऊस अलगदसा निथळत होता, ओलसर रस्ता, दबक्यांनी चॉकलेटी रंग धारण केलते, हाताच्या तळव्या पासून ते पायाच्या अंगठ्या पर्यंत गारठले होते सर्व, बूट काहिशे चिखलाने माखले होते, बडबड मित्रांची चालूच होती, विषय तसा रोजचाच त्यात काही नवीन नाही, तेच हसन, खिडळन, टवाळक्यागिरी चालूच होती, सगळे आम्ही रंगलो होतो आपल्याच गप्पांन मधे, सोनेरी दिवस ना ते! खरच आहे ते..

हे चालू असताना माझी नकळत नजर सारखी त्या पाच जणींच्या घोळक्या कडे जात होती. पाऊस नाही पण काहीसा रिमझिम सरींचा सडा पडत होता त्यांच्यावर, आणि वारं जरासं वादळी रूप धारण करत होत, ढगातण तलवारीगत सरळ पडणारा पाऊस त्या दिवशी काहीसा आडवा मारा करत होता जसा चेहऱ्यावर ह्याला फटके मारायचे होते सगळ्यांच्या असं काहीतरी अलगड पणा पावसाचा चालू होता आणि त्यात वारं पण भारीच रंगात आलं होत त्यानं पण जरासं छेडने सुरु केलते सर्वांना, माझं काय तर ह्या धडपडीत त्या पाच जणींच्या घोळक्यात लक्ष डोकावत होते, त्यांचे पण छत्री-पावसा सोबतचा लपंडाव चालू होता, हा खेळ काहीसा मजेशीर वाटू लागला मला पण अपेक्षित जे होते ते अजूनही छत्रीच्या आड दडले होते, लपले होते, गुलाबाला का जणू ऐन वेळी लाजाळू पानाचे सोंग घेऊ वाटत होते असच काहीसं होते, समोर काहीसं असताना नजरे आड होते काही तरी माझा, ढगांचा आड लपलेला सकाळचा पहिला सूर्यप्रकाश दडला होता जसा. माहित नाही का ते पण लोहचुंबकावाणी आकर्षित होत होतो मी तिथे, चेहरा कोणाचा दिसत नव्हता पण चालताना माझं लक्ष तिथेच अजूनही, आमचा घोळक्यात मीच असेल जो नजर चुकवत त्यांच्याकडे बघत होता, बर माझं पण तस काही नाही पण नजर हटत न्हवती न:, त्या सर्वीजणी पण त्यांच्याच धुंदीत होत्या म्हणा, चालू होते त्यांचे काहीतरी, बर हळू-हळू मला त्यांचा छत्रीचा नकळत राग येऊ लागला होता, कारणही मलाच समजत नव्हते आणि माझा मनाची होणारी चूळबूळ पण आच्छर्यजणू होती, बर कॉलेज पण जवळ येऊ लागले आणि मग त्यात अजून माझा मनाची आतुरता वाडु लागली, त्यापण येऊ लागल्या आता जवळ आणि अंतर काहीस जास्त नव्हतं त्यामुळं किंचितसा बडबडन्याचा आवाज कुठं येऊ लागला कानाला, चेहरे त्यांचे अजुनही छत्री मागे लपलेले, आता ही वेळ म्हणा कातरवेळ होती जी मला आता जड जाऊ लागली होती, माझा मनाच्या आतुरतेची परीक्षा घेत होती, कोणी जणू मनाला माझा साखळदंडात जखडले होते, काही क्षणाची वेळ पण मला खरच जड जात होती, हुरहूर मनाची वाडु लागली, गारठ्याने तर अंग कापत होत, पण माझं लक्ष, माझं मन, माझी नजर अजूनही त्यांच्याकडेच....

कॉलेजच्या आत आल्यावर त्यांनी आपला छत्र्या बंद करू लागल्या पण आम्ही कॉलेज च्या नियमाचे पालन करत मुलांच्या जिन्याने दुसऱ्या मजल्यावर आलो त्यामुळे अजूनही त्या सर्वजणी छत्रीमागेच होत्या माझासाठी, आम्ही पोहचलो वर्गासमोर आणि थांबलो ठरल्या प्रमाण, तो पाच जणींचा घोळका मुलींच्या राखीव जिन्याने वर येत होता तस अंतर फारसं लांब नव्हतं, जिना आणि वर्गाच्या, पण जरासं होतंच लांब ते, ह्यांनी पण केली एंट्री दुसऱ्या मजल्यावर, कॉलेज ड्रेसचा कलर (मुलिंचा) आता काय आठवत नाही मला पण ते कलर बिलर मला फिकेशे वाटत होते तेव्हा, आणि डोळ्यात माझा सप्त रंगाचे वादळ घुमत होते जणू, कोणी कानाशी गिटार काय ते ताणत होते जणू, माझा पायाला असणारी भिंगरी जकडली होती काहींक्षण जणू, कोणी सुई का टोचाना मलापण मुंगी चावल्याचापण तीचका मला भासला नसता, काय माहित काहीसा वेगळ्याच दुनियेत गेलतो मी जणू, मला कुठं माहित होत राव कि माझी "ती..." त्या पाचजनीच्या घोळक्यात दिसेल ते.....।।..

क्रमशः .....


नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..

सहज असे मनातले काही शब्द..


................
जितेंद्र वाजे
०१.१२.२०१६

Tuesday, November 29, 2016

ती... भाग २

ती...

मागच्या ब्लॉग मधे तस पूर्ण आभाळभर तिचा बद्दल लिहिलं मी, पण ते अजूनही अर्धवट भासत आहे मला, कारण तसं फारस नाही मन माझं भागलं आणि तस म्हटलं तर माझा मनातल्या छोट्याशा तलावा समोर ती एक अथांग समुद्र आहे तशी, मग कशी ती अश्या काहीशा पानभर शब्दात संपेल....

तिच्या बद्दल लिहिणं जरा कठीण आहे पण अवघड पण नाही, कठीण म्हणाल तर शब्द आजकाल कमी वाटतात तिचा बाबतीत, सुरवात करावी म्हटलं तरी करावी कुठून? तिच मिश्किल हसन समोरच्याला घ्यायाल करेन असे स्मित तिचे, डोळ्यात पाहावं तिचा तर मन प्रसन्न होते माझे, काळेभोर डोळे, नजर तशी तेज, त्यात शून्य मात्राचा गर्विष्ठ पणा जाणवणार नाही, मायाळ, निरागस, पाणीदार डोळे तिचे.

मनाला कधी तरी अंधाऱ्या राती, थंड वाऱ्याची झुळूक मनाला छेडून जाते, मग मनाच्या तारेवर आठवणींचे स्वर मग गाऊ लागतात, त्यात ऐकून स्वतःला त्या जगात झोकून दिले जाते मग, बरंच आहे म्हणा त्यात, मनाच्या कानोश्याला, आडोश्याला, कोपऱ्यात, पिटाऱ्यात, संदुकात.....

मग सुरवात होते ते थेट कॉलेजातल्या दिवसात...

कॉलेजात म्हणजे आपण एका नव्या जगात पोहचलो कि काय?! असे ते दिवस होते, पहिले काहीसे दिवस स्वतःला सावरत, आवरत पलटू लागले, ओळख करायची गरज काय? बोलक्या माणसाला कोण ओळखत नाही? मग मित्र झाले नवे, त्यात जुने मित्र पण, मग ओळख हि दहावितील मिळालेल्या टक्क्यावरून झाली, जे झेपले ते आपले झाले आणि जे नाही झेपले ते दुसऱ्या बाकावर बसले, सुरवात हि झाली म्हणा, दिवस खरंच सोनेरी वाटू लागले होते, रोज सकाळी उठून, नवीन पांढरे शर्ट आणि निळी प्यांट घालून ऐटीत कॉलेज ला जाणे, घरातून निघून पुढे एक-एक जण मिळत वर्गात जाणे, मग लेक्चर बसने, सगळेच नवीन म्हणजे अभ्यास, शिक्षक, मित्र, वर्गाच्या भिंती, खिडक्या, बाकं, ब्याग ई.. हे सगळं ताटातील शिऱ्या वाणी वाटत होत म्हणजे कस गोड, अरे हो मुद्याच राहीलच कि! वर्गात मुली पण होत्या, आणि हा तर रोजचा विषय बोलण्याचा, हसण्याचा, त्यात कोणी जुन्या मुली तर बऱ्याच नवीन होत्या, आमच किलोभर लक्ष मुलींकडील बाजूस असायचं, तस काय लोफर, व्हाय्यात टाइप ची पोर नव्हतो आम्ही पण दिवसच तशी होती आंब्याच्या कोवळ्या पानासारखी समजून घ्या आता ते, दिवस तसे उलटत होते अभ्यासात, खेळण्यात, उदळन्यात, खिंडाळण्यात....

पण एक दिवस असा होता तो अजूनही विसरू शकत नाही, लक्षात राहण्या सारखे भरपूर आहे आणि विसरण्यासारखे खूपच शुल्लक, तस काहीस काल्पनिक वाटेल किंवा फिल्मी पण वाटेल असे काहीसे घडले, जे मी जगले, पाहिल, अनुभवले.... तस दिवसाची सुरुवात हि रोज सारखीच झाली, सकाळी कॉलेजची तयारी करून पावसाळ्या दिवसात डोक्यावर छत्री घेऊन निघालो, पाऊस तसाच होता त्या दिवशी, जसा आज ही बरसतो, मुसळधार नाही पण रात्री जोरात पडला होता हे रस्त्यावरील साठलेल्या डबक्यांनी सांगितले, पण पावसाचे काही मन भरले न्हवते कारण तो अजूनही रिमझिम पडत होता, मग कॉलेज समोर आलो आम्ही सर्व, म्हणजे जवळच कॉलेजच्या, माझी नजर का जणू डावी कडे गेली, मनानी साद घातली असेल जणू, तेथून काहीश्या पाच जनींचा घोळका येत होता, त्यांच्यात मोजून तीनच छत्र्या तशा त्यामुळे शेयर करत त्या सर्व येत होत्या, काहीस्या बोलत हसत पण रिमझिम पडणाऱ्या पावसाशी झगडत येत होत्या.....

क्रमशः .....


नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..

सहज असे मनातले काही शब्द..


................
जितेंद्र वाजे
३०.११.२०१६

Monday, November 28, 2016

ती...

ती...

तीच्याबद्दल मी काय लिहू आता..

तसं बरचस असं मी मांडले आहे शब्दात, चारोळ्यात, कवितेत, तीन यावं आणि माझी पहाटेची साखर झोप मोडावी, स्वप्नात येऊन मऊशार कापूस पुंजक्यात मनाला माझा गोंजरावे..

सर्व म्हणा अजूनही तिचेच आहे, न सांगता अजूनही मालकी हक्क माझा तिच्याच नावे आहे, तिने अजूनही यावे आणि राज्य माझावर गाजवावे, राणीसारखी ठेवेन असे म्हणत नाही मी, पण एका राजरानी पेक्षा जास्त तिचा थाट असणार एवढे नक्की सांगतो..

बर बरंच काही आखले होते, ठरवले होते, निश्चित केले होते, स्वप्न बघितले होते म्हणा.. सोबत तिचा कुठं तरी दूर म्हणजे अश्या ठिकाणी जिथं फक्त ती आणि मी.. तलावाच्या काठी, ओलर खडकावर, पाण्यात पाय सोडून हातात तिचा हात माझा, बोलके ठेवत वेळ मी काढेन, कधी तिचा ओलसर केसांना छेडत, अंगाशी तिच्या खेटत, शराबी तिच्या डोळ्यात बघत, गुलाबी गालांची हळुच गालगुच्छा घेत, मधाहुन गोड तिचा ओठांनवर गुलाबाच्या लालसर रंगाची छटा उमटवत, माझी सोनेरी वेळ मी घालवेन.. तीन पण काही तरी बोलावं असं मनाशी ठरवत तिला काहीतरी विषयावर बोलके करण्याचा माझी धडपड मी सुरू ठेवणार, उगाच मागच्या आठवणींना ढील देत माझी बडबड सुरु करणार, मग तीन थोडस गोजिरं हसावं माझा शब्दा-शब्दात तिनं स्वतःला ऐकावं, तिनं किती सुंदर दिसावं याचं मी शब्दात तोंडभर बोलावं, मग हळूच थंडीची एक लहर यावी तीन मग हाताची घडी करत स्वतःला स्वकुशीत घ्यावं, माझं अलगड पणा साधावा मी मग तिला हलकेस मिठीत घ्यावं आणि तिची होणारी मनाची कुचंबणा मी जानवावी मग बोलण्यात मी तिच मन माझाकड वळवावं, आमच्यात काय बोलणे काय सवांद होत आहे याचा तिला ना मला भान असावा..

तसे पावसाळी दिवस पण मी विणले होते मनात तीचासोबतचे, तसे ते पण दिवस ओलसर आहेत अजून मनात माझा, तीन ऑफिसला कारण देत बाहेर निघावं, ठरल्यावेळेत भेटणे, तिला डोळ्यांनीच इशारा करत गाडीवर बस अशी डोळ्यांनि केलेली तिला विनवणी, तीन मग मग खांद्याचा आधार घेत पाठी माझा बसणं, गाडीला किक मारून ठरल्या ठिकाणी निघणे, तिचा माझातला सवांद तसा खूप कमी त्यामुळे सुरवात कुठून करावी याचा प्रश्न दोघांना, मग माझाकडून सुरवात होते मग तीन दबक्या आवाजात मी जे बोलेल त्याला उत्तर देत राहणे असा काहीसा आमचा प्रवास सुरु, पावसाने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी अचूकतेने पार पाडणे आणि रिमझिम पावसाची सर सुरु होणे, तीचं उगाच पावसाचा राग यावा असं वागणं मग गप्प बसून पाऊस अंगावर झेलत बसणं,  नकळत तीन मला मिठी मारते जणू ति गारठ्याने कुडकुडत असावी, मी पण मनातल्या प्रेमाच्या वेलीला पसरू देत होतो, पाऊस चांगलाच बरसू लागला होता मग एका टपरी वर थांबून चहाचा एक घोट मारावा आम्ही, तसं चहा पिताना माझी नजर तिचा केसांवरून टपकणारा पाऊसावर होती, वाफाळलेला चहाचा कप तीन एव्हडा घट्ट पकडला होता की बस्स मग, तिथंच घायाळ मी, तिचे ओठ बोलत कमी होते पण थर-थर जास्त कापत होते, तिची अशी अवस्था पाहून मलाच कीव येते मग माझा अंगावरला जॅकेट तिला घालतो मी, प्रेम ह्यालाच म्हणतात वाटत, पावसात पाऊस तर मुसळधार पडून जातो पण आठवणी मागे सोडून जातो म्हणा..

बर किती मांडू आता इथे तिचा बद्दल, माझा माझावर काही ताबा नाही ना  माझा मनाला कशाची लगाम, मी तसा बेलगाम असतो जेव्हा तिचा बद्दल लिहिणं असत, मग मी थांबत नसतो ना ऐकत असतो कोणाचं..

नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..

सहज असे मनातले काही शब्द..


................
जितेंद्र वाजे
२९.११.२०१६