तिच्या
विळख्यात.. ©®
सकाळी ऑफिसला मी घाईतचं निघालो, तिने टिफिन भरून टेबलावर ठेवला होता. तिला कडी
लाऊन घे म्हणत मी बाहेर पडलो, रोजची सवय जाताना तिला हलकीशी स्माईल देऊन मी खाली
उतरायचो पण आज मी जरा जास्तच घाईत होतो त्यामुळे खाली जाऊन गाडीला कीक मारून
ऑफिसला निघालो, महिनाअखिर होता त्यामुळे कामाची गडबड चालू होती ऑफिसात आणि हेचं
डोक्यात फिरत होते, गाडी चालवताना मला का जणू तिची आठवण येत होती तिचा बोलका चेहरा
डोळ्या समोर येत होता, मी निघताना आईचे पूजा-पाट चालू होते कानाशी घंटीचा आवाज तो
अजून किन्न केल्यागत घुमत होता पण निघताना हि किचन मधून माझा कडे मिश्कीलपणे हसून
बघत होती पण मी तेव्हा रोजच्या गत आपलं तिच्याकडे बघून तयारीला लागलो होतो पण तिचा
चेहऱ्यावरील हाव-भाव काही तरी मला सांगत होते आज पण त्यावर माझा डोक्याची बत्ती
पेटली न्हवती, ट्राफिक जशी सरकत होती तसं तसा मी पुढे होत चाललो होतो, का जणू तिला
मला आज काहीतरी सांगायचे होते आणि मी ते ऐकून न घेताच निघालो होतो असा काहीसा मला भास
होत होता, ऑफिसला मी पोहोचलोच, पार्किंग ला गाडी लाऊन खालच्या चहा टपरीवर जाऊन एक
चहाचा अर्धा कप घेतला आणि वर पोहचलो ऑफिसला..
ऑफिसातली तीच रेटलेली कामकाम आपल सुरु करत दिवस सुरु झालता, मंथएंड त्यामुळे
ऑफिस मध्ये सगळ्यांची कामाची गर्दी झाली होती, माझा म्यानेजर तर फिरकला पण नाही सकाळ
पासून त्यामुळे कामाचा स्पीड अजून तरी जोमातच होता, मोबाईल सायलंट वर असतो रोज
त्यामुळे त्याकडे पण लक्ष नाही, दुपारचे आता बारा होऊन गेले होते, लगबग जेवणाची
वेळ पण झाली होती, टीमची सगळे जन टिफिन घेऊन कॅन्टीनला जायची तयारीला लागले तसं मग
मी पण आपल निघालो, टिफिन मध्ये काय असते हे मला टिफिन उघडत नाही तोवर काय ते समजत
नसते, बायकोची किमया काय चमत्कार घडवते हे ते टिफिन उघड्ल्यावरचं समजते, कॅन्टीन मधे
जाऊन टेबलावर सर्व बसले, टिफिनच्या वरच्या डब्यात आज गोड शिरा होता, दुसर्या
डब्यात माझी आवडीची शेपूची भाजी, तिसर्यात आपले नेहमीचे वरण-भात. मला जरासे उचकी लागल्यागत
झाले, आता सकाळ पासून कोणाचे फोन आले कि नाही हे मी बघितलेच नाही कारण कामच एवढे
होते आज, आमचे सर्व उरकून आम्ही रोजच्या ठिकाणी जाऊन जमलो, जाताना मोबाईल चेक
केला, बघितले तर हिचे वीस ते पंचवीस मिसकॉल येऊन गेलते, मी जरा दचकलोच कि आज हिला
काय एवढी कळ लागली कारण रोज कधी एक साधा कॉल नसतो आणि आज काय तर म्याडमचे एवढे
कॉल, मी लगेच कॉल फिरवला हिला, समोरून तसे जाळ ऐकू येणार हे गृहीत धरले होते मी पण
हिचे काही तर नवीनच आज, मला म्हणते कशी शिरा आवडला का? मी पण आपल गोड तोंड करत
शिर्याची तारीफ करत तिला जाम खुश केले, म्याडम आज जरा भलत्याच मूड मध्ये बोलत
होत्या, बोलणे झाले पुन्हा काम आपले अंगाशी घेत संध्याकाळ होई पर्यंत राबत बसलो, मग
नंतर हिचा पुन्हा कॉल काय तर घरी लवकर या म्हणून, मी आपल हो ला हो बोलत ठेवला फोन,
घड्याळाचा सातचा काटा पुढे गेलता मग आपले आवरून घरी निघालो, घरी पोहचलो आणि घरामधे
घुसलो तसे आईची करडी नजर माझावर आणि मी मनात म्हटलं काय झाले मातोश्रींना आज मग
पुढे आत जाऊन फ्रेश झालो, घरामधे चुळबुळ चालू होती ते मला काय समजले नाही, आईने
पुन्हा माझाकडे बघत जवळ आली आणि कान पिळले, च्यायला आता काय केले मी, आईने ओरडत
बोलून गेली कि बायकोची काळजी आहे कि नाही गधड्या, काही समजते कि नाही तुला असं
काही तरी बडबडत होती, पण मी आपल गुमान ऐकत बसलो..
बेडरूम मध्ये मी गेलो, झोपताना हिला आता गोडीत विचारावे म्हणून जवळ गेलो, आज
नक्की काय झालते ते मला काही अजून कल्पना नाही कि नेमके काय बोलायचे होते आईला, इथे
हि अजून वेगळ्याच ख़ुशी मध्ये होती, तिने आज माझा जीव घ्यायचे ठरवले होते वाटत, कारण
डोळ्यांना काळसर काजळ लाऊन, शेहरयावरचा हलका मेकअप, कपाळावर चंद्रकोर, कानातले झुंमके
तिचे मस्त डोलत होते, केसांना मोगरयाचा गजरा माळला होता, मोगरयाचा सुगंध मस्त खोलीत
दरवळत होता, हिच्या खोडील स्वभावाची सवय आहे मला पण आज नेमके काय चालले होते तेच
समजत न्हवते, तरीही आपले धाडस करून हिच्या जवळ गेलो, तिच्या बाजूला बसलो क्षणभर पण
मी ब्ल्यांक झालतो, काय झाले म्हणत तिच्या कानाशी हळूच विचारारले, तिने हलकीशी
स्माईल दिली, मी पुन्हा तिला लाडील आग्रहाने विचारून लागलो तिने मग डोळे बंद करून,
काही वेळ शांत बसली, मग पुन्हा माझा कानाशी येऊन हलक्या आवाजात काही तरी बोलून
गेली..
हिने कानाशी बोलून गेलेल्या चार शब्दात माझे जग बदलून टाकले होते, मी कावरा
बावरा झालो होतो, तिच्या भरलेल्या डोळ्यांना बघत, खुलून आलेल्या चेहरावर हात ठेवत
माझा आनंद मी आवरण्याचा प्रयत्न करत होतो, तिला काही कळण्या आधीच तिला हलीकीशी
मिठी मारली, तिच्या भरलेल्या डोळ्यात मी पाहत, तिला जवळ ओढले, मनाशी फुललेल्या
मोगर्याला मी ओठांवर आणत तिला मी “थंक यु डियर फॉर गुड न्यूज” म्हणत तिच्या फोरहेडवर
कीस करत मी मोकळा झालो..
तिने सांगितलेला बातमीने माझे अवघे जग बदलले होते रात्री पासून, सकाळी जाग मला
पहाटेच आली होती, उठ्ल्यावार तिच्याकडे पहिले ती गाड झोपेत होती, तिला उठवायचा मी
आता अलगड पना माझाकडून आता होतं न्हवटा, तिच्या चेहऱ्यावरची गोड स्माईल बघून माझा
ओठांना पण हसु आवरले नाही, तसेच बाहेर बालकनीत जाऊन थांबलो समोर तांबड आलेल्या
आकाशाकडे बघत मी निवांत मनाशी विचार करत बसलो, आजची सकाळ माझासाठी काहीतरी नवीन वर्षाची
पहिली सकाळ असल्यागत भासत होते, काही वेळाने बालकनीत आलेल्या कोवळ्या उन्हात बसलो,
सकाळच्या कोवळ्या उन्हात थांबताना मला क्षणभर आनंद काहीसा गोडसर वाटू लागला होता, हि
झोपेत गोड तर दिसतेच पण आज तिच्याकडे बघताना मला भलताच गोडवा मनामधे घोळू लागला
होता. तिला त्रास द्यायचे नाही ठरवून मी चहा बनवला आणि कपात घेऊन बाल्कनीत जाऊ
थांबलो..
माझ्या मनाच्या आनंदाचे वारे जोरानं घुमत होते आज, सारखे हिला आवडणाऱ्या
गोष्टींची लिस्ट समोर येत होती, तिला आवडणाऱ्या गोष्टी म्हणजे - चोकलेट, कॅडबरी, पाणी
पुरी, मिठायीतील एक एक प्रकार, फिश, नॉन वेज मध्ये तसे भरपूर काही, व्हेज मध्ये
तिची एक एक लीस्ट आहे, माझ्साराखीच ती मिसळ वेडी, तिला वेस्टर्न फूड नाही आवडत
कारण तिचा आपल्याच खवई जगात तिला रमू वाटते, बाहेर हुंदडायला, फोटो काढ, शॉपिंग, तिला
साडी फार आवडते आणि ती साडीत दिसते पन सुंदर... असे बरेच काही येत होते मनात कारण
आता तिची हौस पुरवण्याची एक लाट आली असल्यासारखे झालते, तिच्यासाठी काय करू आणि
काय नाही, तिची काळजी अजून कशी चांगल्या पद्धतीने घेता येईल ह्याच विचारात मी होतो
काही वेळ, माझा डोक्यातले भ्रमांड घुमत हते, पहिल्या दिवसाची पहिली सकाळ अशीच जात
होती माझी, ठरल्याप्रमाणे तिने टिफिन देऊन मला ऑफिसला जायला मोकळे केले, ऑफिसात हि
बातमी सांगणे मला काही बरे वाटले नाही म्हणू हे सर्व माझाच मनाशी गुप्त ठेऊन
ऑफिसात गप्प काम करत बसलो होतो. संध्याकाळी मग घरी जाताना मस्त मोगर्याचा भरलेला
गजरा घेऊन गेलो, तिला हळूच झोपण्या आधी तिला तो गजरा तिच्या पदरात ठेवला, तीची
ख़ुशी वेगळीच रंग घेत होती आज, मी आपले तिच्यातले सात रंग बघत तिच्या कडे बघत बसलो,
तिलाहि माहित होते माझी काय अवस्था झाली आहे ते., मी असे काहीतरी वेगळे आगळे करेन
ह्याचा तिला अंदाज न्हवता, मग नंतर आमच्या गप्पा रंगल्या तिला ख़ुशी भेटेल अश्या
काही जुन्या आठवणींची फोडणी देत तिच्या हसण्याचा मीटरला मी वाढवू पाहत होतो, काही
वेळाने आम्ही झोपून गेलो..
आता ह्याचा पुढे उगवणारा दिवस हा माझासाठी तोला मोलाचा होता, पुढे लिहिण्या
सारखे भरपूर आहे पण इथेच थांबतो, शब्दांचे काय त्यांना उराशी धरले कि पानभर ओलं
करून जातात...
टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p
©®
#blogger
-----------
जितेंद्र वाजे
२४-१०-२०१७
जितेंद्र वाजे
२४-१०-२०१७