Friday, October 30, 2015

रतनगड....

रतनगड ट्रैक म्हटल तर दोन दिवसांचा थरार आता असे ध्यानात पक्के राहणार म्हणा कारण जे जगलेले 2 दिवस awesome च की.....

शनिवारचा रतनगड सर करायचा म्हणून पुरता प्रवासात गेलेला दिवस मग केलेल्या एकदिवसीय ट्रैक चा नाईट ट्रैक होणार ह्याची लागलेली उगवती खून , पावसाने केलेला आक्रमण आणि बघता बघता मांडलेला तांडव, संध्याकाळचे 5 लाच झालेला वतावरणातील काळोख़ त्यात रतनवाडीत पोहचल्यावर पाठीला आणि झड़प मारणाऱ्या डोळ्यांना आराम मिळावा म्हणुन केलेली निवाऱ्यासाठी जिगरीची जुळवाजूळव, चिकन च्या रस्याणी टाकलेली माण आणि मग बदल्यात सांगीतलेल्या तूर-डाळीचे वरण मग समोर वाडलेल्या (चिकन चे मसल्यात होरपळलेले पीसेस, चपाती, वरण-भात) सोनेरी ताटावर मारलेला ताव, नंतर भलत्याच रंगलेल्या अंधार रात्रीच्या गप्पा त्यात ना रोजच्या गोष्टी ना ऑफिसातल्या गंजत आलेल्या किस्से, मग निवांत झोप, सकाळी लवकर उठून गडावर जाण्याची धडपड. सकाळच्या कोवळ्या उन्हातुन ते प्रखर उन्हात आणि जंगलाच्या दाट झाडीच्या सावालीतून केलेला गड सर, मग वरती गडावर उन्ह-पाऊस-सावली-धुके ह्यांची रमलेली खेळी, पूर्ण रतनगड हिंडडूण काडल्यावर अंगाची लाही-लाही होत होती त्यात परतीचा मार्गावर येताना खळ-खळुण वाहनारी प्रवरानदीकडे पाहून आमच्यातल्या कोणाचा थारा राहीला नाही आणि सर्व काही विसरूण आम्ही वाहत्या नदीत उड्यामारल्या, दोन दिवसाचा थक़वा कसा गायब झाला ते कळलेच नाही.... थोडक्यात सांगायचे तर भरपूर अनुभवांचे गाठोडे बांधले ह्या दोन दिवसात.....

शनिवारी पाहलेली Vinayak Vishwanath Belose आणि Rahul Dharmaji Bulbule ची पोष्ट बघुन वाटले भेट होईल मित्रांची आणि म्हटल आज तरी भेटीचा योग लागेल पण आमचा नशीबात वेगळाच योग लिहला होता म्हणून भेट पुन्हा राहिलीच. दुसऱ्या दिवशी Vinayak ची पुन्हा रतनगड-हरिशचंद्रगड ची ट्रैक पोष्ट पाहून आता एक नवीण आग ओकु लागली आहे, आता पुन्हा इथली ओढ़ वाढू लागली आहे, एक वेगळ्या अनुभवाच्या प्रतीक्षेत.



#Ratangadfort_Blog
#Travel_Story
#jeet


-----------
जितेंद्र वाजे
०६-१०-२०१५


एक उणाड दिवस..

रोजच्या ढका-बुकीच्या जगन्यातून ठकलेल्या अंगला आणि पुरता कोमेजलेल्या मनाला कधीतरी निवांत जगण्याचा बेत होत असतो मग सगळे आहे असे सोडायचे, नको रोजचे ते टेंशन मग सगळे ते तिथेच मागे सोडून निघायचे, रोज लटकणाऱ्या गळ्यातील म्हणजे आपन कामगार आहोत ह्याचे प्रतिक म्हणून आठवडाभर  घालून  मिरवतो ऑफिसातले ते I-CARD त्याला तसेच घराचा कोपरयात एका खिळयाला शिक्षा म्हणून टांगनीवर लावणे, मग सकाळी पोटात काही भरले किंवा नाही ह्याची चिंता मुक्त पने बाहेर पड़ने, गाड़ीवर साचलेली धूळ तशीच कपड़याना चिकटु दे किंवा कपडे खराब होउ दे ह्याची परवा न् करने, गाडीच्या घश्यात पुरेसे तेल आहे की नाही ह्याची खात्री करने आणि किक मारने, रोज त्याच गाड़यांची गर्दी दूर करत प्रवासाला सुरवात करने, मग प्रवास अर्धा कापल्यानंतर पोटात काहीच नाही ह्याची चाहूल लागने मग रस्त्यावर मिळेल त्या हॉटेलात विसावा घेणे आणि नगण्य वडापावर ताव मारने आणि त्याचा जोडीश वाफाळलेला चहा ढोसने, मग सुखद ढेकर देत पुन्हा उरलेल्या प्रवासाला सुरवात मग पोहचल्यावर सोसल तेवढे चालून पायाची होणारी लाही-लाही सहन करने आणि तसेच चालत राहणे, मग मनाला कुठेतरी हलकस वाटत जाते कुठून तरी तो रोजचा गर्दीचा गोंगाट हा दूर झालेला जाणवतो मग समोर दिसनारा पाण्याने भरलेला तलाव त्याचा काठावरी सावली मिळावी म्हणून एक मोठे झाड़ शोधताना झालेली घुसमट आणि सापडलेल्या झाड़ाखाली मग एक निवांत पड़ी मारने..

असा कधी तरी एक उनाड दिवस जगायचा मग नंतर जे मिळणारे सुख आहे ते शब्दात मांडणेही अवघड होते..

असाच एक उनाड दिवस जगला होता आणि मग निवांत पड़ी मारल्यावर ह्या शांततेला टिपन्याचा केलेला छोटासा  प्रयत्न..

#Somewhere_at_unknown_place
#Travel_Story
#jeet


-----------
जितेंद्र वाजे
२७-१०-२०१५

Sunday, October 18, 2015

जीवधन गड

जीवधन गड ..... प्रवास पावसातला
( प्रवासात पाऊस .. पावसात प्रवास)

हापिसात बसून आम्हा तिन टाळक्यान मधे (मी, सुम्या आणि कौशल) रायगड नंतर पुन्हा एक पावसाळी खमंग खिचड़ी डेस्कवर बसल्या बसल्या शिजू लागली......!

आता ती थेट #जीवधन ला जायचे म्हणून शेवटची शिट्टी घेऊण शेगडी बंद केली, ते पुन्हा जायचे कसे आणि केव्हा ते डोक्यात खळबळ सुरु झाली. मग ठरल्या नुसार ७ जनामधील ४ जनांचे यायचे रद्द झाले पण आमचा मनातल्या जिगरिची ठिणगी कवाच आग होउन पेटू लागली होती मग आमचे थांबने अशक्यच होते हो..... :)

गाडीत आता आम्ही फक्त तीनच पण मणी ध्यानी का आले कुनाच ठाउक तेच लहान पनीचे हो "तिन तिगाड काम बिघाड :p " म्हणून दरवाजा उगडून तसाच वाकून एक ओला दगड हातात घेउन दार ओडून घेतले आणि सुम्याने गाडीला स्टार्टर मारून गाड़ी चालू केली, #Syntel ला तूर्तास टाटा बाय बाय करत प्रवासाला सुरवात झाली. जोमात आणि वेगात तर आम्ही होतो पण गाडीच आपली सुसाट धाऊ लागली होती, चाकण सोडून केवा नारायणगावात आलो समजलेच नाही मग तसेच शिवनेरी कड़े दर्शवनारी पाटी बघून टर्न मारला आणि सुसाट खुद्द जुन्नर मधे पोहचलो, उन्हाळा तर नाही मग कोरड घशाला कशी पडणार तरीही तळमळ मनाची का सुरु झाली ते कळण्या आधीच स्टँडच्या जवळील चहाच्या टपरी समोर गाडी थांबली "मावशी तीन चहा दया हो"  असा हुंकार देत चहा मागवला आणि चहा धोसुन तसाच पुडील मारगी लागलो....

खरी मजा तर आता सुरु झाली, पाउस तर पार बेपत्ता झाला होता पण इथे घाटघरात निसर्ग चांगलाच मेहरबान झाला होता वाटत.सफेद आभाळाने सुंदर आपले रूप फुलारण्यास सुरवात केली आणि काळभोर ढगांची छटा वर जरा दिसू लागली होती. पावसाळा काय ते इथे खरच जाणवू लागले आणि समोर काचेवरील वायपर ची हालचाल सुरु झाली. शाळे पासून ते आजपर्यंत इंद्रधनुष्य काय ते धगातच कूटे लांब पाहायला भेटले पण आज जसे नशीब मी मुठीतच घेउन आलो आहे तसे एक-एक चमत्कारिक गोष्टी दिसू लागल्या होत्या. घाटघर कड़े जानारया रस्त्यावर इंद्रधनुष्य उजवी कडून डावी कड़े पडला होता जसा आमचा स्वागतासाठी सुंदर रंगीत इन्द्रराज्यातील प्रवेश्द्वारच बनवले होते. घाटघर गावात पोहोचलो जाताना कोणास विचारावे म्हणून समोर एक भाऊ येउन प्रकट झाले त्यांचाशी बोलता बोलता तसचः त्यांना गाड़ीमधे बसवले आणि नानेघट वाटेने जायचे ठरले, तिथल्या होटेलात चहाचा घोट मारला आणि खरया प्रवासाची सुरवात करायचे ठरवले.

पावसाने आपली संथ धार सुरु ठेवली होती आज मस्त चिंब काय ते भीजायचे थरवलेच होते म्हणा, वातावरण जसे मस्त मधासारखे गोड़ झाले होते, अनुभवताना प्रत्तेक क्षण हा साखरेपेक्षाही गोड़ वाटु लागला होता. नानाचा अंगठा आपल्याच धुंदीत छाती ताठ तानून समोर कल्याण शहराकडे बघत होता, वारयाचे त्याला काही डर न्हवते जसा बेडर पने त्यांना छातीवर झेलत होता, समोर वांदरलिंगी सुळखा पण टतस्त उभा होता जसे जीवधन गडाच्या रखवालीलाच थांबला आहे पण त्यालाही धुक्यानी आपला मऊ कुशीत घेतले होते आणि प्रेमात त्याला गोंजारतच होते. हा सर्व खेळ चालू असताना आम्ही जंगलवाट तुडवत मार्गी लागलो. जंगलवाट भ्रमंती म्हणजे एक हा वेगळाच अनुभव असतो ( चालताना अंगाला बोचनारी झाडी, त्यांना सावरा सावर करत जाने, वाटेवर पडलेला ओला पाला-पाचोळा, शेखरुच्या शिट्या, पक्षांची किलबिलाट, चालताना झाडांवरील दवबिंदुने भिजलेले हाथ etc) असे बरेच काही जे इथे आल्यावरच पदरी पडतो अनुभव....

जंगलवाट वर चडून वांदरलिंगी सुळक्याला उजवीकडे सोडून डाव्या मार्गाने वरती चालत निघालो तसाच कड़े कडेने वाट काडत पायरी टप्याला पोहचलो थोडा आरामाला बसलो, डोळयांणा माझा भलतेच स्वातंत्र्य मिळाले होते आज ते बेभान पने समोर दिसनारया नजारयावर टक लाऊण बसले होते नकळत मनाला हलके वाटले आणि इथे आल्याचे सार्थकी लागले असे वाटले क्षणात. पायांना कोणास ठाऊक कसली तर-तरी आली होती तसाच मला वर खेचत चडाइस सुरवात करुण कल्याण दरवाज्याचा पायरयापर्यंत पोहोचलो. पावसाने पायरया पुरत्या मऊसर, घसरडया  केल्या होत्या, जीव मुठीत धरून हळूहळू चढाई केली, जीवाची एक करुण कठीन काय तो पल्ला हा सर केला थोडक्यात इथेच मोहिम फत्ते झालती म्हणा  पण पूड़े तसाच वरती जाउण किल्ला फिरलो आणि परतीचा मारगी लागलो....

#Travel_Story
#JivdhanFort

......................
जितेंद्र वाजे
१७.०९.२०१५