Friday, October 30, 2015

एक उणाड दिवस..

रोजच्या ढका-बुकीच्या जगन्यातून ठकलेल्या अंगला आणि पुरता कोमेजलेल्या मनाला कधीतरी निवांत जगण्याचा बेत होत असतो मग सगळे आहे असे सोडायचे, नको रोजचे ते टेंशन मग सगळे ते तिथेच मागे सोडून निघायचे, रोज लटकणाऱ्या गळ्यातील म्हणजे आपन कामगार आहोत ह्याचे प्रतिक म्हणून आठवडाभर  घालून  मिरवतो ऑफिसातले ते I-CARD त्याला तसेच घराचा कोपरयात एका खिळयाला शिक्षा म्हणून टांगनीवर लावणे, मग सकाळी पोटात काही भरले किंवा नाही ह्याची चिंता मुक्त पने बाहेर पड़ने, गाड़ीवर साचलेली धूळ तशीच कपड़याना चिकटु दे किंवा कपडे खराब होउ दे ह्याची परवा न् करने, गाडीच्या घश्यात पुरेसे तेल आहे की नाही ह्याची खात्री करने आणि किक मारने, रोज त्याच गाड़यांची गर्दी दूर करत प्रवासाला सुरवात करने, मग प्रवास अर्धा कापल्यानंतर पोटात काहीच नाही ह्याची चाहूल लागने मग रस्त्यावर मिळेल त्या हॉटेलात विसावा घेणे आणि नगण्य वडापावर ताव मारने आणि त्याचा जोडीश वाफाळलेला चहा ढोसने, मग सुखद ढेकर देत पुन्हा उरलेल्या प्रवासाला सुरवात मग पोहचल्यावर सोसल तेवढे चालून पायाची होणारी लाही-लाही सहन करने आणि तसेच चालत राहणे, मग मनाला कुठेतरी हलकस वाटत जाते कुठून तरी तो रोजचा गर्दीचा गोंगाट हा दूर झालेला जाणवतो मग समोर दिसनारा पाण्याने भरलेला तलाव त्याचा काठावरी सावली मिळावी म्हणून एक मोठे झाड़ शोधताना झालेली घुसमट आणि सापडलेल्या झाड़ाखाली मग एक निवांत पड़ी मारने..

असा कधी तरी एक उनाड दिवस जगायचा मग नंतर जे मिळणारे सुख आहे ते शब्दात मांडणेही अवघड होते..

असाच एक उनाड दिवस जगला होता आणि मग निवांत पड़ी मारल्यावर ह्या शांततेला टिपन्याचा केलेला छोटासा  प्रयत्न..

#Somewhere_at_unknown_place
#Travel_Story
#jeet


-----------
जितेंद्र वाजे
२७-१०-२०१५

No comments:

Post a Comment