जीवधन गड ..... प्रवास पावसातला
( प्रवासात पाऊस .. पावसात प्रवास)
हापिसात बसून आम्हा तिन टाळक्यान मधे (मी, सुम्या आणि कौशल) रायगड नंतर पुन्हा एक पावसाळी खमंग खिचड़ी डेस्कवर बसल्या बसल्या शिजू लागली......!
आता ती थेट #जीवधन ला जायचे म्हणून शेवटची शिट्टी घेऊण शेगडी बंद केली, ते पुन्हा जायचे कसे आणि केव्हा ते डोक्यात खळबळ सुरु झाली. मग ठरल्या नुसार ७ जनामधील ४ जनांचे यायचे रद्द झाले पण आमचा मनातल्या जिगरिची ठिणगी कवाच आग होउन पेटू लागली होती मग आमचे थांबने अशक्यच होते हो..... :)
गाडीत आता आम्ही फक्त तीनच पण मणी ध्यानी का आले कुनाच ठाउक तेच लहान पनीचे हो "तिन तिगाड काम बिघाड :p " म्हणून दरवाजा उगडून तसाच वाकून एक ओला दगड हातात घेउन दार ओडून घेतले आणि सुम्याने गाडीला स्टार्टर मारून गाड़ी चालू केली, #Syntel ला तूर्तास टाटा बाय बाय करत प्रवासाला सुरवात झाली. जोमात आणि वेगात तर आम्ही होतो पण गाडीच आपली सुसाट धाऊ लागली होती, चाकण सोडून केवा नारायणगावात आलो समजलेच नाही मग तसेच शिवनेरी कड़े दर्शवनारी पाटी बघून टर्न मारला आणि सुसाट खुद्द जुन्नर मधे पोहचलो, उन्हाळा तर नाही मग कोरड घशाला कशी पडणार तरीही तळमळ मनाची का सुरु झाली ते कळण्या आधीच स्टँडच्या जवळील चहाच्या टपरी समोर गाडी थांबली "मावशी तीन चहा दया हो" असा हुंकार देत चहा मागवला आणि चहा धोसुन तसाच पुडील मारगी लागलो....
खरी मजा तर आता सुरु झाली, पाउस तर पार बेपत्ता झाला होता पण इथे घाटघरात निसर्ग चांगलाच मेहरबान झाला होता वाटत.सफेद आभाळाने सुंदर आपले रूप फुलारण्यास सुरवात केली आणि काळभोर ढगांची छटा वर जरा दिसू लागली होती. पावसाळा काय ते इथे खरच जाणवू लागले आणि समोर काचेवरील वायपर ची हालचाल सुरु झाली. शाळे पासून ते आजपर्यंत इंद्रधनुष्य काय ते धगातच कूटे लांब पाहायला भेटले पण आज जसे नशीब मी मुठीतच घेउन आलो आहे तसे एक-एक चमत्कारिक गोष्टी दिसू लागल्या होत्या. घाटघर कड़े जानारया रस्त्यावर इंद्रधनुष्य उजवी कडून डावी कड़े पडला होता जसा आमचा स्वागतासाठी सुंदर रंगीत इन्द्रराज्यातील प्रवेश्द्वारच बनवले होते. घाटघर गावात पोहोचलो जाताना कोणास विचारावे म्हणून समोर एक भाऊ येउन प्रकट झाले त्यांचाशी बोलता बोलता तसचः त्यांना गाड़ीमधे बसवले आणि नानेघट वाटेने जायचे ठरले, तिथल्या होटेलात चहाचा घोट मारला आणि खरया प्रवासाची सुरवात करायचे ठरवले.
पावसाने आपली संथ धार सुरु ठेवली होती आज मस्त चिंब काय ते भीजायचे थरवलेच होते म्हणा, वातावरण जसे मस्त मधासारखे गोड़ झाले होते, अनुभवताना प्रत्तेक क्षण हा साखरेपेक्षाही गोड़ वाटु लागला होता. नानाचा अंगठा आपल्याच धुंदीत छाती ताठ तानून समोर कल्याण शहराकडे बघत होता, वारयाचे त्याला काही डर न्हवते जसा बेडर पने त्यांना छातीवर झेलत होता, समोर वांदरलिंगी सुळखा पण टतस्त उभा होता जसे जीवधन गडाच्या रखवालीलाच थांबला आहे पण त्यालाही धुक्यानी आपला मऊ कुशीत घेतले होते आणि प्रेमात त्याला गोंजारतच होते. हा सर्व खेळ चालू असताना आम्ही जंगलवाट तुडवत मार्गी लागलो. जंगलवाट भ्रमंती म्हणजे एक हा वेगळाच अनुभव असतो ( चालताना अंगाला बोचनारी झाडी, त्यांना सावरा सावर करत जाने, वाटेवर पडलेला ओला पाला-पाचोळा, शेखरुच्या शिट्या, पक्षांची किलबिलाट, चालताना झाडांवरील दवबिंदुने भिजलेले हाथ etc) असे बरेच काही जे इथे आल्यावरच पदरी पडतो अनुभव....
जंगलवाट वर चडून वांदरलिंगी सुळक्याला उजवीकडे सोडून डाव्या मार्गाने वरती चालत निघालो तसाच कड़े कडेने वाट काडत पायरी टप्याला पोहचलो थोडा आरामाला बसलो, डोळयांणा माझा भलतेच स्वातंत्र्य मिळाले होते आज ते बेभान पने समोर दिसनारया नजारयावर टक लाऊण बसले होते नकळत मनाला हलके वाटले आणि इथे आल्याचे सार्थकी लागले असे वाटले क्षणात. पायांना कोणास ठाऊक कसली तर-तरी आली होती तसाच मला वर खेचत चडाइस सुरवात करुण कल्याण दरवाज्याचा पायरयापर्यंत पोहोचलो. पावसाने पायरया पुरत्या मऊसर, घसरडया केल्या होत्या, जीव मुठीत धरून हळूहळू चढाई केली, जीवाची एक करुण कठीन काय तो पल्ला हा सर केला थोडक्यात इथेच मोहिम फत्ते झालती म्हणा पण पूड़े तसाच वरती जाउण किल्ला फिरलो आणि परतीचा मारगी लागलो....
#Travel_Story
#JivdhanFort
......................
जितेंद्र वाजे
१७.०९.२०१५

No comments:
Post a Comment