Monday, July 20, 2015

हरिशचंद्र

शनीवारचा दिवस भिमाशंकर, शिवनेरी गड, माळशेज घाट आणि डयाम चा ब्याकवॉटर फिरून पुरता काडला. डोळ्यासमोरचा तप्त सुर्यनारायण डोंगराच्या आड़ जान्याआधी हरिशचंद्र चा म्हणजे पायथी म्हणजे पाचनायीत जाण्याची धडपड सुरु झाली....!

कोतुर हुन पाचनाईस जाण्यास गाडीने वेग घेतल, सिमेंटचा जंगलात राहणारे आपन आजचा दिवस काय दाखवेल ह्याची आम्हातल्या कोणालाच कल्पना न्हवती कारण जे अनुभवले ते आठवले तरी अंगावर काटा येतो :p . ( राणवाट, आजूबाजूला दरयाच त्यात त्या अंधारात अजुन भयान वाटत होत्या, एकच गाडी जाईल असा रस्ता, जाताना काळोखान नटलेल मोठ मोठाले डोंगर, आतापर्यंत निवांत बसलेले मागचे तीन जण अचानक डाटी-वाटी झाल्यासारखे बसले होते ते मित्र, डोळ्यावरचे त्तांचे हाव-भाव पाहून असे वाटले जणु थोड्याच वेळात पाझरतील) एकदाचे पाचनायी मुक्काम ठिकानी पोहचलो, गाराठलेल्या हातावार आलेले काटे गोंजारत मुक्काम घरी तसच चालत निघालो. पोहचताच ब्यागांची आवरा-आवर सुरु झाली, "जाम भुक लागली"  अशा केवीलवाणी बोलने ऐकताना आज थ्रिल पना जगल्यासारखे वाटले थोडक्यात. जेवनावर ताव मारून स्वताला तसाच रजईवर टाकुन १२.१५ च्या दरम्यान झोपी गेलो ते थेट मोबाइल अलार्म चा गजरने ६.०० ला उठलो नी मीच का उठू म्हणून द्वेशात सर्वांची झोपेची एक करुण सर्वाना उठवले.

हरिशचंद्र चा पायथी राहिलो पण त्याला रात्री पासूनच बघायची मनी चुळ-बूळ चालू होती तशी, तसा गोड निद्रेतुन उठून पडवीचा समोर दगडांवर उभा राहून त्याला पहायची धडपड सुरु झाली  पण धुक्यान्नी थोड़े जकडल़े होते त्याला आणि जसे मला आज ते डीवचाट होते मग उगाच तसाच काही इकडे तिकडे करत काहीसा वेळ काडला आणि ठोडी वारयाची सर आली अनि काहिसी हरिशचंद्राची ही सुंदर छटा दिसून आली..... Cont..

असा हा हरिषचंद्रगड त्यात स्वताला वाहुन द्यावेसे वाटते आणि सारखे सारखे इथेच यावेसे वाटते....

#हरिषचंद्रगड
#Travel_Story
#jeet

-----------
जितेंद्र वाजे
२१-०७-२०१५

No comments:

Post a Comment