नुकताच पाऊस बरसुण गेला असेल, पडलेल्या पावसाने आपली कमालीची छाप सोडली होतीच त्यात गडापर्यंत डांबरी वाट ओलसर करुण सोडली होती, पायथ्यास पोहचताच गाडीला स्ट्यांडच्या आधारावर तीथेच सोडुन पाउलवाट बघत पुडल्या भ्रमंतीला श्री गणेशा केला. गाव सोडुन पाऊलवाट पकडत मार्गी लागलो, आणि गडाच्या पायथ्या लगतच्या जंगलात येउन थांबलो, माझ्या चेहय्रावर होणारी गफलत बघुण मित्र पुटपूटला.. आपण चाललोय ती वाट बरोबर की आपण भटकलोय....????!!!! चेहय्रावर स्मित हास्य देत तसच खिशातले नॅपकिन काडून चेहरा कोरडा करत दगडावर बसलो, बॅगेतुन पाण्याची बॉटल काडुण कोरडा घसा ओला केला, मग पुन्हा आपन बरोबरच आहोत असे स्वतालाच बोलुन समोर झुडपात घुसलो सावरा सावर करत पाउल ठेवले काही १५-२० धडपड करुण पुडे एका अधभुद झाडाचे दर्शण झाले!!!! जसा हरवलेले वासरु भेटल्यावर गाईचा हंबरडा निघतो तसाच आमच्या तोंडुन आनंदाची सुसकार पडली आणि समोर मृगगड कडे जाणारी दिशा दर्शवणारी हि पाटी दिसली, मग काय हरणाच्या वेगाने गडाकडे धुम ठोकली....! Cont.... प्रत्येक गडावर अशा दिशादर्शक पाट्यांचे दर्शण होत असते, अशा मित्रांना माझे मनापासुन आभार!!!! आमचा सारखे अनेक वाटसरुंना ह्या पाट्यांचा खुप खुप आधार भेटतो. #मृगगड #MrugagadFort #Travel_Story ----------- जितेंद्र वाजे ०३-०६-२०१५
Wednesday, July 8, 2015
गफलत मृगगडावरची
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment