शनिवारचा रतनगड सर करायचा म्हणून पुरता प्रवासात गेलेला दिवस मग केलेल्या एकदिवसीय ट्रैक चा नाईट ट्रैक होणार ह्याची लागलेली उगवती खून , पावसाने केलेला आक्रमण आणि बघता बघता मांडलेला तांडव, संध्याकाळचे 5 लाच झालेला वतावरणातील काळोख़ त्यात रतनवाडीत पोहचल्यावर पाठीला आणि झड़प मारणाऱ्या डोळ्यांना आराम मिळावा म्हणुन केलेली निवाऱ्यासाठी जिगरीची जुळवाजूळव, चिकन च्या रस्याणी टाकलेली माण आणि मग बदल्यात सांगीतलेल्या तूर-डाळीचे वरण मग समोर वाडलेल्या (चिकन चे मसल्यात होरपळलेले पीसेस, चपाती, वरण-भात) सोनेरी ताटावर मारलेला ताव, नंतर भलत्याच रंगलेल्या अंधार रात्रीच्या गप्पा त्यात ना रोजच्या गोष्टी ना ऑफिसातल्या गंजत आलेल्या किस्से, मग निवांत झोप, सकाळी लवकर उठून गडावर जाण्याची धडपड. सकाळच्या कोवळ्या उन्हातुन ते प्रखर उन्हात आणि जंगलाच्या दाट झाडीच्या सावालीतून केलेला गड सर, मग वरती गडावर उन्ह-पाऊस-सावली-धुके ह्यांची रमलेली खेळी, पूर्ण रतनगड हिंडडूण काडल्यावर अंगाची लाही-लाही होत होती त्यात परतीचा मार्गावर येताना खळ-खळुण वाहनारी प्रवरानदीकडे पाहून आमच्यातल्या कोणाचा थारा राहीला नाही आणि सर्व काही विसरूण आम्ही वाहत्या नदीत उड्यामारल्या, दोन दिवसाचा थक़वा कसा गायब झाला ते कळलेच नाही.... थोडक्यात सांगायचे तर भरपूर अनुभवांचे गाठोडे बांधले ह्या दोन दिवसात.....
शनिवारी पाहलेली Vinayak Vishwanath Belose आणि Rahul Dharmaji Bulbule ची पोष्ट बघुन वाटले भेट होईल मित्रांची आणि म्हटल आज तरी भेटीचा योग लागेल पण आमचा नशीबात वेगळाच योग लिहला होता म्हणून भेट पुन्हा राहिलीच. दुसऱ्या दिवशी Vinayak ची पुन्हा रतनगड-हरिशचंद्रगड ची ट्रैक पोष्ट पाहून आता एक नवीण आग ओकु लागली आहे, आता पुन्हा इथली ओढ़ वाढू लागली आहे, एक वेगळ्या अनुभवाच्या प्रतीक्षेत.
#Ratangadfort_Blog
#Travel_Story
#jeet
-----------
जितेंद्र वाजे
०६-१०-२०१५


