ती...
तीच्याबद्दल मी काय लिहू आता..
तसं बरचस असं मी मांडले आहे शब्दात, चारोळ्यात, कवितेत, तीन यावं आणि माझी पहाटेची साखर झोप मोडावी, स्वप्नात येऊन मऊशार कापूस पुंजक्यात मनाला माझा गोंजरावे..
सर्व म्हणा अजूनही तिचेच आहे, न सांगता अजूनही मालकी हक्क माझा तिच्याच नावे आहे, तिने अजूनही यावे आणि राज्य माझावर गाजवावे, राणीसारखी ठेवेन असे म्हणत नाही मी, पण एका राजरानी पेक्षा जास्त तिचा थाट असणार एवढे नक्की सांगतो..
बर बरंच काही आखले होते, ठरवले होते, निश्चित केले होते, स्वप्न बघितले होते म्हणा.. सोबत तिचा कुठं तरी दूर म्हणजे अश्या ठिकाणी जिथं फक्त ती आणि मी.. तलावाच्या काठी, ओलर खडकावर, पाण्यात पाय सोडून हातात तिचा हात माझा, बोलके ठेवत वेळ मी काढेन, कधी तिचा ओलसर केसांना छेडत, अंगाशी तिच्या खेटत, शराबी तिच्या डोळ्यात बघत, गुलाबी गालांची हळुच गालगुच्छा घेत, मधाहुन गोड तिचा ओठांनवर गुलाबाच्या लालसर रंगाची छटा उमटवत, माझी सोनेरी वेळ मी घालवेन.. तीन पण काही तरी बोलावं असं मनाशी ठरवत तिला काहीतरी विषयावर बोलके करण्याचा माझी धडपड मी सुरू ठेवणार, उगाच मागच्या आठवणींना ढील देत माझी बडबड सुरु करणार, मग तीन थोडस गोजिरं हसावं माझा शब्दा-शब्दात तिनं स्वतःला ऐकावं, तिनं किती सुंदर दिसावं याचं मी शब्दात तोंडभर बोलावं, मग हळूच थंडीची एक लहर यावी तीन मग हाताची घडी करत स्वतःला स्वकुशीत घ्यावं, माझं अलगड पणा साधावा मी मग तिला हलकेस मिठीत घ्यावं आणि तिची होणारी मनाची कुचंबणा मी जानवावी मग बोलण्यात मी तिच मन माझाकड वळवावं, आमच्यात काय बोलणे काय सवांद होत आहे याचा तिला ना मला भान असावा..
तसे पावसाळी दिवस पण मी विणले होते मनात तीचासोबतचे, तसे ते पण दिवस ओलसर आहेत अजून मनात माझा, तीन ऑफिसला कारण देत बाहेर निघावं, ठरल्यावेळेत भेटणे, तिला डोळ्यांनीच इशारा करत गाडीवर बस अशी डोळ्यांनि केलेली तिला विनवणी, तीन मग मग खांद्याचा आधार घेत पाठी माझा बसणं, गाडीला किक मारून ठरल्या ठिकाणी निघणे, तिचा माझातला सवांद तसा खूप कमी त्यामुळे सुरवात कुठून करावी याचा प्रश्न दोघांना, मग माझाकडून सुरवात होते मग तीन दबक्या आवाजात मी जे बोलेल त्याला उत्तर देत राहणे असा काहीसा आमचा प्रवास सुरु, पावसाने त्याच्यावर सोपवलेली कामगिरी अचूकतेने पार पाडणे आणि रिमझिम पावसाची सर सुरु होणे, तीचं उगाच पावसाचा राग यावा असं वागणं मग गप्प बसून पाऊस अंगावर झेलत बसणं, नकळत तीन मला मिठी मारते जणू ति गारठ्याने कुडकुडत असावी, मी पण मनातल्या प्रेमाच्या वेलीला पसरू देत होतो, पाऊस चांगलाच बरसू लागला होता मग एका टपरी वर थांबून चहाचा एक घोट मारावा आम्ही, तसं चहा पिताना माझी नजर तिचा केसांवरून टपकणारा पाऊसावर होती, वाफाळलेला चहाचा कप तीन एव्हडा घट्ट पकडला होता की बस्स मग, तिथंच घायाळ मी, तिचे ओठ बोलत कमी होते पण थर-थर जास्त कापत होते, तिची अशी अवस्था पाहून मलाच कीव येते मग माझा अंगावरला जॅकेट तिला घालतो मी, प्रेम ह्यालाच म्हणतात वाटत, पावसात पाऊस तर मुसळधार पडून जातो पण आठवणी मागे सोडून जातो म्हणा..
बर किती मांडू आता इथे तिचा बद्दल, माझा माझावर काही ताबा नाही ना माझा मनाला कशाची लगाम, मी तसा बेलगाम असतो जेव्हा तिचा बद्दल लिहिणं असत, मग मी थांबत नसतो ना ऐकत असतो कोणाचं..
नोट: "ती" एक पात्र आहे इथे फक्त, फक्त एक पात्र..
सहज असे मनातले काही शब्द..
................
जितेंद्र वाजे
२९.११.२०१६

No comments:
Post a Comment