अचानक एंट्री.. ©®
सकाळच्या साखर झोपेत असताना मोबाईल वाजू लागला होता, मग मीच-मिचणाऱ्या डोळ्यांना उघड झाप करत पाहिले, म्हटलं इतक्या सकाळी कोणाला आठवण
झाली माझी, नंबर अनोळखी होता त्यामुळे उचलला लगेच, समोरून गोड आवाजात “Hello” ऐकू
आले, आवाज अनोळखी होता म्हणजे लांबचं न जवळचं असा कुठल्याच कॅटेगिरी मध्ये त्या
आवाजाची ओळख लागत न्हवती, मग पुन्हा विचारपूरवक बोलणे सुरु केले, समोरील आवाजातुन मधागत गोड धार ओसरत होती, ह्या आवाजाने साखर
झोपेचं साखरेचे पाख झाले होते पुरते, पण झोपेतच मी अडखळत बोलत आणि त्यात समोरून
येणारा आवाज दबक्या स्वरात येत होता, बोलताना ती घाबरत होती, म्हणजे तिला माहित
न्हवते माझा काय रेस्पोंस असेल तिच्या अचानक कॉल वर..
ती : हेल्लो, मी *** बोलते, कसब्यातून..
मी : हो बोला..!
ती : तुझा ब्लॉग वाचला मी नेटवर,
छाण वाटले वाचून, तू लिहलेले शब्द नि शब्द पाठ झाले मला..
मी : माझा नंबर कुठून मिळाला
तुम्हाला?..
ती : भेटला मला नेटवर, काही
प्रोब्लेम झाला का? मी कॉल केला तर..?
मी : नाही तसे काही नाही, पण...(..म्हणत
शांत झाहलो..).. काही नाही... धन्यवाद कॉमेंट साठी..
******
****
...तेव्हा जास्त बोलणे नाही झाले तीचासोबत पण थोडक्यात बोलणे झाले म्हणजे तोंड
ओळख व्हावी जशी, तिने स्वताहून केलेला कॉल आणि धाडसाबद्दल मला नवल वाटले पण तिच्या गोड आवाजाने मला घायाळ केलते
तसे कुठेतरी.. तिने आवर्जून फोन करून त्या ब्लॉग बद्दल सांगितलेले मला सारखे मनाशी
खेळत होते, मग पुन्हा तोच ब्लॉग वाचू लागलो त्या दिवशी, तसा काही मोठा आकस्मित
परिणाम नाही झाला मनावर पण कोणीतरी एवढ्या खोल आणि मन लाऊन वाचेल ह्याची जाणीव
न्हवती तेव्हा, मित्रांनी दिलेले प्रोस्थाहन आणि मनाशी खेळणाऱ्या शब्दांची आवड
ह्या काही गोष्टीने सुरु झालते पण असा काही तरबेज आणि साहित्तिक पद्धतीचा लेखक
नाही पण असाच आपले काही तरी चालू होते, ति मग नंतर संपर्कात राहू लागली, कधी फोन
वर तर कधी मेसेज वर माझासोबत बोलणे चालू होते, तिचे वाचनावरील वेढ मला अजून
उत्तेजित करू लागले होते लिहण्यास मग लिहताना तिच्या सोबत होणारया गप्पा वाढल्या, तिचे
फोन येणे, मेसेज वाढू लागले, म्हणजे बोलणे वाढले होते आमचे, तिने भेटण्यासाठी भरपूर वेळा सांगायची पण
माझेच काही तरी इथले तिथले निघायचे मग राहून जायचे आमचे भेटणे, तशी लांब न्हवती पण
होती जवळचं, माझा ब्लॉग मधील “ती” तिला सारखी भासायची, मला मग सारखेच तिच्या बद्दल
विचारणे सुरु केलते, पण आपले मी तिला टाळायचो, ती पण मग समजून घ्यायची कि मला
तिच्याबद्दल विचारलेले आवडत नाही ते, मला सारखे बोलायची मला तिला भेटायचे आहे म्हणून
वगैरे...
...ब्लॉग बद्दल बोलतना ति जरा त्या प्रवासात..त्या विषयात घुसायची, तिला प्रत्तेक
ब्लॉग बद्दल बोलायचे असायचे माझासोबत म्हणजे फोन केला कि मग तासं तास बोलायची, ब्लॉग
मधील प्रत्तेक शब्दावर नि ओळीवर तिचे काही तरी मत असायच, बोलताना कधी कधी ती कविता
करून जायची, कुठला शब्द भारी नि कुठली ओळ बरोबर बसली नि कुठे काही फिसकटले तर ती सांगून
मोकळी होयची, दिवसाची सुरवात चहा पासून होयची मग मागच्या आठवड्यात खाल्लेली मी
मिसळी पर्यंत आमचे बोलणे होयचे, माझी बडबड आणि मिसळ कीर्तनाने ती पण मिसळ वेडी
झाली होती, तिला कधी आणि कशी मिसळचे वेड लागले हे तिलाही समजले नाही, प्रत्तेक
वेळेस काही खाल्ले किंवा कुठे फिरायला गेली तर त्यावर पुन्हा चर्चा, तिने केलेला
ड्रेस चौइस पासून ते मला आवडेल तो कलरचा ड्रेस घेण्यापर्यंत, तिने विकत घेतलेला
नवीन मेकप किट पासून ते मला आवडणाऱ्या पिंक लिपस्टिक पर्यंत, तिने केलेल्या नवीन
हेयर कट पासून ते मला आवडणारे लांब काळेभोर केसांपर्यंत.. आमचे बोलणे-चर्चा करणे
सुरु होते, प्रेम बीम भांडगड नाही पण आमचे बोलणे चालू झाले होते घट्ट मैत्री गत, तिला
कधी हि हुक्की आली तर मग सारखी मागे लागायची भेटू म्हणून, नाहीतर कुठेतरी बाहेर
जाऊ असे म्हणत पुन्हा विषय छेडायची आणि तिला माहित असायच कि मला तेव्हा तरी भेटणे
शक्य न्हवते, पण आमचे फोन आणि मेसेज वर घट्ट जमू लागले होते. तिचे ऑफिस आणि घर
ह्या मध्ये जास्त वेळ ती माझा सोबत बोलण्यात घालवायची, मग सकाळी ऑफिसला
पोहचेपर्यंत ते घरी जाईपर्यंत हीची बडबड चालू असायची.
..काही दिवस असेच गेले, पण एका दिवशी आमचे भेटणे ठरले भेटू म्हणून, तसे मी पण
इच्छुक होतो, पण फोटो वगैरे पाहिले होते आम्ही एक मेकांचे पण तरीही भेटण्याची
इच्छा होती आमच्या मध्ये, तिच्या घरी मोकळे वातावरण होते त्यामुळे ती घरी सांगूनच येणार
होती मला भेटायला, आमचे ठरल्या प्रमाणे आम्ही खडकवासल्याला भेटणार होतो, त्यादिवशी
मी सकाळी लवकर निघायचे म्हणून झोपलो पण उदया भेटायचे आहे ह्या गोष्टीवरूनचं आमच्या मध्ये फोन वर चर्चा सुरु होती, त्यात
रात्री खूप उशीर झाला होता, मग तिला सकाळी मला उठव म्हणत मी झोपलो, सकाळी ती
ठरलेल्या वेळेत निघाली होती घरून, आणि तिने मला अलार्म कॉल पण दिला होता, पण मी पुरता
गाढ झोपेत होतो, थोड उशिरा जाग आली मला, कसे बसे गडबडीत मी आवरले आणि गाडीला किक
मारून निघालो, तिचे कॉल सुरु झाले होते कि पोहचले आहे म्हणून, पण मी अजून अर्ध्या
रस्यातपण नाही पोहचलो होतो, तिला समजले होते कि मी उशीर करणार म्हणून, आणि त्या
पद्धतीने ती वाट बघत थांबली..
..थोडा उशीरच झाला होता पण शेवटी पोहचलो मी, तेथे जाऊन कुठे आहे म्हणून कॉल
केला तेव्हा ती आधीच खाली खडकावर पाण्यात पाय सोडून बसली होती, आणि तसे तिने मला
तेथेच यायला लावले, आज चक्क प्रतक्ष्य भेट होती आमची त्यामुळे माझी बोलती बंद झाली
होती आणि त्यात मी उशीर हि केला होता, समोर तिच्या पोहचलो नि तिने मस्त गोड हसून ओळख
दिली. मला वाटल कि ती आता चांगला वचपा काढेल माझावर उशीरा आलो आहे म्हणून पण तसे
काहीच नाही उलट तिने पुन्हा रोजच भेटते तसे बोलणे सुरु केले, मग मी पण मिसळून गेलो
आणि तिचा सोबत बोलायला लागलो.
..आमच्यात असे बोलण्यासारखे
काही राहिलेच न्हवते कारण तिचा बद्दल मला आणि माझा बद्दल सर्व तिला माहिती होते, भेटल्यावर
पुन्हा तिने “ती” बद्दल विचारायचा अट्टाहास धरला मग आमचा त्याच विषयावर बोलणे सुरु
होते, माझ बोलणे सुरु झाले आणि तिने फ़क़्त ऐकायचे सर्व असे ठरवून आली होती, त्यामुळे
तिचा बद्दल ऐकण्या ऐवजी माझेच सुरु झाले होते, ती शांत पने ऐकत मला साथ देत होती, समोर
शांत निसर्ग, त्याचाही पलीकडे आकाशी भिडणारा सिह्गड मला सारखा खेचत होता, तिने
ओळखले कि माझा मना मध्ये कसली घालमेल सुरु आहे ते, मग तिनेच स्वताहून विचारले जाऊया
का सिंहगडावर, काही तरी खाऊ तिथे मला भूक लागली आहे असे बोलून पुन्हा हट्टीपना करू
लागली, मग आम्ही तिची गाडी तिथेच ठेऊन सिंहगडाकडे निघालो, ती पण मस्त बिनधास्त मागच्या
सीट वर बसली होती, गाडीचालवतानाहि तिचे बडबड चालूच होती, तिला अश्या ठिकाणी यायला
आवडते आणि त्यामुळे ती चांगलीच रंगात आली होती, काही वेळाने आम्ही वरती पोहचलो, गाडी
लाऊन आम्ही वरच्या बाजूला पोहचलो, पोटामध्ये भुकेने आग ओकत होती त्यामुळे लगेच
आम्ही खाण्यास थांबलो एका हॉटेल मध्ये, खेकडा भजी आणि नंतर पिटल भाकरी दनकावली तेव्हा
कुठे आमचा जीवात जीव आला, पुढे जाऊन एका कठड्यावर बसलो, सर्व मोकळे असल्याने वार
मस्त घुमत होते, शांत वातावरण मनाशी मस्त वाटू लागले होते, ती आणि मी काही
वेळासाठी गप्प झालो होतो, मग नंतर तीच पुन्हा बोलायला लागली.
..तिची नि माझी भेट तर झाली पण आम्ही अजून मित्रच आहोत, ते पण प्रेमाच्या
अलीकडे आणि मैत्रीच्या पलीकडे गत, काही नात्यांना प्रेमाचा शेवट भेटतोच असे नाही
पण प्रेमाने जपलेले नाते हे कितीक पतीने घट्ट नी निर्मळ असते, तिला हि मनात भरपूर
काही येते नि भरपूर भावना ह्या गुंतल्या आहेत पण जिथे पुढे भविष्यच नाही त्या
भांडगडित पडायचे नाही असे तिला मी आधीच सांगून मोकळे झालो होतो, पण तिचा माझावर
हक्क गाजवण्याचा हट्टीपणा तो काही कमी नाही झाला न तो कधी कमी होणार.
**समाप्त**

No comments:
Post a Comment