याड लागलंय.. ©®
याड लागलंय.... खरच याड लागलं होतं.. आता फ्ल्याश ब्याग मध्ये जाण्यात काही
अर्थ नाही पण काही मधाळ आठवणींना पाझर पुठला कि जिव्हारी गोडवा पसरतो आणि आठवणींच्या
गोड तलावात बुडून जाण्यास मनास कोणीही थांबवू शकत नाही, अश्याच त्या सैराट मय
दिवसात घालवलेले, जगलेले दिवस आठवले म्हणजे “याड लागलंय” ह्या गाण्याची आणि सैराट
मुविच्या त्या दिवसातली आठवण...
..सकाळ होऊन दिनकरराव नव्वद अंशाच्या कोनात येऊन उभे होते आणि ते पण तळ तळत्या
उन्हाची झळ माझा चेहऱ्यावर आली होती, डोळ्यांनी चीर-मीर करत उघडण्याचा प्रयत्न करत
माझी झोप उडाली, आता किती वाजले ह्याचा मला अंदाजच नाही, सकाळचे खूप वाजून गेले
होते, अंगातला आळसं झटकत उठलो आईला चहाची मागणी गेली, तसा चहा झालता सकाळचा घरात
पण आता माझासाठी पुन्हा!, चहा एक कप घश्या खाली उतरवला तेव्हा कुठ माझी झोप पूर्ण
उडाली, सकाळची अंघोळ आटपून मी आवरून घेतले, ब्याग-बिग असले काही नाही आपले मग गाडीची
चावी घेतली, एक वही सोबत बसं आणि निघालो बाहेर..
ठरल्या वेळात “ती” बस स्त्यांडला थांबली असेलच असे गृहीत धरून मी निघालो, काही
वेळात स्त्यांडला पोहचलो, तिथे ठरल्या वेळेत म्याडम पोहोचल्या होत्या, मला तसा वेळ
झालता म्हणा आणि ते तिच्यासाठी सवयच झाली होती पण त्याचा राग निघतो म्हणा कधी तरी,
गाडी तिच्या समोर उभी केली अन तिच्या कड बघत बसलो, चेहर्यावर स्कार्फ, ब्याग
खांद्याला अडकवलेली, हातातील घड्याळ बघत ती माझाकडे करड्या नजरेने बघत होती, तिच्या
दुसर्या हातातील डायमंडची ब्यांगल उन्हात मस्त चमकत होते, स्कार्फ मध्ये तिचे
काळेभोर डोळे कातील दिसतात हे तिला सांगून दमलो पण आज तिने डोळ्यांना काळ्या
रंगाची डार्क लायनर लावली होती त्यामुळे त्या काळ्याभोर मायाळ डोळ्यात मी आज
पुन्हा फसलो होतो, ती जवळ आली मग पुन्हा तिच्या तिखट शब्दात तेच रोजचे गाराने ऐकवत
झोडपू लागली, माझ मग काय गुमान ऐकत बसलो, तिचे झाले आणि थांबली आता, मग मीच तिला
डोळ्यांनी ईशारी करून बस बोललो, ती बसलिही, तिने बसताना खांद्याला जोरात हिचका देत
बसली, हे असे तिचे खट्याळ वागने चालूच असते म्हणा त्यात काही नवीन नाही.
ती रागात असली कि गाडीवर ती एक इंच लांब होऊन बसते, जी पर्यंत हिचा राग शांत
होत नाही तोवर ती काही बोलत नाही मग ती गुमान बसली मागे, गाडी टिळक रोडने घेऊन थेट
रामनाथला थांबलो, हिचा तिखट राग शांत करण्याचे रामबाण उपाय म्हणजे झणझणीत मिसळ हिला
चारायची, हॉटेलात जाऊन दोन मिसळ सांगून मी मोकळा झालो, टेबलावर दणकन बसत हि समोर
माझा, चेहऱ्यावरचा स्कार्फ काढून तिने ठेवला बाजूला, तिच्या मागच्या बाजूला जोराचा
पंखा चालू होता त्यामुळे हिचे केस त्या हवेच्या हेलकाव्याने हवेत उडत होती, त्या
केसांना सावरत हिची गडबड झाली, मग स्वताच काकांना पंखा कमी कारायला सांगून ती
पुन्हा माझापासून नजर चुकवून ती मोबाईल मध्ये घुसली, समोर माझा असताना मोबाईल
मध्ये घुसलेले मला आवडत नाही हे तिला ठाऊक असते पण मुद्दामून खोड काढण्यासाठी
माझासोबत बोलायचे सोडून हि मोबाईलमध्ये घुसून बसली होती. मग देवकृपेने समोर मिसळची
प्लेट आमच्या दोघानसमोर....
मिसळची वैवस्तीतरित्या वैवस्था लाऊन तिला घेऊन शनिवारवाड्यात घेऊन गेलो, मग
हिच्या पोटाची शांती केली तेव्हा कुठ राग शांत झालता थोडा, आतमध्ये जाऊन आम्ही
बसलो, हिला मनवयाचे माझे शर्तीचे प्रयत्न चालू होते, मग नंतर काय जणू माझा मनात
आले आणि हिला मी मंगला ठेटरला घेऊन गेलो, तेथे गेल्या नंतर पाहिले तर “सैराट” चे
पोस्टर लागले होते, ह्या मुव्हीचे गाणे ऐकून मी तसा दिवानो झालतो पण तो बघण्याचा
योगा-योग तो आला न्हवता, पण आज अचानक बघण्याचे माझे ठरले, पोस्टरवर आर्ची-परश्या
चित्र मला भन्नाट वाटले होते त्या पोस्टरला बघून माझा मनातले वाईलंट वाजू लागले
होते, ओठांवर गाण्याची बोल गुणगुणू लागले होते, हाताची ताशेरे झाल्यागत त्यांची
हालचाल होऊ लागली होती, मग तिकीट घरात जाऊन दोन कॉर्नरची तिकिट्स घेतली, हिच्या
चेहरयावरच्या धुडगूस मूडचा पत्ता अजून मुक्कामी होता अजून, मी तिला चल म्हणत आतमध्ये
गेलो मग सीट पाहून बसलो, मूवी सुरु झाला तरी म्याडम अजून काय माझाकडे बघायला काही
तयार नाहीच मग मी पण आपले मूवी बघत बसलो, काय जणू थोड्या वेळात “याड लागलय” गान
लागल तसे माझ्या मनाची गाण्याची तरंग आतल्या आत वाजू लागली होती, नकळत मी तिचा हात
पकडला होता हे माझा लक्षात हि आले न्हवते पण गाणे संपेपर्यंत ती काही बोलली नाही
पण पूर्ण गाणे झाले त्यानंतर पूर्ण मूवी झाला पण अजून माझा हात तिच्या हाता मध्येचं
होता, तिला बघितले तेव्हा ती वेगळ्याच जगात होती, शांत अशी बसली, कसल्या तरी
विचारात गुंतली होती. तिचा निरागस चेहरा बघत मीही चुप्प झाहलो होतो.
तीचा बदललेला मूड आता काहीसा मधागत गोड झाला होता, गुपचूप होती पण डोळ्यात
तिच्या आभाळ दाटले होते काहीसे, मनात शांत वादळ होते कशाचे तरी, ओठांवर भरून आलेले
शब्द फक्त व्यक्त होणे बाकी होते, ती नक्की काय बोलेल मला ह्याच प्रश्न पडला होता,
तिने घेतलेले मौन आता माझा जीव घेत होता अन माझाकडून काही बोलणे हि होत न्हवते, काहीसा
वेळाने तिनेच खांद्यावर डोके ठेऊन पुन्हा शांत झाली, थोडीशी हळव्या मनाची त्यामुळे
अजून काळजी वाटते हिचे, मग मीच तिला इकडचे तिकडचे करत बोलू लागलो, तिचा मूड काहीसा
बदलत होता, मघाशी एन्डिंगचा सीन बघून म्याडम थोड्या हळव्या झालत्या, त्यामुळे काही
वेळासाठी ती आणि तिच्या मनातील विचारांनी वादळी रूप घेऊन हिला हळवे केले होते, नंतरून
पुन्हा पोटाची आग ओकू लागली होती, तसेच आम्ही खाली गंधर्व हॉटेलात गेलो, नेहमी
प्रमाणे पनीर-बटर सांगून एक मसाला पापड लगेच आण म्हणून ऑर्डर दिली, हिला जेवायच्या
आधी मसाला पापड ज्याम आवडतो, जेवताना हि म्याडम अजून शांतच होत्या, नंतरून पापड
आल्यावर मस्त कराम-कुरुम करत खात होती आणि हसतंच माझाकडे बघत होती, तिचे असे
मिश्कील पने बघून हसणे मला थेट काळजात घाव करतात, मग तो वार झेलत मी पण पोटभर
जेवलो, मग थेट समोरील गार्डन मध्ये जाऊन बसलो, हिच्या मनात अजून काही तरी कून-कून
करत होते, जे तिला बोलायचे होते पण बोलणार कसे म्हणून पुन्हा चूप बसली.
मोबाईल मध्ये बघ, इकडचे-तिकडचे बोलत तिला मी थेट विचारले, काय झाले आणि काय
बोलायचे आहे का तुला??.. तिला बोलताना शब्द सुचत न्हवते वाटत पण थोडीशी थांबली आणि
बोलली..
“सैराट पिच्चर मधला शेवटचा सीन बघून मला जरा घाबरल्या गत होत आहे रे..! मनात
सारखे काही न काही येत आहे...!”
अरे...असे आहे होय... मग तिच्याकडे बघून मी जोराने हसू लागलो, आणि हि पण गप्प थंड
एक्ष्प्रेशन देत माझाकडे बघू लागली, मग पुन्हा मला चिमटे घेत राग माझावर ओकू लागली
होती, तिला माझा मनात काय आहे हे ऐकायचे होते पण नक्की बोलावे कसे हा विचार करत मी
हसणे माझे चालूच ठेवले होते, पण पुन्हा नाकाच्या शेंड्यावर राग धरून हि गप्प झाली,
मग पुन्हा तिला लाडी-गोडी लावत तिला म्हस्का मारत बसलो काही वेळ.
आमच्यातला सवांद झाला आणि तिला समजवले हि, तिला थोडासा आधार देत पुन्हा तिचा
मूड फ्रेश व्हावा म्हणून एक आयीस-क्रीम खाऊ घालून तिला फ्रेश केले आणि निघालो घरी
आम्ही. तिला तिच्या ठिकाणे सोडले आणि एक हलकीशी स्माईल देत तिचाकडे बघून बोललो..
“मग कधी जायचे पळून आपण?!!” ....
**समाप्त**

No comments:
Post a Comment