Thursday, November 23, 2017

कैलासगड भ्रमंती २०१७

कैलासगड भ्रमंती २०१७ ©®

पुण्याहून काही कोस लांब असलेला हा रौद्ररूप धारण असलेला किल्ला आज पर्यंत कसा नजरेआड राहिला काय माहित राव, ताम्हिणी आणि लोणावळा डोंगर रांगेच्या गर्भात वसलेला हा किल्ला म्हणजे दुधावरील साय आहे, मुळशी टाटा धरणाच्या फुगवट्याला लागून हा तळ ठोकून बसलेला किल्ला, किल्ला म्हटलं तर समोर येणारे चित्र म्हणजेच बुरुज, तटबंदी, दरवाजे, महाल, इतिहासाची खून, मंदिर अजून भरपूर काही येते पण ह्या किल्ल्यावर असे काहीच नाही. किल्ल्याची ओळख/जन्म असे कि हा घाटावरील वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जायचा असे वाचले मी म्हणजे टेहाळणीसाठी स्वराज्यात आलेला हा किल्ला, किल्ल्यावर एक भगवा ध्वज आणि महादेवाची पिंड आहे बाकी मोकळे सटान असे पठार, पाहण्यासारखे म्हणाल तर मोकळा निसर्ग, किल्लावरील मनमुराद मोकळे पठार, ते झाड-झुडपाची गर्दी, धरणाच्या पाण्यानी घातलेला वेढा असे अफाट सौंदर्य ह्या कैलासगड उर्फ घोडमांजरीच्या डोंगराचे..

थंडीच्या बोथट गारठ्यानी सकाळी गाडी चालवताना अतोनात कष्ट होत होते पण तरीही हा किल्ला सर करायचे म्हणून आम्ही निघालो घरातून सकाळी सहाला, पुढे मल्हार माची हॉटेल जवळ पोटा-पाण्याची सोय लाऊन आम्ही ताम्हिणी-लोणावळा रोडला लागलो, तिथल्या अंधारबन ट्रेक पोइंटला फोटा-फोटी करून आम्ही पुढे वडूस्ते गावातून पुढे किल्याच्या खिंडीत पोहचलो, खिंडीतनं गडाच्या डोंगर सोंडेला धरून समोर दिसणाऱ्या वाटेला पकडून आम्ही वर चढू लागलो, सुरवातीलाच दमछाक करणारी डोंगरचढाई घाम काढणार पुढे हे तर जाणवले होते पण हवशेला मर्यादा नसते म्हणतात न तसेच काही तरी मनाशी धरून आम्ही वर चढू लागलो, डोंगर तसा तीन-चार डोंगर टप्यात आहे त्यामुळे त्याला डावीकडून वळसा देत आम्हाला चढायचे होते आणि तसेच उराशी जीवाला धीर देत आम्ही गड डोंगर चढू लागलो, गडाच्या डावीकडील पायवाट पकडत आम्ही चालू लागलो, प्रत्तेक पावलात घनदाट गवत-झुडपाला सारत आम्ही निघालो होतो, डावीकडील दरी बघून घाबरं-घाबरं होणार मन सावरत, लटपटनाऱ्या पायांना ताठ ठेवत आमची चढाई चालु होती, काही काळ घसरणाऱ्या पायाला सावरत आमची चढाई चालू होती, गडाला तसा आम्ही गोल वेढा देत चाललो होतो पण डोंगर काय तो थांबायचं नाव घेत न्हवता आणि आमचा दम काही भरत न्हवता, आपल कस बस वर चढून खुल्या पठाराला दिलखुलास मन भरून बघून, हिंदाडून आम्ही वरचा अक्खा पठार फिरून काढला, वरनं सह्याद्रीच्या डोंगररांग ह्या कधी घायाळ, कातील, दिलखुलास, आल्हाद, मनमुराद, अभेधक, आकस्मित, चमत्काराचा मेरू पर्वत, महाराष्ट्रच हिमपर्वत रांग असे असे बरेच म्हनाव ह्या सह्याद्रीच्या पर्वत रंगांना ते कमीच आहे आणि अपुरेच आहे म्हणा.... असा हा अखंड सह्याद्री बघितला, डोळ्यात सामावला, मनात भरला, उराशी कवटाळला....आणि आम्ही पुन्हा घरच्या मार्गाला लागलो..


#भटकंती #कैलासगड #प्रवास_वर्णन #सह्याद्री


---------------------
जितेंद्र वाजे

२४-११-२०१७ 

No comments:

Post a Comment