Sunday, July 9, 2017

पैठणीत "ती"

पैठणीत “ती”... ©®

कविताचं तशी लिहायची होती पण शब्दांची रेलचेल अशी मोजक्या शब्दात लिहण मला जमलं नसतचं मग पानभर माझ लिखाण आलेच....

तिच्या बद्दल लिहायचं म्हटलं तरी मनाच्या तलावाला काहीसा समुद्राच्या लाटांगत उसळी येते, म्हणजे विषय काही असो तिच्या बद्दल, तिचे गुलाबी सौंदर्य, सोनेरी रूप, गोजिरी अदा, घायाळ तिचे स्मिथ, खट्याळ तिचं वागण.... असे बरेच काही ते तिच्याबद्दल म्हटलं तर मनामधे माझ्या वादळी वार्यागत घुमत असते, शब्दांचे काय ते बेभान होत असतात आणि ते माझा मनाच्या दरीत घोंगावत असतात, मग ते शब्द लिहताना मुसळधार पावसागत कागदावर बरसत असतात.

सहज फेसबुकच्या भितडावर असाच भरकटत होतो आज आणि एकजनाचा “पैठणी(साडी)”चा फोटो शेयर केलेला आला डोळ्या समोर, तसा मूड माझा काही भारी न्हवता, म्हणजे रोजच्यागत आपल घरातच दिवसभर घालवलेला दिवस, ते दिवसातून कित्तेकदा चहाच्या उकळीला बघत घालवलेली वेळ, मग तोच चहाचा कप हाताशी मिरवत घराच्या एका कोपर्यातून दुसार्या कोपर्याला दिलेली भेट, मग तोच चहाचा कप त्याचा कोल्ड टी होईपर्यंत ओठांशी टिकवत मिरवत घालवलेली वेळ, बाहेर पडणारा पाऊस हा आपला चांगल्या पद्धतीने मला घेरण्याचा अतोनात प्रयत्न करत असतोच, मग पुन्हा त्याची भीती मनाशी ठेवत पुन्हा चहाच्या गरम घोटाला घश्याखाली उतरवत घालवलेली वेळ, म्हणजे असाच काहीसा माझा दिवस मी घालवलेला आणि त्या फेसबुकच्या शेयर केलेल्या फोटोवर माझी नजर ती बसली, काय झाले ते मला समजण्याआधीच मी त्या “पैठणी”ला माझा मनाच्या भितडावर चीपकावले...

असो... पैठणी ती मस्त अशी अर्धवट घडी मोडलेली समोर माझा, जांभळ्या रंगाची, सोनेरी काठपदराची सुंदर रेखीव नक्षीकाम केलेली, आतमधे अल्हाद बारीकश्या सोनेरी ठुश्या उमटवल्या होत्या त्यावर, आता ह्यातलं मला समजेल त्याच्यापण पलीकडे होते एवढी ती सुंदर अशी ती पैठणी साडी... पण सगळ ठीक होते त्या पैठणी पर्यंत, आता मी तर त्याचाही पलीकडे गेलो होतो, समोर त्या पैठणीचा फोटो पण मनात काही तरी अजून चित्र ते फडकत होते, ते चित्र अजून माझ्या डोळ्यासमोर अजून धूसर होते, त्याची चाहूल मला लागत होती पण ते चित्र अजून धूसरचं होते मला...

..ते चित्र आता माझासमोर आता क्लेअर होते, पैठणी नेसलेली “ती” आता माझा समोर येत होती, चित्र काहीसे रोमांचक होते माझासाठी पण माझ्यातल्या आतल्या काळजाला पाण्याचा झरा फुटू लागला होता तसा, कोरड पडलेल्या डोळ्यांना रंगीत पाण्याची धारा सुटू लागली होती, चिमटी लावल्यागत चीपकलेल्या ओठांना आता मोकळा श्वास घेता येत होता, चेहरयावर हसू जरासं फुटू लागले होते, माझी कावरी बावरी हालचाल झाली होती, आता हे होणे साहजिकच कारण “ती” समोर आली होती माझा पुन्हा...

तसे हिचे यायचे काही नवल न्हवते पण मनातले पेटलेले रान ह्यावेळेस भलत्याच जोमात होते, वाढणारी आग आतमधल्या माझा सुख्या पडलेल्या पाला-पाचोळ्याला घेऊन बेभान आग होत गगनाला ती झळ पोहचेल अशी पेटले होते, आजपर्यंत उनाढ होत चाललेले माझे दिवस आज काहीशे रंगीन होऊ भासत होते, कळण्या अगोदरच तिचे रंगीत रूपडं माझा समोर डोळ्यासमोर येऊन उभ राहिले होते, घशाला ती कोरड पडली होती माझा पण पाण्याची तलफ ती मला भासत न्हवती कारण माझासमोर आता अमृताचा घोटभर असलेला सोण्याचा प्याला होता तर तहान माझी अशिच विरघळून गेली होती, आता फ़क़्त काय तो माझातला शून्य आणि बाकी मीच राहिलो होतो, तसे रूप हीचे आधीच वेडसर पण ह्या पैठणीत तिला पाहताना माझी हालत अजून वाईट होत होती..असो...

वार्याला सुमार नाही असा तो वाहत होता, आणि ती चेहऱ्यावर स्मिथ देत उभी, जांभळ्या पैठणीत ती अगदी रुबाबदार दिसत होती, गडद जांभळ्या रंगाची पैठणी, त्याला सोनेरी तारेची विणलेली भरीव काठ, मोर पंखाची नक्षी, झाडांची चढवलेली वेली त्यात अजून नक्षीदार त्यामुळे ती अजून देखणी दिसत होती. ह्या सगळ्यात तिचा डाव्या हातावर लटकणारा पदर मला काहीसा अजून भाळत होता मनाला आणि पूर्ण पैठणीवर उमटवलेल्या जरीच्या ठुश्या त्या अजून मनमोहक दिसत होत्या, तिच्या उजव्या हाताच्या दंडावर सोन्याचे पिळदार बाजूबंद मस्त होते, हातात सोन्याच्याच नक्षीदार बांगड्या त्याच्या जोडीला लाल रंगाच्या बांगड्या त्यामुळे तिचा हात अजून सुंदर भरून दिसत होता, उजव्या हाताच्या बोटात एक नक्षीदार अंगठी, डोळ्यात तिचं तेज होते जस काय पैठणीचे रूप तिच्या डोळ्यात चमकत आहेत तसे मला भासू लागले, कानात तिच्या लोंबकळत हवेत झुलनारे झुंबके, गळ्यात सोनेरी ठुशी नाजुकशी त्यावर लांब असा राणी हार चढवला होता, नाकात नथनी तीने टोचली होती आणि ती हळूच माझा काळजाला हलकीशी टोचत होती, कपाळावर गडद लालसर टिकली, केसांना तिने अलगद बांधले होते आणि त्यावर मोगरा हा नचुकता माळला होता, त्या मोगर्याचा सुगंध माझा नाकाशी हळूच अशी खोड काढत होता आणि त्याची प्रचीती मला माझा मनात होणार्या गुद्गुडलीने होत होती, पैठणी ती जमिनीला टेकली होती त्यामुळे तिचे पाय पूर्णतः झाकले होते आणि तिचा ओठांचा लालबुंद रंग जसा पिकलेल्या डाळिंबाच्या दाण्यागत ओलसर....

अशी काहीशी “ती” पुन्हा माझा डोळ्यासमोर आली नि डोळ्यातल्या बुबुळाला ओलसर करून गेली...


#पैठणी #Paithani #मराठी
#jeet
#blogger
-----------
जितेंद्र वाजे ©®
१०-०७-२०१७





No comments:

Post a Comment