Sunday, September 10, 2017

पावसाळा आणि ती

पावसाळा आणि ती



पावसाळा म्हटलं कि चिखल, गडबड, गर्दी, सर्दी, गरम भजी, कडक चहा, वडापाव, गाडीवरून धुराड रपेट, अंग अंग ओल, अंगभर ओले कपडे, साचलेले डपके, ओसंडून वाहणारा ओढा, भरलेले रस्ते, कौलावरून पडणारे पाणी, त्या कौलाखाली ठेवलेली बादली, तीपण तुडुंब भरून वाहणारी, डोक्यावर घेतलेले घोंगडं, अंधारात गेलेली गल्ल्या........ बरच काही ते पाऊस म्हटलं कि येत राहते मनात.....

प्रत्तेकाची आठवण असते काही-न-काही पाऊस म्हटलं तर, तसे माझे पण असेच काही तरी झाले, ऑफिस मधून घरी येताना, काहीसा रिमझिम पाऊस चालू होता, रोजचेच आपले घर-ऑफिस-घर आणि मग आता पाऊस, हेक्टिक वैगरे काही नाही पण आपले चालू होते रोजचेचं, गाडीची काच तशी अर्धी खुली ठेवली होती, गार वार आत झोकावत होतं, कानाला चांगला मारा पडत होता त्यात ते गाडीत रेडीओ वर गाणे चालू झाले अचानक “रिम झिम रिम झिम रुम झुम रुम झुम”, म्हणजे बाहेरच्या पावसाने सगळे बदलून बसला होता माझा मनातल्या मूडच्या वादळाला, मग काय घरी येई पर्यंत पावसाने चांगलीच भर घातली होती मनात माझा, गाडीतून उतरून मग घरापर्यंत येई पर्यंत माझा तोंडी त्याच गाण्याचे बोल पूट-पुटत होते, घरामध्ये आल्यावर कपडे बदलून मग ग्यासवर चहाला उकळीला ठेवले आणि किचनच्याच खिडकीतून बाहेर डोकावत निवांत थांबलो, पहाटेची वेळ होती, घरातले सगळे गाड झोपलेले त्यामुळे पिनद्रौपची शांताता नि त्यात बाहेर पडणारा पाऊस आणि ग्यासवर उकळनारा चहा....हुशस्स्स...

..खिडकीच्या जाळीच्या स्लाईड मधून बाहेरचा पाऊस स्पष्ट दिसत होता, पावसाने रस्त्यानि वाहनारी पाण्याची नाळ त्या अंधारातही मोहक भासत होती, लाईटच्या खांबाची तांबडी लाईट त्यामुळे तो ओलसर रस्ता मला काहीसा सांगत होता कि काहि तरी आठवण करत होता ते काही समजत न्हवते, पण मनाची काहीशी चुळबुळ चालू झाली होती माझात, आणि त्यात चहाला चांगली उकळी पण आली होती, ग्यास वरील चहाचे पातीले चांगलचं वाफा सोडत होत आणि त्याच्या आत चहा उड्या मारत होता, थोड्या वेळात ग्यास बंद करून लगेच कपात चहा ओतला नि थेट आतल्या खोली मधे येऊन दार लाऊन घेतले मग पुन्हा खिडकीच्या बाजूला थांबून उजव्या हातात कप घेऊन, समोर बाहेर पडणारा पाऊस बघत चहाचा एक चुसका ओढला, त्यानंतर मनाला मिळालेले समाधान निशब्द होते म्हणजे ते आता इथे शब्दामधे मांडणे जरा अवघडच आहे मला...

चहाचा कप हातातचं माझा, समोर रीम झिम पडणारा पाऊस, गारठलेले खिडकीचे गज, खिडकीतून तोंडावर आदळणारा गार वार्याचा झोका, निशब्द अंधार, समोर ओला रस्ता, ओठांशी चहाचा गोडवा आणि कानाशी त्यागाण्याची धून अजून घुमत होती.. असाच काहीश्या फ्ल्याशब्याक कडे ओढलो जात होतो मी, म्हणजे पावसाळा आणि जुलै महिना एक घनिष्ट संबंध म्हणजे माझा साठी हो.. पाऊस पडतोय खरा पुढे माझा पण कानाशी आवाज काहीतरी भलताच येत होता, जस कि पावसाळ्यात मुसळधार पावसात छत्री डोक्यावर घेऊन पावसापासून वाचत मला हाक मारणारी “ती” ओरडा करत थांबली असावी, पावसाचा पडणारा आवाज आणि तिचा ओरडा काहीसा सारखाच....!

ह्या गारठलेल्या पावसाने आता थेट मला मेमरीत न्हेऊन सोडलं होत. ते पण असे...

पावसाळा जरासा चांगलाच रंगात आला होता, झोडपत होता अक्षरशा, गिच्च करून टाकले होते सगळी कडे, रात्री राब-राब राबून घरी आलो कामाहून (रात्रपाळी हो अमुची त्यामुळे सकाळी घरी येतो !!) पावसाचा सडा जरा जोमात मारा मारत होता, नॉर्मल माणसांसाठी जुलैच्या त्या दिवसाची सकाळी होत होती, रोजच्यागत ह्या वेळेला झोपणारा मी अजून वटवागळागत अजून ढिम्म जागाच होतो, सकाळचे तसे सात वाजून गेलते, मग माझी धडपड सुरु झाली, अंघोळ-चहा-नाष्टा उरकून घेतला, चकाचक कपडे चढवले, डीओ फवारला अंगावर, बुटाड पायात रुतवले, कानाला हेअफोन रोवले, डोळ्यावर गॉंगल लावला आणि गाडीला कीक मारून ढूश झालो ते थेट बानेरच्या डीमार्टला गाडी थांबवली, पावसाचे भूस-भूस पडणे चालूच होते पण मी ते झेलत होतो अंगावर त्याचे मला काहीच वाटत न्हवते, आता सकाळचे चांगलेच ०९:१५ झालते आणि त्यात पाऊस हि मस्त चालू होता, मग समोरच्या टपरी वर जाऊन चहा सांगितला, भिजल्यामुळे अंगातून पाणी टपकत होते त्यानंतर हातात चहाचा गरम ग्लास घेऊन माझा पाऊस पडल्या अंगाला शेकत होतो, खिशातला मोबाईल काढला आणि नंबर लावला... रिंग वाजत होती मग तसाच कानाला फोन ठेऊन पलीकडून “हेल्लो” ची वाट बघू लागलो, तसा वेळ लागत नाही हेल्लोसाठी पण तो दिवस काय जणू खास होता त्यामुळे गप्प वाट बघत बसलो, रिंग झाली पण काही बोलन झाले नाही, काही मिनिटांनी समोरूनचं कॉल आला..

(फोनवरील सवांद)
मी : हेल्लो, कुठे आहेस?
ती : बस मधे..
मी : बर, किती वेळ लागेल पोहचायला? मी थांबलो आहे टपरीवर तुझी वाट बघत..
ती: बर, आलेचं.. ५ मिनिटात!!        

समोरून हेल्लो आज चांगल्याच मूड मध्ये होतं कारण आज आवाजातला गोडवा चांगलाच पाझरत होता बोलताना, हिचे पाच मिनिट आता मला चांगलेच तरसवत होते आज, वाट बघायची सवय नाही मला पण आज नबोलता गुमान तिची वाट बघत होतो, तसे तिच्यावर चिडत नाही मी, माझा राग पाघळतो ती समोर असली कि मग तिच्यावर चिडण्याचा प्रश्नच नाही, ती कुठवर पोहचली ह्याची अजून मला माहिती नाही त्यामुळे मी अजून एक चहा-कट सांगितला, कारण वाट बघताना माझातला गोडवा वाढवायचा होता मला आणि वेळ कशी जाईल ह्याचा विचारात मी, पाऊस रिमझिम चालू होता, मी तेथे टपरीच्या समोर चहाचा घोट घेत थांबलेला, मागून कोणाचा तरी हाक मारण्याचा आवाज मला येत होता, तसाच मी मागे वाळून पाहिले, आणि काय तर आमचं हेल्लो आल होते कि!!, छत्रीला डोक्यावर पकडून, डाव्या हातात तिची ब्याग, मस्त लाल भडक रंगाचा ड्रेस, डोळ्यांना काळसर लाईनर ओढले होते, ओठांना हलकीशी लालबुंद लिपस्टिक लावली होती, त्या रंगाण तिचे ओठ खरच डाळिंबागत लालबुंद दिसत होते, अंगाने बारीक नाही ती त्यामुळे गाल वैवस्तीत गुबगुबित दिसत होते, कानात छोटूसं डोरलं घातलं होत, एका हातात घड्याळ आणि दुसर्या हातात एकच बांगडी तीपण इस्टाइल मध्ये, असा काहीतरी सुंदर रुपडं आमच्या हेल्लोचं, तिचा आवाज कानात माझा घोंगावत होता, ती आता जवळ येत होती, मी अजूनही हातातल्या चहाला घशाखाली ओतत होतो, तीचं मटकट चालत येन आणि माझ तिच्याकडे बघन आता काहीस फिल्मी सीन चालू होता आमच्यात, ती येताच माझ्यावर स्वार झाली, हलक्या-जोराने ती आता मला मारू लागली होती, आता का अचानक सुरु झाली हि काय माहित पण आता जोपर्यंत हीच मन भरत नाही तोवर हि मारत राहणार, मी पण लागत आहे ह्याच ढोंग घेत तिच्यासमोर कळवळत होतो, ती शांत झाली आणि तिच्या तोंडाचा दानपट्टा सुरु झाला, आज का आलास, आताच का आलास, काय गरज होती, तुला तर काहीच आठवण नसते ई. भरपूर काही ती सुरु झाली आणि मी चिडीचूप तीचं ऐकत थांबलो..

तिला काय बोलाव काही सुचत न्हवत, माझे असे अचानक येन तिला सप्रायीस होते, तसा मी असे धक्के देण्यात माहिरच आहे म्हणा, तिला म्हटलं बस गाडीवर जायचे आहे आपल्याला आज बाहेर, तिच्या चेहऱ्यावर हाता मोठासा प्रश्नचिन्ह पडला होता आणि तो मी जाणला होता, तिने फ़क़्त विचारले कधी येणार आपण?? मी हळूआवाजात बोलून मोकळा झालो “लवकरच, रात्र होयच्या आधी” तो हसली आणि लगेच ऑफिसला फोन करून सांगितले सुट्टीचे, लगबग ती बसली गाडीवर, मी गाडीला कीक मारली आणि निघालो, गाडी थोडी पुढे गेली तोवर म्याडमांनी स्कार्फ घातला चेहऱ्यावर आता पुणेरी पेहराव तर झालाच पाहिजे न म्हणे स्कार्फ, आता माझा गाडीला दोन कानाचे आरशे नाहीत त्यामुळे तिला आरश्यातून बघता येत न्हवते मग गाडी चालवताना उगाच हटकून मागे वळून तीला बघायचो, ती मग हसून मला फटका मारायची आणि बोलायची गप गाडी चालव, स्कार्फ मध्ये तिच्या डोळ्यांना काय जोम येतो काय माहित पण जेव्हा स्कार्फ घालते तेव्हा तिचे डोळे मला भन्नाट वाटतात राव जसे तासलेल्या तलवारीची धार तसेच काहीसे कातील..

तिला काही तरी ऐकायचे होते माझा कडून पण मी पण हटकून काहीच नाही असे दाखवत होतो, गाडीचा वेग तसा नॉर्मल होता पाऊस हि काही थांबत न्हवता, पण काहीसा झुरमुर पडत होता, ति थंडीन कुडकुडत होती, तिची होणारी हेलमेल मला जानवत होती, त्या थंडीने तिची अंगाची थरथर होत होती, नकळत तिने मागण मला घट्ट मिठी मारली, आणि खांद्यावर डोके ठेऊन ती निवांत गप्प झाली होती, डोळे मिटून ती आता ती उसासे देत होती, तीच असे निवांत पने खांद्यावर डोक ठेऊन बसने मला फार भाळते, नकळत ती तिच्या विचाराण मध्ये गुंग झाली होती, कसल्या तरी विचारात पडली होती, मला तसे जाणवले पण मी काही न बोलताच गाडी चालवत होतो, तिला तिची वेळ दिली, मग नंतर स्वताच बोलू लागली, आपण कुठे चाललो आहोत, तसे मी सांगणार हि न्हवतो, पण तिला जास्त सिक्रेट मध्ये ठेवायचे न्हवते, त्यामुळे सांगून मोकळा झालो, आम्ही आता जवळपास लोणावळ्यात पोहचलो, गर्दी न्हवती त्यामुळे आम्ही वैवस्तीत पुढे निघालो, हिला भूक लागली असेल म्हणून मी गाडी एका हॉटेलात बाजूला घेतली, काहीस खाऊन आम्ही निघालो, तिला आज पावसात चिंब भिजवायचे होते मला त्यामुळे कुठेही न थांबता पुढे भुशी द्याम कडे पोहचलो, तसा आज इथे येण्याचा आमचा प्लान अचानक होता त्यामुळे इथेच का आलो हे तिनेही विचारले नाही, तिचा हाथ पकडून पुढे द्यामच्या वरती जाऊन मागच्या बाजूला गेलो आम्ही, तेथे तळ्याच्या काठी आम्ही दोघे बसलो, आता गर्दी नसल्याने कोणाचा त्रास न्हवता आम्हाला, ती पुन्हा खांद्यावर डोके ठेऊन बसली, तिच्या केसा’न सोबत खेळत मी तिच्यासोबत बोलत बसलो, असा निवांत वेळ भेटत नाही आम्हाला, मग काहीतरी भलत्या गोष्टींची चर्चा न करता, मी थेट तिच्या हातात कॅडबरीची मोठेवाले पाकीट ठेवले, ती आता चांगलीच खुश झाली, मला आता कडकडून तिने मिठी मारली, ती अशी मोकळी क्वचितच होते, कोण तरी बघेल, लोक काही तरी बोलतील वैगरे वैगरे असे तिचे चालू असायचे, पण आज जरा ती चांगल्याच मूड मध्ये होती, तिच्या डोळ्यात वेगळीच खुशी होती, ओठांवर तीचे मिश्कील हसणे मोहक वाटेल असे होते, तिच्या गालांचा गालगुच्चा घेतला, तेव्हा तिने तीचे डोळे हलकेशे मिटले, आता आमच्या होणार्या गप्पा आता भलत्याच रंगात आल्या होत्या, मला तिच्यासोबत असा मोकळा वेळ घालवायचा होता, तो आज जगताना मी भलताच भारावून गेलो होतो.

तिला तसेच कुशी मध्ये घेत, तिच्या कानाशी मी काही तरी बोलण्याचा पर्यंत करत माझी चुळबुळ सुरु झाली, तिलाहि त्याची जाणीव होऊ लागली कि माझी काही तरी धडपड सुरु आहे ते, तिची खोडसर वृत्ती त्यामुळे मला चिडवत होती, पण तशी ती पण उत्सुक होती कि मी आता काय बोलणार ते, मी बोलणार आणि ती ऐकणार अशी वेळ आलती, भारावून गेलेल्या मनाला आता मी मुठीत धरून मनातल ओठांवर आणण्याचा प्रयत्न करू लागलो, पावसात भिजल्याने माझा ओठांची होणारी कुडकुड ती आकस्मित पने ऐकत होती, छातीत वाडलेल्या ठोक्यांची गती तिला जाणवू लागली, तिच्या कंबरेवरील हात मी हलकासा घट्ट करत, कानाशी तिच्या पूट पुटनाऱ्या ओटांना माझा आता कुठतरी आवाज फुटला..

“हैप्पी बर्थडे बबू... <3  “

....असे बोलून माझा मनावरचा भार कमी केला, ओठांवर आता आकस्मित स्मिथ फुटले माझ्या, गारठलेले अंग अंग आता कुठतरी ढील पडले, तिला समजले आणि कळले कि असा सहज केलेला प्लान, रात्रीपासून न केला कॉल नि मेसेज, म्हणजे सर्व काही ठरवूनचं आलो होतो मी, तिला राग होता भरपूर कि मी तिला रात्रीच्या बाराच्या ठोक्याला का नाही कॉल केला, साधा मेसेज तरी करून सोडायचा पण इथे येऊन तिला दिलेले सप्रायीस तिला खूप आवडले, तिच्या डोळ्यातला ओलावा मला सांगत होता, तिने घट्ट मारलेली मिठी मला सांगत होती, हलक्या हाताने मारलेले लाडीव फटके मला सांगत होते, तिचा मांजरीच्या पिलागत झालेला क्युटनेस मला बोलत होता, भरपूर काही तिच्या प्रत्तेक हाव भाव मला सांगत होता कि ती आता किती खुश आहे ते...

हुश्श ह्या पावसाळ्यातल्या आठवणी ना खरच जीवचं घेतात.....

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

#blogger
-----------
जितेंद्र वाजे
११-०९-२०१७









No comments:

Post a Comment