Tuesday, June 27, 2017

चहा..!


चहा..! ©
पावसाळ्यात, चहा म्हटलं कि मनातल्या पाखराला आकाशी झेप घ्याविसी वाटते, मनातल्या निशब्द सागराला तुफानी लाटांसोबत भरती येते, मनातल्या शांत वाहणाऱ्या वार्याला अचानक पने वादळी वार्याचे रूप प्राप्त होते..

म्हणजे कस घरामध्ये बसून बाहेर पडणारा पाऊस कानाशी खोड काढत असतो पण ह्या खोडसर पावसाने केलेली मनातील कुजबुज नक्की काय आहे हे कळण्या आधी हातात वाफाळलेला चहाचा कप येतो, बाल्कनीत थांबून डोळ्यासमोर असनारे गारठलेले ग्रीलचे गज पकडताना होणारी मनाची औच.. फिलिंग, आणि बाहेर पडणारा पाऊस बघताना घेतलेला चहाचा एक घोट!!....

अनुभवांचे किस्से तर भरपूर आहेत चहा बद्दलचे आणि ते पण भरमसाठ हो!!

o   ताडपत्री लाऊन त्याचाखाली पेटवलेला स्तोव, त्यात तो चहापत्तीने काळपट झालेले ते चहाचे पितळाचे भांडे, बाजूला ठेवलेला चहापत्तीचे गाठोडे केलेला पांढर्या कापडाचा पुंजका, चहाला ठुई-ठुई नाचणारी उकळी येई पर्यंत धीम्या गतीने पेटलेल्या स्टोव वर असलेला चहाचे ते पातीलं, बाजूला ठेवलेले आणि अधाश्या वाणी आतुर झालेले ते काचेचे ग्लासेस, आणि त्या समोर ऑ.. करून थांबलेले आमच्या सारखे चहाचे वात्रट चालीचे चाहते..
o   रामनाथची मिसळ खाऊन जिभेला लागलेली आग मिटवायची म्हटलं तर, बाहेर पडताच गाडीला कीक मारून टिळक चौकातून खालच्या रोडने शनिवारवाड्या कडे निघायचं, मातीगणपतीच्या समोरून दावी कडे होत मोतीबागच्या समोर असणारे वैज्यनाथ अमृततुल्य हाटेलात धाड मारायची, गर्दी मागे टाकत, शर्तीचे प्रर्यंत करत गरमा-गरम चहाचा ग्लास हातात घ्यायचा आणि बाजुला कठड्यावर बसून जीभेवर जळणाऱ्या आगीवर चहाचा सडा मारायचा आणि मनाची शांती ती करून घ्यायची बस..
o   सदाशिवपेठेत पायाची हालचाल करून झालेले तुकडे सांभाळत, लक्ष्मि रोडची गर्दी बाजूला सारत, बाजीराव रोडला घुसायच नि बदामी हौद चौकाच्या जवळ असलेल्या होटेल साई (प्रेमाचा चहा) मध्ये निवांत बसून चीनी मातीच्या कपात चहाचा फुरका मारून गप्पा मारत बसायचे..
o   बाप्पा दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन मागच्याच टपरीवर थांबून तिथला चहा, हाताशी ठेवत समोर असणार्या बाकावर बसायचे, आणि चहाचा कप एका हातात आणि एखादं बिस्कूत हातात घेऊन समोरून जाणारी गर्दीला कानाडोळा करत त्या भिजलेल्या बिस्कूटला घशाखाली उतरवणे, असे काही तरी करत चहाचा आस्वाद घ्यायचा..
o   हफिसातून केलेली स्वताची सुटका आणि जमल तर गाडी आणली असेल तर, सोबत्याला सोबत घेऊन थेट निगडी फ्लायओवर खाली येऊन, तिथल्या चहाच्या टपरीवर क्रीमरोल आणि चहाचा कप, आणि पुन्हा ऑफिसचे सत्र आणि खाताना क्रीमरोल-चहा, असं काहीसे उरकून घरी पसार होयचे..
o   भोरच्या वरंध्यातील, पवार हॉटेलात.. भजीची प्लेट सांगून सोबत त्यांची मिरची ठेचा ह्यावर सर्रास ताव मारून मग चहा चुसका घ्यायचा आणि पुन्हा आपल्या मार्गाला हुश्ह्ह..
o   चोर दरवाजाने पावसाळ्यात राजगड उतरून, म्हणजे “राजगड उतरून” ह्यात सगळ आले, पायाची तंगड तोड चढाई, भटकंती, इकडवंत्ती ई. करून खाली येऊन, चहा आणि पार्लेचं बिस्कूत, सगळ्या प्रवासाचा थकवा हा क्षणात विरघळून जातो त्या चहाचा एका घोटाने एवढच सांगायचे ... थोडक्यात...

..... आहेत भरपूर अणुभव पण इथे उगाच त्या सर्रास चहा पुराणाचे कौतुक नको म्हणून थांबतो... J

......................
जितेंद्र वाजे
२८-जून-२०१७

 #चहा #tea #चहा_रसिक #life #blogger

No comments:

Post a Comment