Saturday, May 16, 2020

पुन्हा एकदा नव्याने भेट..! ©®

पुन्हा एकदा नव्याने भेट..! ©®

त्या दिवशी बौध पोर्णिमा होती त्यामुळे पांढऱ्या शुभ्र चंद्राने रात्र मस्त रोमांचक झाली होती. मे महिना तसा उन्ह, वारा आणि ढगाळ वातावरणाचे दिवस घेऊन येतो. त्यामुळे रात्री हवा बेभान वाहत होती. माझ्या खिडकीच्या काचेला सैरावैरा करून सोडले होते वार्याने, खिडकीवर आदळणारे वार आणि त्याचा आवाज, खुर्चीत बसून आत येणारी थंड वाऱ्याची झुळूक अंगाला शहारे देऊन जात होती. अश्या गोंधळात मला झोप हि लागत न्हवती पण कोणास ठाऊक नकळत मला डूलका लागला.

खिडकीतून कोवळ उन्ह चांगल डोळ्यावर हलकासा मारा करत होते. रात्री जागरणाने झोप पूर्ण झाली नाही. पण तरीहि मी स्वताला चुरगाळलेल्या बिछान्यातून स्वताला दूर सारत उठलो. सकाळचा चहा घशा खाली सोडला आणि आपला मोबाईल घेऊन उगाच काही तरी करत बसलो. अचानक अनोळखी नंबरवरून फोन आला, थोडा थांबून मी फोन उचलला आणि समोरून गोड आवाजात “हेलो” म्हणून बोलले कोण तरी..

कानामध्ये जोरात धावणाऱ्या ट्रेनचा आवाज यावा तसा, समोरून माझाशी बोलत होती ती व्यक्ती, मला बोलायची संधीच देत न्हवती..हो “ती” चं... ती धावणारी ट्रेन माझाकडून सुटली होती मागे पाच वर्षापूर्वीच. आता तिचे ऐकता ऐकता सगळ्या गोष्टी माझा डोक्यात घोंगावत होत्या, म्हणजे.. तिच्या बद्दलच्या आठवणी, किस्से, सोबत फिरलेले दिवस, बेहिशोबी घालवलेले दिवस, कित्तेक दिलेले वचने, ठळकपणे छापलेले मनातील चित्रे, डोळ्यांनी डोळ्याला दिलेले सुख, तिच्या मिठीत मिळणारे स्वर्गसुख, बेभान पावसात घालवलेले दिवस आणि तिच्या ओठांवर सुखावणारे माझे ओठ. असे बरेच काही एका क्षणात माझा डोळ्यासमोर येत होते. आजही मी ऐकत होतो आणि ती समोरून फ़क़्त बोलत होती. जादूच अशी तिची कि मी पुरता शून्य होतो, ती बोलत असताना म्हणजे वादळालाहि कोणितर मुठीत पकडावे असे काही. ह्या सगळ्यात तिच्या लग्नात अनुभलेला दिवस आठवला. गळून पडलेलो मी, तिला शेवटचं भेटायला म्हणून आलेलो स्टेजवर, तेव्हा तिच्या कपाळावर आलेला घाम, उडालेली तारांबळ मला तिच्या डोळ्यात दिसत होती. तेव्हा तिच्या डोळ्यात मन भरून पाहता आले नाही. आणि तसाच खाली स्टेज वरून खाली उतरलो. तेव्हा काय ते तिझ्या आणि माझ्या आयुष्याच्या नव्या युगाला सुरवात झालती. फरक मात्र एवढाच कि .. ति उगवती कडे आणि मी मावळतीकडे चालू लागलो होतो.

सगळे तिचे ऐकले शांत राहून. म्हणजे आमचे बरेच काही बोलणे झाले होते तसे. तब्बल पाच वर्षाने तिच्या सोबत बोलणे चालू होते. ती अशीच आहे सगळ चोखपणे माझाकडून काढून घेणार माझाबद्दल. मी काय ते सांगत गेलो, पण मला एक नक्की जाणवले ह्या सगळ्यामध्ये. तिला जाणवून घ्यायचे होते मी नक्की काय करतोय आजकाल, लग्न बिग्न झाले का किवा नवीन प्रेयसी आहे का आयुष्यात. असे सारखे फिरून फिरून उकरून काढत होती. तसे माझाकडे सांगण्यासारखे खास न्हवते म्हणा काहीच. तिचे झाल्यावार तिच्याबद्दल विचारू लागलो. तिने हि बेधडक पने सगळे सांगितले. नवरा आणि तिच्या चिमुकल्या परी बद्दल! बोलता बोलता तिला भेटायचे आहे असे बोलून मी मोकळा झालो. तिने हि हसत हसत भेटू म्हणून होकार दिला. तस भेटणे काही चुकीचे थोडी आहे आमचे, ती तिच्या नवर्याला सांगून येणार असे बोलली, मीही बोललो चालेल, पण मला जास्त वेळ हवाय तुझा असा हट्ट धरला. असे सगळे बोलणे झाल्यावर तिने फोन ठेवला.

फोन ठेऊन मी पुरता शॉक झालतो. पण डोक्यावरहि कामाचा बोज्या होताच. आपल्या दिनक्रम चालू केला, सगळे चालू असताना तिला मेसेज केला येत्या सोमवारी भेटू म्हणून, काही वेळाने तिचा मेसेज आला कि ठीक आहे. इथ माझी  झोप उडाली होती, आता नव्याने भेटायचे, काय..कसे..कुठे.. सगळ्या प्रश्नांनी माझ्या मनाच्या मोकळ्या उनाड रानात वारे घोंगावू लागले होते. मी भेटण्याच्या दिवसाची वाट बघू लागलो.

तिने सुट्टी टाकली होती सोमवारी, म्हणजे ती पूर्ण दिवस देणार हे समजले. तिला पिक-अप करण्यासाठी निघालो. ठरल्याप्रमाणे भेटण्याचा ठिकाणी गेलो. माझा फोन वाजू लागला, तिने गोड आवाजात मागे वळून बघ असे बोलली. मी लगेच मागे वळालो, ती एका मोठ्या झाडा खाली ती थांबली होती. उन्हापासून वाचायला तिने छत्री धरली होती डोक्यावर, गडद चोकलेटी कलरचा मोठासा चष्मा चढावला होता डोळ्यांवर, फुल स्लीवचा टॉप ते पण मोरपंखी रंगाचा. त्या खाली लांब लचक पांढऱ्या कलरचा स्कर्ट पण हलक्या पिवळट रंगाची चित्र फित्रे त्यावर, ओठांशी हलकीशी पिंक रंगाची लिपस्टिक आणि थोडी अंगाने भरली होती त्यामुळे चांगली मादक दिसत होती. हे सगळ निखारून मी तिला पुन्हा एकदा प्रोपोस करावा नव्याने असे मनात येऊ लागले. ह्या सगळ्यात तिच्या गळ्यातल मंगळसूत्र शोधत होतो मी पण काही घावले नाही. इतक्या वर्षांनी मधल्या काळात चांगलीच मोर्डेन झाली होती. इतक्या कडक उन्हात ती चांगलीच झळकत होती. मला बघताच तिने हलकीशी स्माईल दिली आणि हात वर केला. तिच्या जवळ गडबड करत गेलो. म्हणजे मागे माझाकडून सुटलेली हि सुसाट ट्रेन पुन्हा माझा डोळ्यासमोर येऊन थांबली होती. तिने जवळ येऊन हातात हात मिळवले.

आमच्या गप्पा सुरु झाल्या, तिथ थांबल्या थांबल्या आमचे चांगलेच तीस मिनिट्स गेले. बोलताना तिच्या चेहऱ्याचे हावभाव मी ताराकले मग तिला म्हटलं मागे बस पटकन, तिने हि लगेच खांद्याचा आधार घेत एका बाजूला पाय सोडून बसली मागे. ती अजूनही माझावर हक्क गाजवते हे खांद्याच्या पकड वरून जाणवले. मी गाडी थेट वैशाली समोर लावली, तिने माझ्याकडे बघून हलकीशी स्माईल दिली आणि तडकपने आत गेली, आमच्या ठरलेल्या टेबलावर जाऊन बसली. गाडी ठीक पार्क करून आत गेलो. ब्याग बाजूला ठेऊन, ती घाईत मेनूकार्ड बघू लागली नेहमी सारखी. समोर ती त्या मेनूकार्डच्या गर्दीत आणि मी तिच्या काळेभोर, काजळी लावलेल्या डोळ्यात हरवून गेलो होतो. आज मनभरून हिच्या डोळ्यात डूबायचे होते. नशा आहे तिच्या डोळ्यात, बस त्या नशेत गुंग व्हावे असेच वाटते दरवेळेस. तिची नकळत नझर माझाकडे गेली, पण मी तीला दुर्लक्षित करत तिच्या कडे पाहू लागलो होतो. गालावरील खळी किंचीतशी पडू लागली आणि ती हसू लागली गालातल्या गालात. ओठांशी पिंक लिपस्टिक आता मवाळ झालती, तिच्या लालसर गुलाबी ओठांची छटा दिसू लागली होती. तिने ओर्डर देऊनहि टाकली, मी काय खाणार ह्या पेक्षा तिला काय खायचे आहे हे सांगायची तिची जुनी खोड. स्वतासाठी मसाला डोसा आणि माझासाठी उडीदवडा-सांभार. तिचे भुकेने केविलवाणे डोळे मी तिथेच तारले होते म्हणून इथे आणले तिला लगेच. तिची खातानाही बड-बड काही थांबली नाही, ती बोलत होती मी ऐकत होतो बस. हितले आमचे आटपले काही वेळात. तीला कॉफिची तलफ आणि मला चहाची ओढ हि आमची जुनी सवय. तिला घेऊन सदाशिवपेठेतल्या कॅफेत घेऊन गेलो. चांगला एखाद तास आम्ही तिथ ही घालवला.

आमच्याकडे बराच वेळा होता तसा. तिला म्हटलं मस्त मूवी बघू, काही वेळ घालवू तिथ. असे म्हणून आम्ही लक्ष्मिनारायण सिनेमागृहात गेलो. हित येण्याचे माझ कारण जरा वेगळेच होते, तिचा-माझा हा लक्ष्मिनारायण सारखा जोडा असावा असे काहीतरी बालिश होते मनात. मुव्ही पाहून आम्ही तिथून निघालो. खर तर मला पुन्हा त्या अंधार्या खोटडीत जायचे न्हवते पण दुसरे काही आलेच न्हवते डोक्यात त्या वेळेला. पुन्हा बाहेर निघताना प्रश्न पडत होता नक्की जायचे कुठे आता. म्हणजे आता कुठेतरी शांत ठिकाणी, जिथे एकांत मिळेल, निवांत बोलता येईल. थोडं उन्ह कमी झाले होते. आणि सगळी कडे नितांत शांतता पसरली होती. गाडी मी तशीच खडकवासला धरणाकडे फिरवली. म्हटलं आज सोबत हिच्या शांत ठिकाणी बसावे. ढळणार्या सूर्यास्ताकडे बघत वेळ घालवावा. पाण्याचा बाजूला जाऊन आम्ही खडकावर बसलो. जिथे बसलो होतो तिथ गर्दी न्हवती. तिथ फ़क़्त खडकाला आढळणारे पाणी, हिची बडबड आणि पक्षांचा किलबिलाट फक्त ऐकू येत होता. जुन्या गोष्टी उकरून ती बोलू लागली. प्रत्तेक वेळेला हेच विचारत होती, तू लग्न का नाही केलेस, कोण भेटले कि नाही आणि माझी आठवण येते कि नाही. बोलणे तर चालुच होते, बोलता बोलता मी तिचा हात पकडला, मुठ तिचे मोकळी केली आणि त्यावर तिला घेतलेली रिंग ठेवली. तिचासाठी घेतलेली रिंग मी अजून जपून ठेवली होती. हे बघून तिचे डोळे भरून आलते. ती मिश्कील हसू लागली होती, हसू ह्यासाठी कि माझा वेंधळ्या प्रेमावर तिला येत होते. तिने हलकेसे मारले माझ्या डोक्यावर. आणि खांद्यावर डोके टेकवत शांत झाली. मी काही वेळा साठी हरवलो होतो तिथे. तिने खांद्याला टेकावलेले डोके. केसांची गर्दी माझ्या छातीशी पसरली होती. खांद्याला ओल जाणवू लागली मला. पण इथ मी सगळा त्राण हरवून बसलो होतो.

घड्याळाचे काटे सन सन सरकत होते पुढे, समोर डोंगराच्या आड जाणारा सूर्य, आकाशभर तांबूस रंग पसरला होता. पाण्यातून सोनेरी किरणे डोळ्यात मारा करत होती. तिने अजूनही खांदा सोडला न्हवता माझा. मी तिला कसतरी सावरत तयार केले. तिने माझा हातात पुन्हा ती रिंग ठेवली आणि तूच घाल बोटात अशी डोळ्याने विनवणी केली. ती आज पुरती कॉलेजातील कुमारी होऊन आली होती. म्हणजे गळ्यात मंगळसूत्र नाही आणि बोटात साधी रिंग नाही. जशी काय ती आज पासून माझा आयुष्यात कायमची येणार होती . मी रिंग तिच्या बोटात घातली. ति तशीच उठली आणि गाडी पाशी निघाली. तिला बोलायचे तर भरपुर होते, वेळ पण घालवायचा होता पण काय आहे, आता तिची घरी वाट बघणारी तिसरी व्यक्ती होती, ह्याची तिला जाणीव झाली. मी पण काही बोललो नाही आणि तिला पुन्हा तिच्या मूळ ठिकाणी सोडले आणि माझा दुनियेत परतलो.

तसे ती जेव्हा खांद्यावर डोके टेकवून शांत झाली होती. तेव्हा माझा आतमध्ये पुन्हा रोमांच जगू लागला होता. तिला घट्ट मिठीत घेऊ वाटत होते. पुन्हा तिच्या गुलाबी ओठांशी मला गुडूब्त होऊ वाटत होते. भरल्या डोळ्यांना पुसायचे होते, अलगत भरलेल्या कंबरेशी हात बांधायचे होते, गालांवर पसरलेले केस सावरायचे होते.. असे बरेच काही मनाशी उसळले होते, पण आपल पुन्हा मर्यादेच्या सिमे अलीकडे थांबलो.

 

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p ©®

 

#पुन्हा_एकदा_नव्याने_भेट..! ©®
#jeet

#blogger

#मराठी_ब्लॉगर

#मराठी_प्रेमकथा

-----------
जितेंद्र वाजे
१६-०५-२०२०



No comments:

Post a Comment