नुकताच नोकियाचा ठोकळा मोबाईल विकत घेतला होता
तेव्हा, म्हणजे कॉलेजचे ते दिवस, कुमार वयातले नवके नखरे. असे बरेच काही चालू होते
लाईफ मध्ये तेव्हा. नाकाखाली उगवलेली भुर्या रंगाच्या मिश्या, जे काही होते
त्यालाच ताव मारत कॉलेजला जायचो. मुलींशी तशी ओळख नवती जास्त पण कधी तरी झालेच लायब्ररी
मध्ये बोलायचो एकाद मुलीशी, त्यात पण लाजऱ्या स्वभावाने मागे ठेवले होते. कोलेज
आटपून चार्टड अकौंटकडे काही तासांसाठी कामाला जायचो, आपल उगाच थोडे पैसे आणि
शिकायला मिळावे म्हणून. चांगले दोन चार महिने उलटले तिथे काम करून, तेव्हा कुठे
एका मुलीशी तिथ ओळख झालती, कामा निमित्त बोलणे बाकी जास्त नाही. शनिवारी पूर्ण
दिवस जावे लागायचे, मग तिथेच टिफिन खाणे पिने असा काहीतरी दिनक्रम सेट झालता.
तेव्हाच्या वेळी फोन मध्ये
ब्यालंस असणे म्हणजे खूप मोठी गोष्ट असायची. आणि त्यावेळेस तो आईडीयाने रात्रीचा
अनलिमिटेड कॅलिंग प्याक सुरु केलता. म्हणजे रात्री अकरा नंतर आईडीया ते आईडीया
कॉलिंग मोफत असायचे. ह्याचा तसा आपल्याला काही उपयोग न्हवता.
ऑफिसमध्ये रोज भेटणारी “ती” लाईफ मध्ये नकळत जवळ
येत होती. रोजचे भेटणे, बोलणे, काही कामानिमित्ताने जवळ येणे, हे त्या वेळेला
सुखावत होते. आयुष्यात प्रेम वगैरे काय ते फ़क़्त चित्रपटात पाहिले आणि तेव्हाच
अनुभवले. मग तिच्या सोबत बोलताना असे काही खास नाही पण जरा वेगळाच अनुभव येऊ
लागला. दिवसभर भेटून आमचे बोलणे होयचे पण तिला ह्यात समाधान वाटायचे नाही. तिने स्वताच्या
मोबाईल मध्ये तो रात्रीचा रिचार्च प्याक मारला होता. तिने मला कधी हट्ट नवता केलता
कधी कॉल करण्याचा. रात्री जेवण आटपले कि अकरा नंतर हि कॉल करायची. रात्रीचे चांगले
एक दोन पर्यंत आम्ही बोलत बसायचो. हे बोलणे बराच महिने चालू होते. म्हणजे तिला
माझावर प्रेम आहे किवा मी तिच्या बद्दल काही विचार करतोय का असे काहीच नवते म्हणजे
फ़क़्त बोलणे नितांत. माझा खिशाला तिने कधी त्रास दिला नाही, तिचीच खटाटोप चालायची, फोन
करायचा आणि सगळे. ह्यात तिच्या बहिणींशी पण ओळख झालती, मग काय त्यांचा सोबत पण आपल
वेड्यागत बोलत बसायचो. तेव्हा बोलताना वेळेचा भान कधी झाला नाही. आणि तिनेहि कधी
प्रेम बीम असल्या गोष्टी मध्ये आणल्या नाही. या सगळ्यात वेळ इतका गेलता कि समजलेच
नाही. आम्ही कॉमर्सची डिग्री घेऊन बाहेर पडलो. तरीहि आमचे फोना फोनी चालूच असायचे.
तिने एके दिवशी सांगितले लग्न ठरले म्हणून, मामाचा मुलगा आहे आणि पुढच्या महिन्यात
लग्न आहे ते, मग काय लग्नाचे निमंत्रण दिले आणि ठेवला फोन.
काल एक अनओळखी फोन आला होता, नंबर
नवीन होता मी उचलला नाही, पण का जणू कोण असेल ह्याची कून कून लागू लागली होती, मग मी
लगेच फोन लावला आणि समोरुन आवाज आला.
“ब्यालंस आहे का रे फोन मध्ये, कि करू मी फोन” आणि जोरात हसू लागली ती समोरून..
टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक :p
©®

No comments:
Post a Comment