Monday, September 25, 2017

मनात सलत राहणारी गोष्ट.. ©®

मनात सलत राहणारी गोष्ट..


मनात सलत राहणारी गोष्ट.. ©®


थंडीची गार मौसमी दिवस ओसरत चालले होते त्यादिवशी, रात्र मोठी आणि दिवस लहान झाला होता, मनाशी काही तरी सलत होत पण काय ते काही समजत न्हवते, रात्र डोळ्यात तेल घालून जागून काडली, मित्राचा सकाळीच फोन आला, कुठे आहेस म्हणत मलाच विचारले, मग काही नाही म्हणत पुन्हा तो स्वताच शांत झाला, मला काही सुचेना कि हा सकाळच्या पारी फोन करून गप्प का ते, मी पुन्हा त्याला फोनवर व्यवस्थीत विचारायचा प्रयत्न केला पण तो समोरून काहीशा दबक्या आवाजात बोलू लागला, तू आताच्या आत्ता भेट मला, त्याची आवाजातील हळवे हुंदके मी जाणले पण मला हि काही सुचेना कि एवढा सकाळी काय झाले असेल ते, मित्र म्हटलं कि जीव कि प्राण माझा तो कोण हि असो लांबचा किंवा जवळचा, त्यामुळे मी गडबडीत माझी सर्व कामे आवरले आणि घाईतच त्याचाकडे निघालो, माझा गाडीचा स्पीड आता काळजीने वाढला होता, त्याच्या घराखाली जाऊन मी कॉल केला आणि तसाच तो काही वेळात आला पण खाली, लगबग गाडीवर बसला माझा आणि मला चहाचा टपरी वर चाल म्हणत तो गडबड करू लागला, सकाळच्या कोवळ्या उन्हात आम्ही हातामध्ये चहाचा कप घेत बाजूला असणार्या बंद टपरीच्या कठड्यावर बसलो.
ह्याच अजून काहीच नाही पण मलाच काळजीने मन भरू लागले होते, त्याला विचारू लागलो आता तरी बोल बाबा काय झाले ते, त्याचा पडलेला चेहरा अजून सुन्नच, माझा आता रागाचा पारा चढला आणि मी त्यावर खेकासलो, तसा तो हळू आवाजात बोलला..

“ अरे, तिचे लग्न आहे उदया..”

मला विश्वासच बसला नाही कि हा अचानक असे काय सांगू लागला, मी शॉक झालो आणि एकदम त्याचावर ओरडलो .. “काय....?”.. माझासाठीहि हा जरा धक्काच बसल्या गत होते, कारण काल परवा आम्ही भरपूर काही प्लान्स करून बसलो होतो कि ह्याचं जिच्यावर प्रेम आहे तिला कसे प्रोपोस करायचे ते, पण हा माणूस आज चक्क तिचे लग्न आहे आणि ते पण उद्या..! आमच्या दोघात आता शांतता पसरली होती, त्याची अवस्था आता खरच केविलवाणी होती, ते पाहून मलाच रडू येत होते कारण इतक्या दिवस आम्ही ज्या गोष्टी साठी धडपड करत होतो ते नाहीसे होणार असेच काहीतर झाले होते.

आम्ही चहा उरकून मग झेड ब्रिज ला जाऊन बसलो, तेथे गेल्यावर त्याला सविस्तर विचारणार होतो मी, तसे आम्ही बसलो तेथे आणि हा सुरु झाला सांगायला (पुढील सर्व त्या मित्राचा शब्दात..)..

..ती कधीच मन मोकळी न्हवती रे, ना कधी तिने मनातले सांगितले मला, साधे भेट म्हटलं तरी ती कधी तयार नसायची, का जणू घाबरायची कुठल्या तरी गोष्टीला, तिला माहित होते माझा मनात काय आहे ते पण का जणू ती समजून टाळल्या गत करायची, हटकून करायची कि काय माहित. तसा मीच भित्रा होतो म्हणा तिच्या सोबत बोलायचो, फोन करायचो आणि आमचे तसे व्हात्सअप वर पन बोलणे होयचे पण मला कधी विषय काढताच यायचा नाही, उगाच कुठल्या न कुठल्या विषयावर तीचासोबत बोलायचो, तिला केलेल्या कविताहि ती आवर्जून वाचायची आणि रिस्पोन्स द्यायची, मला साला मलाच नाही जमले तिला काही बोलायला, तिचा वाढदिवसाला घेतलेले ग्रीटिंग अजून घरातल्या कपाटामध्ये जपून ठेवले आहे, पण साला मलाच जमले नाही, कधी कधी ती बोलायची तिच्या घरच्यांनी स्थळ बघणे सुरु केले आहे ते, माझी तेव्हा जाम टरकायची, भीतीने माझे पाय घामाने ओले होयचे, तीची कळकळ मी तेव्हाच का नाही समजून घेतली, तिला नक्की काय बोलायचे होते हे मी तेव्हाच का नाही समजून घेतले, माझेच वेडसर वागणे अंगाशी आले माझा रे..
आज सकाळी तिचा गुड मोर्निंग चा मेसेज आला, मला बोलू लागली कि उद्या लग्न आहे म्हणून, मला धक्काच बसला रे, मला काहीच कळत न्हवते काय करावे ते, तिला आता काय रिप्लाय देऊ हेच समजत न्हवते, मग नंतर तिला मीचं विचारले आता सुचले का तुला सांगायला ते, ती बोलली कि माझे धाडस होत न्हवते कि तुला कसे सांगू ते, ह्याचा मला काहीच अर्थ लागत न्हवता, तिने लग्नाची तयारी केली, मुलगा निवडला, तिचे जमले, लग्नाची तारीख पण आली जवळ आणि हिला मला सांगायची हिम्मत का नाही झाली, तीचावर आता ओरडू कि काय करू अशी माझी अवस्था झालती रे, तिला तसे समजत होते कि माझी काय अवस्था झाली आहे ते, पण तिचे असे वागणे मला खरच पटले नाही, तिला भेटायचे आहे आणि ते पण आत्ताचा आत्ता, असे तिला बोललो पण तिची पण अडचणच होती रे, लग्न घरातील मुलगी कशी येणार भेटायला, माझा सारखा मूर्ख मीचं हे ठरलो आज, तिचा सोबत भरपूर बोललो, भरपूर विनवणी केली, बोलताना ढसा ढसा रडलो पण, त्याच काहीच होणार न्हवते आता हे मला समजले पण ती अशी अचानक लांब जात आहे, परकी होणार आहे, सोडून जाणार आहे, असे बरेच काही होणार होते एका दिवसात पण ते मला स्वतालाच पचत न्हवते, तिला माझा अश्या वागण्या मुळे टेन्शन येत होते पण तिच्या काळजी पायी मी माझ सर्व टेन्शन बाजूला सारून पुन्हा तिला बर वाटावं म्हणून मी बोलू लागलो..
तिचा काळजी पायी माझ हळवं, रडक, एकट, घूसमटलेलं.. मन आता आतूनच हुंदके देत तीचे ऐकत बसले होते, तिचा लग्नाची तयारी, तिची आज हळद, घरी आलेले पाहुणे, घरी चालू असलेला गोंधळ हे सर्व ऐकत बसलो, हिला माझी केलेली कोंडी आवडत होती वाटत, ती ज्या प्रमाणे लग्नासाठी तयार झाली होती ह्याचावरून तिला आता माझे काहीच देणे घेणे न्हवते ते मी जाणले आणि तिला माहित होते तिला काही त्रास होणार असे मी असे काही करणार नाही ते, माझ पुरत बुजगावण तिने केले हे माझा लक्षात आलते पण मी अजून तिचेच गाराने ऐकत होतो..

..ह्याने आता आहे नाही ते सर्व मला सांगून मोकळा झाला होता, ह्याचा कोरडा पडलेला आवाज, सुखलेले ओठ, गळून पडलेला चेहरा आणि बेजान झालेलं शरीर मला आता बगवेना झालते, जिवलग मित्र हा आणि ह्याची हि अवस्था खरच जिव्हाळी लागत होते, उदया तिचे लग्न होते, आणि हा बहादूर मला तिच्या घरी चल म्हणून माझा मागे लागला, पुरता वेडा झालता हा, मला आवरनं जरा कठीण झालते, पण हळव्या मनाचा होता काय बोलेल ते माझा समोरचं पण तिला काडीमात्र त्रास होणार नाही ह्याची खंबीर काळजी घेणार हा, शेवटी गळ्यात मिठी मारून खांदा ओला होई पर्यंत काय तो रडला, तिला ह्याची काहीचं कल्पना नसेल कि तिचा साधा एक मेसेज काय करून ठेवेल माझा मित्राचे, तेव्हा मलाही रडूच आलते पण आणि सावरले स्वताला आणि ह्याला धीर देऊ लागलो, पण हा हट्टी पण तेवढाच होता म्हना ह्याने मला तिच्या घरापाशी घेऊनच गेला, पण लांबूनच आम्ही तिचा घरची हालचाल पाहू लागलो, तिचा घरात लग्न आहे असे काहीच वातावरण न्हवते म्हणजे साधे केळीच्या पानाचे खांब पण न्हवती लागली, किवा कुठलाच गाजावाजा न्हवता तेथे, आम्ही तेथे भरपूर फेऱ्या मारल्या, तिच्या घरापाशी काही तास घालवले आणि निघालो घरी, ह्याचा पुन्हा हट्ट आता कि तिच्या लग्नाला जायचे म्हणून, एवढे सगळे होऊन हा माणूस लग्नाला जायचे म्हणून हट्ट करू लागला, तिला हा पुन्हा मेसेज वर बोलला वाटत कि “तू आता तयार असशील तर तुला पळवून न्हेतो पण तू मला सोडून नको जाऊस, तुझावर खूप प्रेम आहे माझे, काही पण करेन तुझासाठी..” तिला ह्याचा मध्ये फसायचे न्हवते म्हणजे आता हि वेळ न्हवती विचार करायची त्यामुळे तिने त्याला सरळ नकार देत बोलली..
“ जे नशिबात असते तेचं होते..”..

आता ह्यांचा दोघात जे काय सवांद होयचा हा मला आहे असे हुबे हूब सांगायचा, मला बोलायचा मन  मोकळे होते रे तुला सांगितले कि, मग मी पण ह्याचा लव स्टोरी मध्ये सामील होयचो, तिलाहि माझा चेहरा ओळखीचा झालता कारण हा माणूस ती समोर आली कि गार होयचा, त्याला तिच्या समोर बोलायची कधी हिम्मत झालीच नाही त्यामुळे ह्याचे इतक्या दिवस लटकले होते आणि ह्या लव स्टोरीचा क्लायमेक्ष हा असा होईल ते आम्ही कधी गृहीत धरले न्हवते..

ह्याची झोप उडाली होती आणि माझी झोप उडवली होती ह्याने, मला ह्याची काळजी वाटू लागली कि हा स्वताचे काही करून तर घेणार नाही ना असे भरपूर मनात येत होते माझे, त्यामुळे ह्याला मी एकत सोडलं न्हवते, तिचा लग्नाच्या दिवशी हा भावड्या तयार ना, माझा मागे धाड लाऊन बसला होता, रडून ह्याच्या डोळ्यातील पाण्याची नाळ वाहून आटली होती, डोळे चांगलेच लाल झाले होते, काही तरी खाऊन घे म्हणत मी मागे लागलो पण हा ऐकतो कुठे माझे, आम्ही दोघे आता तिचा लग्नाच्या मुहूर्ताला पोहचलो, वेळेतच गेलतो म्हणा पण मांडवाच्या बाहेर ह्याने मला थांबवले, आत ह्याला जायचे होते पण ह्याचे धाडस होत न्हवते तशी माझी पण तारांबळ उडाली होती, कारण इतक सोप नसते ह्या असल्या वेळेला येणे आणि हि वेळ सामोरे जाने ते, आत घोषणा झाली मंगलाष्टागाची.. बाहेर आवाज येत होता स्पष्ट आणि आम्ही समोरच उभे, ह्याची गडबड सुरु झाली, त्याचा हळव्या मनाची जिव्हाळी फुटली, पायाला कापर फुटली होती, थर थरणारे अंग त्याचे, मला त्याने थोडे लांब नेले तेथून, तोवर शेवटची मंगलाष्टागे सुरु झाली आणि आता हा पुरता खचला होता, तो सरळ खालीच बसला, ढसा ढसा रडू लागला, आता मला काहीच कळेना कि ह्याला कसे सावरू ते, पण इथे मला त्याचासोबत खंबीर थांबणे महत्वाचे होते आणि तसे मी त्याला आधार देत त्याला सावरले, एवढ्या हळव्या जीवाचा माझा मित्र असा ह्या अवस्थेत माझा समोर आणि मी काहीच करू शकत नाही पण करणार तरी काय मी, वेळ न्हवती, मुविमध्ये जसे धाखवले जाते ते इवढे साधे आणि सोपे नसते म्हणा. मला वाटत होते त्याने इमाजीन केले असेल तिचा सोबत मांडवा मध्ये कोणी भलताच असेल त्याचा सोबत तिचे लग्न होत आहे ते, ह्या जीव घेण्या कल्पनेपुढे कोणताही भारीतला भारी माणूस काही करू शकत नाही म्हणा..

तो दिवस आणि त्याने घातलेला धुमाकूळ सावरणे कठीण होते मला आणि त्याचा साठी हि ते कठीणचं होते त्या दिवशी तिला भेटणे, आम्ही तिला आत मध्ये जाऊन भेटलो हि मग पुन्हा तसचं लगेच मागे फिरत आम्ही निघालो हि बाहेर, कारण ह्याला तिथे जास्त वेळ थांबवणे मला जरा रिस्क वाटत होते, ह्याला त्याचा पेक्षा तिचीच काळजी होती त्यामुळ ह्याने असे काही केले नाही जेणेकरून तिला गालबोट लागेल, आम्ही तिला भेटलो आणि तेथून निघालो लगबगीने, तेथून आम्ही बाहेर आलो म्हणा पण त्याला मी मनातली एक शंका विचारली, तुला एवढा त्रास होत होता तरी तू का आलास हिचा लग्नाला, काय गरज होती, त्याने एक स्मिथ हास्य देत बोलून गेला..

“मला ती किती खुश आहे ते बघायचे होते लग्नात, बस म्हणजे नंतर मनात सलत नाही राहणार कि तिच्या मनातही माझाविषयी काही तरी होते...!.. मन आता मोकळे झाले रे माझे....”

ह्याचा ह्या अजब प्रकाराला बघून मी थक्क झालो, एवढ सगळ सहन करून हा माणूस सहज मावळलेल्या सुर्यागत शांत, निथळ, निरागस हाव भाव देत चालू लागला होता, म्हणजे जिच्या साठी जीवाचा आटा पिटा केलता आणि तिने असे वागावे आणि ह्याने असे सहन करावे हे काही तरी अजब होते, पण त्याला ती विसरणे शक्य न्हवते पण फ़क़्त आता काही सीमारेषा लागू झाल्या ह्यापुढे तिच्यात आणि त्याचामधे बस..

टीप : मनातल वादळ कागदावर उतरवलय फक्त, बाकी सगळे काल्पनिक ©®

#मनात_सलत_राहणारी_गोष्ट.. ©®
#jeet #blogger #ती
-----------
जितेंद्र वाजे
२६-०९-२०१७







1 comment:

  1. मित्रा खूप मस्त. रडू कोसळले.

    ReplyDelete